Post views: counter

Current Affairs February 2017 Part- 3



#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इंटरसेप्टरची चाचणी यशस्वी

शत्रूच्या क्षेपणास्त्राचा माग काढून त्याचा वेध घेत ते उद्ध्वस्त करणाऱ्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची शनिवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘पीडीव्ही मिशन’ असे नामकरण झालेल्या या मोहिमेच्या यशामुळे द्विस्तरीय क्षेपणास्त्र यंत्रणेतील महत्त्वाचा टप्पा भारताने पार केला असून संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्यापासून शहरांचे संरक्षण करण्याची क्षमता असलेल्या चार देशांच्या यादीत भारताने आता स्थान मिळवले आहे.

पृथ्वीच्या वातावरणापासून ५० किमी उंचीवर असलेल्या लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्राची भूमिका बजावण्यासाठी बंगालच्या उपसागरातील एका नौकेवरून लक्ष्य क्षेपणास्त्र डागण्यात आले. इंटरसेप्टर क्षेपणास्त्राच्या ट्रॅकिंग यंत्रणेने त्याचा माग काढून त्याचा अचूक वेध घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ आणि सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देव पटेलला ‘बाफ्टा’ पुरस्कार

‘स्लमडॉग मिलेनिअर’द्वारे रूपेरी पडद्यावर झळकलेला ब्रिटिश-भारतीय अभिनेता देव पटेल याला ‘लायन’ चित्रपटातील भूमिकेसाठी सहायक अभिनेत्याचा ‘बाफ्टा पुरस्कार’ जाहीर झाला. ७०व्या ब्रिटिश अॅकॅडमी फिल्म अॅवॉर्डमध्ये दिग्दर्शक डेमियन शझिल यांच्या ‘ला ला लँड’ने पुरस्कारांची घोडदौड कायम राखत पाच पुरस्कार पटकावले आहे, तर ‘आय, डॅनियल ब्लेक’ चित्रपटाला उल्लेखनीय ब्रिटिश चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.


एका परदेशी कुटुंबाने दत्तक घेतलेल्या भारतीय नागरिकाने गूगल मॅपच्या साह्याने स्वतःचे मूळ शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाची कथा ‘लायन’मध्ये आहे. पुरस्कार स्वीकारताना देव पटेल याने सीमा, प्रांत आणि वंश अशा सगळ्यांना भेदून जाणारी कथा या चित्रपटात असल्याचा सूचक उल्लेख केला.

केसी अॅफ्लेकला ‘मँचेस्टर बाय द सी’साठी सर्वोत्तम अ​भिनेत्याचा पुरस्कार मिळाला; तर दिग्दर्शक शझिल यांना ला ला लँड चित्रपटासाठी, तसेच एमा स्टोन हिला याच चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. वायोला डेव्हिसला फेन्स चित्रपटामधील भूमिकेसाठी सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार

भारतीय तबलावादक संदीप दास यांना सोमवारी ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५९व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वश्रेष्ठ जागतिक संगीत’ या विभागात, यो-यो मा यांच्या ‘सिल्क रोड इन्सेंबल’ या आल्बममधील ‘सिंग मी होम’साठी दास यांना हा पुरस्कार मिळाला. पं. रवीशंकर यांची कन्या सतारवादक अनुष्का शंकर यांना मात्र या पुरस्काराने हुलकावणी दिली आहे.

बनारस संगीताचा वारसा सांगणारे संदीप दास हे पं. किशन महाराज यांचे शिष्य आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांना ग्रॅमी नामांकन मिळाले आहे. दास यांनी पुरस्कार स्वीकारताना, एकात्मता आणि एकमेकांच्या संस्कृतीप्रती सन्मान व्यक्त करण्याचा संदेश आपल्या संगीतातून दिला असल्याचे सांगत सध्याच्या स्थितीत आम्ही आमच्या संगीतातून प्रेमभाव वाढवत राहू, असा आशावाद व्यक्त केला.

‘सिंग मी होम’ला ग्रॅमी

५९व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वश्रेष्ठ जागतिक संगीत’ या विभागात भारतीय तबलावादक संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. चिनी वंशाच्या अमेरिकन नागरिक यो-यो मा यांच्या ‘द सिल्क रोड इन्सेंबल’साठी जगभरातील कलाकारांनी संगीतरचना सादर केल्या आहेत. यामध्ये संदीप दास यांच्यासह त्यांची ‘सिंग मी होम’ ही रचना आहे.

ग्रॅमी पुरस्कारांमध्ये ब्रिटिश गायिका अॅडेल आणि बियॉन्से यांच्यात प्रमुख पुरस्कारांसाठी चुरस होती. मात्र, अॅडेलने प्रमुख पुरस्कारांसह पाच ग्रॅमींवर नाव कोरले, तर या गर्भवती बियॉन्सेने सादर केलेल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकून घेतले. तिलाही दोन पुरस्कार मिळाले. दिवंगत गायक डेव्हिड बोवी यांच्या ‘ब्लॅकस्टार’ या आल्बमने पाच ग्रॅमी पटकावले.

चिनी अमेरिकी संगीतकार यो यो मा याच्यासोबत संदीप दास यांनी 'सिंग मी होम' हा अल्बम केला होता. त्यातील भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या अफलातून जुगलबंदीनं संगीतप्रेमींना वेड लावलं होतं. त्याचीच पोचपावती म्हणून आज ग्रॅमी पुरस्कारांतील जागतिक संगीत गटात या अल्बमला सर्वोत्कृष्ट अल्बम म्हणून निवडण्यात आलं आणि यो यो मा - संदीप दास जोडीला ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारताचा हा आनंद द्विगुणित होता-होता राहिला. भारताच्या प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकर यांना ग्रॅमी पुरस्कारानं सहाव्यांदा थोडक्यात हुलकावणी दिली. 'लँड ऑफ गोल्ड' या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमीचं नामांकन मिळालं होतं. निर्वासित-स्थलांतरितांच्या समस्येवर आधारित हा अल्बम संगीतप्रेमींना भावला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशांतर्गत विमानसेवा महागणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे केंद्र सरकारच्या चालू खात्यातील संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. याशिवाय देशांतर्गत विमानप्रवासही महागण्याची शक्यता आहे. जेट फ्युएलच्या दरात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विमानकंपन्यांकडून प्रवासभाड्यात वाढ करण्यात येण्याचा अंदाज आहे.

देशांतर्गत विमानवाहतुकीचे दर सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून आहेत. गेल्या वर्षी कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी घट झाली होती. जेट फ्युएलच्या दरात जानेवारी महिन्यात विमानभाड्यात वाढही नोंदवण्यात आली होती. देशांतर्गत विमानप्रवासात डिसेंबरमध्ये घट झाल्यानंतर जानेवारी महिन्यात भाडे दर घटवण्यात आल्यामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ नोंदवण्यात आली. त्यानंतर हळूहळू विमानाच्या इंधनात वाढ होऊ लागल्याने कंपन्यांनी इंधनाचा भार प्रवाशांवर टाकून दरवाढ करण्यावर भर दिला.

देशांतर्गत प्रवासी विमानक्षेत्रात अव्वल स्थानी असणाऱ्या जेट एअरवेजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्यांनी नुकताच ग्राहकांकडून इंधन अधिभार वसूल करण्यास सुरुवात केली आहे. अधिभाराची रक्कम जेट फ्युएलच्या दराच्या चढउतारावर अवलंबून असते. ‘विमान कंपन्यांकडून दीर्घ आणि अल्पकालीन तत्वावर १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत अधिभार आकारण्यात येतो. सध्या जेट एअरवेजकडून प्रति प्रवासी ७०० रुपये अधिभार आकारण्यात येतो,’ अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी उन्हाळ्यानंतर पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. २०१५-१६मध्ये कच्च्या तेलाचे दर विक्रमी पातळीपर्यंत खाली घसरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ३० डॉलरपर्यंत घसरले होती. ही पातळी १९८०नंतर कधीच पाहायला मिळाली नाही. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ५५ डॉलरवर पोहोचला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ह्रदय शस्त्रक्रियेसाठी 'स्टेंट' आता सामान्यांच्या आवाक्यात

केंद्र सरकारने ह्रदयविकार असलेल्या नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ह्रदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंटच्या किंमतीत 85 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. धातूच्या स्टेंटसाठी 7 हजार 260 रुपये आणि विघटनशील स्टेंटसाठी 29 हजार 600 रुपये कमाल किमतीची मर्यादा आता घालण्यात आली आहे.

राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे, की सार्वजनिक हित विचारात घेऊन धातूच्या स्टेंटसाठी किमतीची मर्यादा 7 हजार 260 रुपये ठेवण्यात आली आहे. औषधाने विघटित होणाऱ्या स्टेंटसाठी किंमत मर्यादा 29 हजार 600 रुपये ठेवण्यात आली आहे. सरकारने याआधीच हे स्टेंट अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समाविष्ट केले आहेत.

स्टेंट नलिकेच्या आकाराचा असतो आणि तो ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये बविण्यात येतो. यामुळे ह्रदयविकार असलेल्या नागरिकांवर उपचार करताना रक्तवाहिनी खुली राहण्यास मदत होते. या स्टेंटची किंमत 25 हजार ते 1.98 लाख रुपये आहे. "एनपीपीए'ने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालये सर्वाधिक नफा स्टेंटमध्ये कमावतात. या नफ्याचे प्रमाण काही वेळा 654 टक्क्यांपर्यंत जाते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शशिकला नटराजन यांना 4 वर्षांची शिक्षा

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला नटराजन यांना आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा झटका बसला असून, त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनाविली आहे. तसेच त्यांना दहा वर्षे निवडणूकही लढविता येणार नाही.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना शिक्षा सुनाविताना, लगेच आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. शशिकला यांना किमान अजून तीन वर्षे तुरुंगात रहावे लागणार आहे. न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने 7 जून 2016 ला सुनाविलेल्या निकालावर आज निकाल सुनाविण्यात आला. या प्रकरणात दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या सुद्धा आरोपी होत्या.

तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यात संघर्ष सुरु होता. पण, न्यायालयाने आज सुनाविलेल्या निर्णयामुळे शशिकला यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तमिळनाडूच्या राजकीय पेचावर मार्ग काढण्यासाठी राज्यपालांनी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडे सल्ला मागितला होता. त्यानुसार रोहतगी यांनी राज्यपालांना एका आठवड्याच्या आत विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करून घेण्याचा सल्ला दिला होता. पण, आता शशिकला यांना दोषी ठरविण्यात आल्याने पनीरसेल्वम यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पनीरसेल्वम यांना अनेक आमदार व खासदारांकडून पाठिंबा देण्यात येत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दत्तक घेतलेल्या डोणजा गावासाठी सचिनने दिले 4 कोटी

राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा हे गाव संसद आदर्श गाव योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. यापूर्वी त्याने आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा हे गाव दत्तक घेतले आहे. खासदारांसाठी असलेल्या निधीतून सचिननने डोणजा गावाच्या विकासासाठी 4 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सचिनने दिलेल्या निधीतून गावातील विकासाची विविध कामे पूर्ण होणार आहेत. गावातील शाळेची इमारत बांधणी, पाणीपुरवठा योजना, चांगले रस्ते, सांडपाण्याचा मार्ग आदी कामे होणार आहेत. याबाबत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. गावात असलेल्या 70 वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीच्या जागी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेमुळे गावातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोचणार आहे. सचिनने हे गाव दत्तक घेतल्यापासून ग्रामस्तरावरील पाच विशेष बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत गावातील महिलांचाही सहभाग होता. गावातील विकासकामांचे नियोजन पूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्या संदर्भातील कंत्राटे काढण्यात येणार आहेत.

याबाबत माहिती देताना उस्मानाबादचे सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, 'सामाजिक-आर्थिक रचना लक्षात घेऊन गावाचा सर्वप्रकारे विकास करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गावकऱ्यांसोबत काम करत आहे. क्रिकेटमधील महान खेळाडू आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांनी हे गाव दत्तक घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.'

ज्यावेळी सचिनने हे गाव दत्तक घेतले त्यावेळी गावातील 610 घरांपैकी 400 पेक्षा अधिक घरांमध्ये शौचालय नव्हते. गाव दत्तक घेतल्यानंतर गावात 231 शौचालये उभारण्यात आली असून ती वापरली जात आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताचा कसोटी मालिका विजयाचा 'षटकार'

'कॅप्टन कोहली'च्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली असून आज बांगलादेशविरुद्धची कसोटी जिंकून विराटसेनेनं मालिका विजयाचा 'षटकार' ठोकला आहे. श्रीलंका, आफ्रिका, इंग्लंड यासारख्या तगड्या संघांना धूळ चारणाऱ्या भारतानं बांगलादेशची अगदी सहज शिकार केली. 'सख्ख्या शेजाऱ्यां'ना २०८ धावांनी पाणी पाजत टीम इंडियानं आणखी एका दणदणीत विजयाची नोंद केली आणि भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियाला इशारा दिला.

भारताच्या पहिल्या डावात द्विशतकी खेळी करून विजयाचा पाया रचणारा विराट कोहली 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.

गेल्या सहा कसोटी मालिकांमधील भारताची कामगिरी

>> ऑगस्ट २०१५ - श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-१ असे यश

>> नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ - द. आफ्रिकेविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली (एक कसोटी अनिर्णित)

>> जुलै-ऑगस्ट २०१६ - वेस्ट इंडिजचा ०-२ असा पराभव (दोन सामने अनिर्णित)

>> सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ - न्यूझीलंडचा ३-० असा फडशा

>> नोव्हेंबर-डिसंबर २०१६ - इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ४-० असा ऐतिहासिक विजय (१ कसोटी ड्रॉ)

>> फेब्रुवारी २०१७ - बांगलादेशवर २०८ धावांनी दणदणीत विजय

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऍम्बेसेडरचा ब्रॅंड आता प्युजो कंपनीकडे

एकेकाळी सत्तेचे प्रतीक समजली गेलेल्या आणि सामान्यांच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ऍम्बेसेडरचा ब्रॅंड फ्रान्समधील प्युजो या मोटार उत्पादन कंपनीने 80 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. सी. के. बिर्ला यांच्या हिंदुस्तान मोटर्सकडे आतापर्यंत मालकी असलेल्या ऍम्बेसेडरचे तीन वर्षांपासून उत्पादन थांबविण्यात आले आहे.

"प्युजो कंपनीला ऍम्बेसेडरचा ब्रॅंड आणि ट्रेडमार्क विकण्याचा करार झाला आहे. या करारातून मिळालेल्या पैशातून कर्मचारी आणि देणेकरी यांचे थकीत वेतन तसेच देणी चुकविण्यात येणार आहेत,' असे बिर्ला ग्रुपच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या करारानंतर, प्युजो कंपनी ऍम्बेसेडर या ब्रॅंडचा वापर भारतात मोटार विक्रीसाठी करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हिंदुस्तान मोटर्सने सुमारे सात दशकांपूर्वी मॉरीस ऑक्सफोर्ड 2 (लॅंडमास्टर) मध्ये थोडे बदल करून ती ऍम्बेसेडर या नावाने भारतीय रस्त्यांवर उतरवली होती. यानंतर अनेक दशके ही मोटार प्रतिष्ठेचे आणि रुबाबाचे प्रतीक बनले होते.

ऍम्बेसेडरचा प्रवास

1958 : उत्पादन सुरू

1980 चे दशक : 24 हजार गाड्या प्रतिवर्ष

2013-14 : 2,439 गाड्या प्रतिवर्ष

2014 अखेर : दररोज केवळ पाच गाड्या

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रिलायन्स डिफेन्स अमेरिकी नौदलासोबत करारबद्ध

अनिल अंबानी यांच्या 'रिलायन डिफेन्स'ला अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांच्या दुरुस्ती सेवांचे कंत्राट मिळाले आहे. प्रामुख्याने पश्चिमी प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात कार्यरत असणाऱ्या 'सेवन्थ फ्लीट'च्या नौकांसाठी कंपनीतर्फे दुरुस्ती आणि बदल सेवा पुरविल्या जातील.
भारताच्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वपूर्ण कंत्राट आहे. देशातील बंदरांवर पहिल्यांदाच अमेरिकी नौदलाला सेवा पुरविण्याचा मान रिलायन्स समुहाला मिळाला आहे.

अमेरिकेच्या या फ्लीटकडून सुमारे 5,070 जहाजे आणि पाणबुड्या, 140 विमाने आणि 20,000 खलाशांचे नेतृत्व केले जाते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे मालकी असणाऱ्या रिलायन्स डिफेन्सने अमेरिकी नौदलासोबत 'मास्टर शिप रिपेअर अॅग्रीमेंट'(एमएसआरए) वर सह्या केल्याचे सांगितले. या कंत्राटाची एकुण किंमत तब्बल 15,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.

गुजरातमधील पिपावाव येथील रिलायन्स शिपयार्डला गेल्या महिन्यात अमेरिकी नौदलासाठी दुरुस्ती आणि फेरफार सेवांचा कंत्राटदार म्हणून मंजुरी मिळाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹किरकोळ महागाईचा तीन वर्षांतील नीचांक

भाजीपाला, डाळी आणि इतर अन्नधान्यांच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याने जानेवारी महिन्या किरकोळ महागाईचा दर 3.17 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच महागाई दराने नीचांकी पातळी गाठली आहे. डिसेंबर महिन्यात तो 3.41 टक्के होता तर जानेवारी 2016 मध्ये महागाई दर 5.69 टक्के होता.

सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजीपाल्याची किंमतींमधील घसरण कायम आहे. भाजीपाला महागाईचा दर उणे 15.62 टक्के आहे. डिसेंबरमध्ये भाजीपाला महागाई दर उणे 14.59 टक्के होता. डाळीवर्गीय अन्नधांन्यांचा दर ही उणे 6.62 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. फळांच्या किंमतींमधील महागाई दर 5.81 टक्के असून इंधन आणि ऊर्जा महागाई दर 3.42 टक्के आहे.

मटण आणि मत्स उत्पादनांची महागाई 2.98 टक्के आहे. ग्राहकमूल्यावरआधारीत अन्नधान्य महागाईचा दर 0.53 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. डिसेंबरमध्ये तो 1.37 टक्के होता. केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यामुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला. बाजारातील दैनंदीन उलाढाल मोठ्या प्रमाणात घटल्याने मागणी घटली. परिणामी महागाईचा पारा उतरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टीम इंडियाच 'काबिल', टी-२० वर्ल्ड कप काबीज!

'यहां के हम सिकंदर, चाहे तो रख्खे सब को अपनी जेब के अंदर', असं म्हणत भारताच्या दृष्टिहिनांच्या संघानं आज टी-२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत गतविजेत्या भारतानं आपणच काबिल असल्याचं पुन्हा सिद्ध केलं.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत एकही सामना न हरता पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली होती. साखळी फेरीत त्यांनी भारतालाही सात विकेटनं नमवलं होतं. त्यामुळे जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण, भारतीय संघानं जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर विजयश्री खेचून आणली आणि साखळीतील पराभवाचा बदला घेत वर्ल्ड कप उंचावला.

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करून भारतापुढे विजयासाठी १९८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रकाशा जयरामय्याच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर ते टीम इंडियानं १८व्या ओव्हरमध्येच फक्त एक विकेट गमावून पूर्ण केलं. त्यामुळे आजघडीला दृष्टिहिनांचा वनडे वर्ल्ड कप, टी-२० आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कप भारताकडेच आहेत. विशेष म्हणजे, या तीनही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानलाच पाणी पाजलं आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अश्विन सुपरफास्ट; झटपट २५० विकेट घेण्याचा विक्रम

टीम इंडियाचा जादुगार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आज बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. २५० कसोटी विकेट्स झटपट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्यानं ४५व्या कसोटीतच हा मैलाचा दगड गाठला आहे.

६ नोव्हेंबरला २०११ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा आर. अश्विन आज टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ झाला आहे. ज्या-ज्या वेळी संघाला विकेट घेणं 'मस्ट' होतं, तेव्हा-तेव्हा हा हुकमी एक्का मदतीला धावून येतो. या लौकिकाला साजेशीच कामगिरी त्यानं बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीतही केली. शाकीब अल हसन आणि मोहम्मद रहीम यांची जोडी फोडून त्यानं भारताला काल मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आज शतकवीर रहीमला वृद्धिमान साहाकरवी झेलबाद करून अश्विननं बांगलादेशचा डाव गुंडाळलाच, पण २५०वी कसोटी विकेटही मिळवली. इतक्या कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठणं आत्तापर्यंत कुणालाच जमलं नव्हतं.

ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिक महान गोलंदाज डेनिस लिलीनं ४८व्या कसोटीत, तर द. आफ्रिकेच्या डेल स्टेननं ४९ व्या सामन्यात २५० विकेट्सचा पल्ला गाठला होता. भारताच्या अनिल कुंबळेनं ५५व्या सामन्यात, तर बिशनसिंग बेदी यांनी ६०व्या कसोटीत २५० वी विकेट घेतली होती. या दिग्गजांच्या यादीत आता आर. अश्विन सगळ्यात वरच्या क्रमांकावर स्थानापन्न झाला आहे.

झटपट २५० विकेट घेणारे कसोटीवीर

आर. अश्विन (भारत) - ४५ सामने
डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया) - ४८ सामने
डेल स्टेन (द. आफ्रिका) - ४९ सामने
अॅलन डोनाल्ड (द. आफ्रिका) - ५० सामने
वकार युनिस (पाकिस्तान) - ५१ सामने
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - ५१ सामने
सर रिचर्ड हेडली (न्यूझीलंड) - ५३ सामने
माल्कम मार्शल (वेस्ट इंडिज) - ५३ सामने
इयान बॉथम (इंग्लंड) - ५५ सामने
इम्रान खान (पाकिस्तान) - ५५ सामने
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - ५५ सामने
अनिल कुंबळे (भारत) - ५५ सामने
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - ५५ सामने

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दुबईने नुकतीच स्वयंचलीत हॉवर ट्रक्सीची चाचणी केली.

जग बदलत चाललंय, सगळ्याच गोष्टी आता प्रगत होऊ लागल्या आहेत. अनेक देशात विनाचालक टॅक्सी, बस किंवा ट्रक सेवा सुरु करण्याच्या चाचण्या सुरू आहेत. स्विर्त्झलँड, सिंगापूर, स्वीडन यांसारख्या अनेक देशात विनाचालक वाहनं रस्त्यावर उतरवण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले. पुढच्या काही महिन्यांत या देशांच्या रस्त्यावर विनाचालक वाहनंही धावू लागतील. पण दुबईने यापुढे एक पाऊल टाकलं आहे. दुबई सध्या स्वयंचलित एअर टॅक्सी सुरू करण्याच्या विचारात आहे. या टॅक्सी चक्क विमानासारख्या हवेत उडणार आहेत.

दुबईने नुकतीच स्वयंचलीत हॉवर ट्रक्सीची चाचणी केली. हवेत उडणारी ही टॅक्सी ताशी १०० किलोमीटरने प्रवास करू शकते. २०३० पर्यंत दुबईतल्या वाहतूकीच्या भार स्वयंचलित टॅक्सी सेवांवर टाकण्याचा मानस दुबईचा आहे. ही हॉवर टॅक्सी चिनी बनावटीची आहे. प्रवाशांनी फक्त या टॅक्सीमध्ये चढून इच्छीत स्थळाचा पत्ता त्यावर टाईप करायचा त्यानंतर ही टॅक्सी तुम्हाला इच्छीत स्थळी घेऊन जाते. जुलै महिन्यात ही टॅक्सी सेवा लाँच करण्याच्या प्रयत्नात हा देश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कर्नाटकात बैलगाडा व म्हशींच्या कंबाला शर्यती पुन्हा सुरू करण्यास परवानगीचे विधेयक मंजूर

कर्नाटकात म्हशींच्या कंबाला शर्यती, तसेच बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यास परवानगी देणारे विधेयक विधानसभेने जनमताच्या दबावाखाली मंजूर केले आहे. अलिकडे तामिळनाडूत बैलांच्या जलीकट्टू खेळाला परवानगी देणारे विधेयक मंजूर केले होते. विधानसभेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने कंबाला व बैलगाडा शर्यती सुरू करण्यास मान्यता देणारे विधेयक मंजूर झाले. कंबाला शर्यतींना परवानगी देणे हा भारतावरील काळा डाग असून या शर्यतींमध्ये प्राण्याचा छळ केला जातो त्यामुळे भारताची जागतिक प्रतिमा बिघडणार आहे असे पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्वा जोशीपुरा यांनी सांगितले.

द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट १९६० या कायद्यात त्यासाठी सुधारणा करणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत मंजूर झाले असून तामिळनाडूतील जलीकट्टूनंतर कंबाला शर्यती सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव आला होता. हे विधेयक मांडताना पशुसंवर्धन मंत्री ए.मंजू यांनी सांगितले की, कंबाला हा पारंपरिक लोकक्रीडा प्रकार आहे व त्यात प्राण्यांबाबत क्रूरता दाखवली जात नाही.

या खेळाला पुन्हा परवानगी द्यावी अशी लोकांची आग्रही मागणी आहे. कायदा मंत्री टी.बी.जयचंद्र यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशीनुसार कंबाला व बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात यावी, कारण त्यात बेटिंग म्हणजे सट्टा लागत नाही, प्राण्यांबाबत क्रूरता दाखवली जात नाही, हा खेळ शेतकऱ्यांच्या श्रद्धांशी निगडित आहे.

या शिफारशींची माहिती मंजू यांनी दिली. सरकारने यात अध्यादेशाचा मार्ग वापरलेला नाही तर थेट विधेयक मंजूर केले आहे. मंजू यांच्या आवाहनाला अनुसरून सर्व पक्षांनी या विधेयकास पाठिंबा दिला. कंबाला समित्या व अनेक कन्नड संघटनांनी अलीकडेच म्हशींच्या कंबाला शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी उडुपी व दक्षिण कन्नड जिल्ह्य़ात आंदोलन केले होते. मंत्रिमंडळाने २८ जानेवारीलाच प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल अॅक्टमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. या कायद्यानुसार कंबाला व इतर शर्यतींना त्यात प्राण्यांबाबत क्रूरता दाखवली जात असल्याच्या कारणास्तव बंदी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹PSLV-C37 च्या ऐतिहासिक उड्डाणाचे काउंटडाउन सुरू

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) उद्या एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या वाटेवर आहे. पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ अवकाशात झेपावेल. पीएसलव्ही प्रक्षेपकाचे हे ३९ वे उड्डाण असून रॉकेटला अतिरिक्त मोटर्स लावण्यात येणाऱ्या एक्सएल प्रकारातील हे पीएसएलव्हीचे १६ उड्डाण ठरेल. इस्रोच्या या यशामुळे आता अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एका नव्या दरयुद्धाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

पीएसएलव्ही सी-३७ चे उड्डाण कधी होणार?
पीएसलव्ही सी-३७ च्या उड्डाणाचे काउंटडाउन मंगळवारी पहाटे पाच वाजून २८ मिनिटांनी सुरू झाले आहे. उद्या सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी पीएसएलव्ही सी -३७ अवकाशात झेपावेल.

पीएसएलव्ही सी-३७ कुठून प्रक्षेपित होणार?
आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी-३७ उड्डाण करेल.

पीएसएलव्ही सी-३७ चे उड्डाण कुठे पाहता येईल?
पीएसएलव्ही सी-३७ च्या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहता येईल. याशिवाय, इस्त्रोच्या संकेतस्थळावर उड्डाण ऑनलाईन पाहता येईल.

पीएसएलव्ही सी-३७ किती उपग्रह घेऊन उड्डाण करणार?
पीएसएलव्ही सी-३७ यावेळी एकाच उड्डाणातून १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करेल. यामध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रहांचा समावेश आहे.

पीएसएलव्ही सी-३७ कोणत्या देशांचे उपग्रह अवकाशात सोडेल?
पीएसएलव्ही सी-३७ च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रह असतील.यामध्ये अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.

पीएसएलव्ही सी-३७ चे उड्डाण ऐतिहासिक का ठरणार आहे?
एकाचवेळी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या संख्येमुळे ‘पीएसएलव्ही सी ३७’चे उड्डाण ऐतिहासिक ठरणार आहे. एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. एकाच उड्डाणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित देशांचे उपग्रह व्यावसायिक तत्त्वावर इस्रो प्रक्षेपित करत असल्यामुळे जगभरातील अवकाश कंपन्यांचे ‘पीएसएलव्ही’च्या उड्डाणाकडे विशेष लक्ष आहे. अवकाश क्षेत्रातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील खासगी कंपन्या आपले उपग्रह नासा किंवा अमेरिकी कंपन्यांऐवजी ‘इस्रो’च्या माध्यमातून प्रक्षेपित करणे किफायतशीर समजत आहेत, यातच येत्या काळात भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधीची झलक दिसून येते. त्यामुळे अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एका नव्या दरयुद्धाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

इस्रोची यापूर्वीची ऐतिहासिक कामगिरी काय होती?
यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. जानेवारी महिन्यात एकाचवेळी ८३ उपग्रह अंतराळात सोडण्याचा इरादा होता. मात्र, ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता आणखी २० उपग्रहांची भर पडली असून उद्या पीएसएलव्ही सी-३७ एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करेल. यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेने सर्वाधिक २९, तर रशियाने ३७ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.

भारताचे किती उपग्रह आहेत. त्याचा फायदा काय होणार आहे?
पीएसएलव्ही सी-३७कडून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. कार्टोसॅट-२डी (वजन ७३० किलो) , आयएनएस १ए आणि आयएनएस १बी (वजन प्रत्येकी ३० किलो) अशी या उपग्रहांची नावे आहेत. यापैकी कार्टोसॅट-२डी हा कार्टोसॅट मालिकेतील पाचवा अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह असेल. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आणि अवकाशातून पृथ्वीची छायाचित्रे पाठविण्यासाठी मुख्यत्त्वेकरून कार्टोसॅट-२डी चा वापर केला जाईल. या माहितीचा उपयोग मॅप अॅप्लिकेशन्स, नागरी व ग्रामीण विकास आणि सुविधा व्यवस्थापनासाठी केला जाईल.
तर आयएनएस १ए या नॅनो उपग्रहाचा वापर भविष्यातील प्रयोग, विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात येणारे उपग्रह व अन्य तंत्रज्ञानासाठी केला जाईल.
आयएनएस १बी हादेखील नॅनो उपग्रह असून आएएनएस १ए नंतर तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहातील रिमोट सेन्सिंग कलर कॅमेऱ्याचा वापर उच्च क्षमतेची छायाचित्रे काढण्यासाठी करण्यात येईल.

पीएसएलव्ही सी-३७ मोहिमेचे प्रमुख कोण आहेत.?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख या नात्याने ए.एस. किरण कुमार यांच्याकडे पीएसएलव्ही सी-३७ मोहिमेची जबाबदारी आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रशियाशी मैत्री, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी गमावली खुर्ची

अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लायन यांनी राजीनामा दिला आहे. रशियाबरोबर असलेल्या कथित संपर्क असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाव वाढला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लायन यांनी ट्रम्प यांनी सत्ता सांभाळल्यानंतर अमेरिकेत रशियन राजदूतबरोबर देश हितासंबंधीच्या विषयांवर चर्चा केली हाती, असे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येते होते. फ्लायन यांचे हे कृत्य विदेश नितीचे उल्लंघन असल्याचे मानले जाते. ट्रम्प यांनी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल किथ किलॉग यांची हंगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचे सांगण्यात येते.

फ्लायन यांनी उपाध्यक्ष माइक पेन्स यांचीही दिशाभूल करत अशा प्रतिबंधित विषयांवर आपण चर्चा केली नसल्याचे म्हटले होते. माइक पेन्स यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवत माध्यमांसमोर जाऊन मोठ्या आत्मविश्वासाने असे काही झालेच नसल्याचे सांगितले होते.

गेल्या आठवड्यात काही अमेरिकन वृत्तपत्रांनी अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांचा हवाला देत बंदी असलेल्या विषयावर फ्लायन यांनी चर्चा केल्याचे म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. यादरम्यान फ्लायन यांनी उपाध्यक्ष पेन्स यांची माफी मागितल्याचेही वृत्त येत होते. परंतु, डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

हा आरोप होत असल्यापासून ट्रम्प प्रशासनाने या विषयावर मौन बाळगले होते. परंतु सोमवारी सांयकाळी ट्रम्प यांचे सल्लागार केलीन कॉन्वे यांनी माध्यमांसमोर फ्लायन यांच्यावर ट्रम्प यांचा संपूर्ण विश्वास असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या वादानंतरही फ्लायन आपल्या पदावर कायम राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

त्यानंतर एका तासानंतर व्हाइट हाऊसचे प्रवक्ता शॉन स्पायसर यांनी एक निवेदन जारी करून ट्रम्प संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने उपाध्यक्षांना खोटी माहिती दिली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून व्हाइट हाऊसमध्येही अनेक गट पडल्याचे वृत्त येत होते. त्यात पुन्हा सोमवारी दोन तासांत दोन वेगवेगळे विधाने माध्यमांपर्यंत पोहोचल्यामुळे याला दुजोरा मिळाला होता. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारावेळी फ्लायन हे ट्रम्प यांच्या अत्यंत निकट जवळचे सहकारी होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्रगीत चित्रपटाचा भाग असल्यास उभे राहण्याची आवश्यकता नाही- सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रगीत हा चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर चित्रपटगृहातील प्रेक्षकांना त्याच्या सन्मानार्थ उभे राहण्याची गरज नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयात आपल्या यापूर्वीच्या आदेशात सुधारणा केली. सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरला दिलेल्या आदेशात व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच्या वापरावर बंदी आणली होती. तसेच देशभरातील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणेही न्यायालयाने सक्तीचे केले होते. चित्रपटगृहातील प्रत्येक प्रेक्षकाने राष्ट्रगीताचा सन्मान केलाच पाहिजे, असेही यावेळी न्यायालयाने म्हटले होते. केवळ अपंग व्यक्तींनाच या नियमातून सूट देण्यात आली होती.मात्र, त्यानंतर चित्रपट राष्ट्रगीताचा भाग असल्यास उभे राहावे किंवा नाही, याबद्दलचा वाद सुरू झाला होता. अखेर आजच्या निकालादरम्यान न्यायालयाने याबाबतचे धोरण स्पष्ट केले.

यापूर्वीच्या निकालात चित्रपटगृहाचे दरवाजे राष्ट्रगीतावेळी बंद ठेवण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राष्ट्रगीत वाजवताना शांतता आणि शिस्त राखण्यात यावी, यासाठी हा निर्णय देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांनी या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या १५०० परदेशी पाहुण्यांना निर्णयामधून सूट देण्यात यावी, अशी मागणी आयोजकांनी याचिकेत केली होती. पण परदेशी पाहुण्यांना देशाच्या सन्मानासाठी राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यात कोणतीही अडचण नसावी, असे स्पष्टपणे सांगत आयोजकांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबरला दिलेल्या आदेशात व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच्या वापरावर बंदी आणली आहे. राष्ट्रगीत ५२ सेकंदामध्येच वाजले पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले आहे. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तोंडी तलाक हा मानवाधिकाराचा मुद्दा- सर्वोच्च न्यायालय

तोंडी तलाक, निकाह हलाला आणि मुस्लिमांमधील बहुपत्नीत्वाची प्रथा या सगळ्यांबद्दल सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी मुस्लिम कायद्याच्या आधारे करण्यात येणाऱ्या तलाकचा विचार करण्यात येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ‘हे प्रकरण मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आहे,’ असे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर, न्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. ‘या प्रकरणाचा निकाल इतर प्रकरणांवरही परिणाम करु शकतो. या प्रकरणावेळी समान नागरी कायद्यावर चर्चा होणार नाही,’ असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालय कायदेशीर बाजूंच्या आधारावर निर्णय देणार आहे. ‘११ मे पर्यंत एक आदेश काढून तोंडी तलाकच्या वैधतेसंबंधीच्या सर्व याचिकांचा निपटारा करण्यात येईल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाशी संबंधित वकिलांनी एकत्र येऊन या मुद्याला अंतिम स्वरुप द्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

‘या प्रकरणी एखाद्या विशेष प्रकरणाच्या तथ्यांचा विचार करण्यात येणार नाही. या प्रकरणी सुनावणी करताना फक्त कायदेशीर मुद्यांचा विचार करण्यात येईल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘आम्हाला तथ्ये पाहण्यात कोणताही रस नाही. आम्ही या प्रकरणाकडे फक्त कायद्याच्या दृष्टीकोनातून पाहणार आहोत,’ असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. तोंडी तलाकमुळे पीडित असलेल्या लोकांबद्दलची माहिती संक्षिप्त रुपात घेऊन येण्याची सूचना न्यायालयाकडून वकिलांनी करण्यात आली आहे. याआधी केंद्र सरकारने आपल्या याचिकेत मुस्लिमांचे लिंग गुणोत्तर आणि सांप्रदायिकतेचा हवाला देऊन तोंडी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाचा विरोध केला होता. ‘लैंगिक समानता आणि महिलांचा मान सन्मान या प्रकरणी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात संविधानाने दिलेल्या अधिकारांपासून महिलांना वंचित ठेवले जाऊ शकत नाही,’ असे केंद्र सरकारने म्हटले होते.

केंद्र सरकारने तोंडी तलाकच्या विरोधात भूमिका घेतल्यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. तोंडी तलाकमुळे महिलांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा केंद्राचा दावा चुकीचा असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सांगितले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतात पहिल्यांदाच युद्धनौकेवर सोलर पॅनेल

आयएनएस सर्वेक्षकावर सौरऊर्जेचा वापर

देशात पहिल्यांदाच कोणत्याही युद्धनौकेवर सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत. दक्षिण कमांडशी संबंधित आयएनएस सर्वेक्षकावर हे पॅनेल लावण्यात आले आहेत. या युद्धनौकेच्या हँगरवर सोलर पॅनेलचे 18 शीट्स बसविण्यात आले आहेत.

पूर्ण यंत्रणा बसविण्यासाठी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागला. आता आम्ही दिवे आणि काही एअर कंडीशनर चालविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करत आहोत. 300 वॅटचे हे पॅनेल जवळपास 5.4 किलोवॅट ऊर्जा निर्माण करत असल्याचे युद्धनौकेचे कमांडिंग अधिकारी कॅप्टन राजेश बारगोटी यांनी सांगितले.

या पॅनेल्स लावण्याच्या दिशेने सर्वात मोठे आव्हान सागरी वातावरण होते. प्रत्यक्षात सोलर पॅनेल खाऱया पाण्यात आणि दमट ठिकाणांवर टिकू शकत नाहीत. याशिवाय वाऱयाचा वेग देखील या सोलर पॅनेल्सना प्रभावित करू शकतो. समुद्रात गस्तीदरम्यान हवेच्या दाबामुळे पॅनेल्स निघू शकण्याची भीती असते, असे बारगोटी यांनी म्हटले.

ऊर्जा संग्रहासाठी वापरता येणाऱया 10 बॅटऱया असून गस्तीदरम्यान आम्ही सौर ऊर्जेचा वापर फक्त दिवे पेटविण्यासाठी केला जात आहे. जेव्हा युद्धनौका बंदरावर असते, तेव्हा राज्य विद्युत मंडळाकडून उपलब्ध करविण्यात आलेल्या वीजेचा वापर करतो असे कमांडर थंपी यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मंगळानंतर शुक्र ग्रहासाठी मोहीम

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो पहिल्यांदाच शुक्र ग्रहावर पोहोचण्यासाठी आपल्या अंतराळ मोहिमेची तयारी करत आहे. याशिवाय लवकरच इस्रोचे अंतराळयान लाल ग्रहावर पुन्हा पोहोचण्याच्या तयारीत आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार भारत लवकरच पृथ्वीचा सर्वात शेजारचा ग्रह मंगळ आणि शुक्रसाठी मोहीम राबविणार आहे.

भारताची ही अंतराळ संस्था या ग्रहांवर जीवसृष्टीची शक्यता पडताळून पाहण्याचे काम सुरू करेल. याशिवाय लवकरच इस्रो आपल्या एकाच मोहिमेतून 100 पेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करून जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहे. 15 रोजी इस्रो 104 उपग्रह अंतराळात पाठविणार आहे. अंतराळाच्या जगात सक्रिय कोणत्याही देशाने आजपर्यंत असा प्रयत्न केलेला नाही. एकाच अंतराळ मोहिमेद्वारे सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रशियाच्या नावावर आहे. 2014 साली रशियाने 37 उपग्रह प्रक्षेपित केले होते.

15 फेबुवारी रोजी सर्वकाही सुरळीतपणे पार पडले तर इस्रो जगात आपले विशेष स्थान निर्माण करेल. इस्रो आपल्या पीएसएलव्हीद्वारे 3 भारतीय आणि 101 विदेशी लघु उपग्रह अंतराळात नेणार आहे. भारताची दुसरी मंगळ मोहीम 2021-22 मध्ये सुरू होईल. यावेळी इस्रो मंगळ ग्रहाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी एक रोबोट या ग्रहाच्या भूमीवर उतरवेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भविष्यात 1200 मेगावॅट पुढील क्षमतेच्याच विदेशी अणुभट्टीना मंजुरी

भविष्यात 1200 मेगावॅट किंवा त्याहुन अधिक क्षमतेच्या विदेशी अणुभटी प्रकल्पांनाच भारतामध्ये परावनगी मिळणार आहे. अणुवीज निर्मितीला प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आधुनीक आणि अतीउच्च क्षमतेचे रीऍक्टरस उपलब्ध झाले असून अधिक वीज निर्मीतीचे लक्ष्य साध्य करण्यास त्यांचा पुरेपुर वापर करणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केले. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनूसार आंध्रप्रदेशमधील कावली येथील प्रस्तावीत रशियन अणुभटी ही 1200 एमव्ही क्षमतेची आहे. तर सध्या कार्यान्वीत असलेली कुंडनकुलम येथील रशियन अणुभट्टी ही एक हजार मेगावॅट क्षमतेची आहे. या अणुभट्टींची क्षमता वर्तमानात कार्यान्वीत असणाऱया संपुर्ण स्वदेशात विकसीत पीएचडब्लूआर संयत्राच्या (प्रेशराईज्ड हेव्ही वॉटर रीऍक्टरस) दुप्पट असणार आहे.

सध्या भारतात कार्यान्वीत असलेल्या पीएचडब्लूआर संयत्रांची निर्मीतीक्षमता 220एमव्ही ते 540एमव्ही दरम्यान आहे. तर एका नियोजीत वीजनिर्मीती प्रकल्पासाठी स 700मेगा वॅट क्षमतेची ‘पीएचडब्लूआरची’ बांधणी आण्विक ऊर्जा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. भारताने आंध्रप्रदेशमधील कोव्वाडा येथे सहा अणुभट्टी उभारण्यास अमेरिकन कंपनी वेंस्टींगहाऊससोबत करार केले आहे. अलीकडेच या एपी-1000 नावाच्या प्रकल्पाची पूर्वनिर्धारीत प्रकल्पक्षमतेत वृद्धीकरत 1208 मेगावॅट करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील प्रस्तावीत सहा जैतापूर अणुभट्टीचीं क्षमता प्रत्येकी 1650 एमव्ही एवढी आहे.

कवाली आणि कोव्वाडा येथील प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर आंध्रप्रदेशची एकुण आण्विक ऊर्जा निर्मीतीक्षमता 14448 एमव्ही एवढी होणार आहे. पुढील 15 ते 20 वर्षात पुर्णत्वास जाऊ पाहणाऱया या प्रकल्पाने अणुऊर्जा निर्मीतीत आंध्रप्रदेश क्रमांक एकचे राज्य ठरणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बेंगळूरमध्ये साकारणार पहिले स्वदेशी जेट इंजिन ?

जगाच्या आघाडीच्या देशांमध्ये सामील होणार भारत

बेंगळूर शहर भारताला पहिले स्वदेशनिर्मित जेट इंजिन देऊ शकेल की नाही हे जवळपास 24 आठवडय़ात स्पष्ट होईल. जर असे झाले तर भारत अशा तीन देशांच्या समूहात सामील होईल, ज्यांना स्वतःचे जेट इंजिन विकसित करण्याचा मान प्राप्त आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, युरोप आणि इस्रायललाच ही कामगिरी साध्य झाली आहे. भारतीय अभियंते आणि संशोधकांचे 11 सदस्यीय पथक या इंजिन प्रमाणनाच्या तयारीसाठी कार्यरत आहे.

बेंगळूरची कंपनी इन्टेक डीएमएलएस अंतर्गत काम करणारी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फर्म पोएर जेट्स प्रायव्हेट लिमिटेडला या प्रकल्पासाठी 20 कोटी रुपये मिळाले आहेत. यापैकी 9 कोटी रुपये खर्च झालेत. एएएल सारख्या कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रमानंतर मिळालेल्या अनुभवाने समृद्ध या कंपनीने दोन वर्षात स्वतःचे पहिले गॅस टर्बाईन इंजिन बनविण्याचा निर्णय घेतला होता.
8 फेब्रुवारी 2017 रोजी पहिल्यांदा इंजिन सुरू केले. प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी ठरली असून आणखी काही चाचण्या सुरू आहेत. हे इंजिन प्रमाणनासाठी पुढील 10 ते 24 आठवडय़ांमध्ये उपलब्ध होईल असे इन्टेकचे संस्थापक श्रीधर बलराम यांनी सांगितले. एमजेएई-20 एक गॅस टर्बाईन इंजिन आहे, जे ड्रोनमध्ये वापरता येऊ शकते. इंजिनचे वजन 2.16 किलो एवढे आहे. हे इंजिन लष्करात वापरल्या जाणाऱया ड्रोनमध्ये सध्या वापरता येणार नाही.

मोठे यश

एमजेई-40 आणि एमजेई-100 सारखे पर्याय आमच्याकडे असून अधिक मोठय़ा ड्रोन्सना शक्ती देण्यास ते सक्षम आहेत. गॅस टर्बाईन असल्यामुळे यांच्या मदतीने दीर्घ अंतरासाठी उड्डाण भरता येणार आहे. कंपनीसमोर इंजिनाचे अनेक इतर पर्याय देखील आहेत. यातील एक एसजेई-350 द्वारे सामरिक महत्त्वाची मोठी विमाने देखील उडविता येतील. या इंजिनाचे वजन 48.36 किलो आहे.

लढाऊ विमानांसाठी…

लढाऊ विमान उडविण्यासाठी यापेक्षा अधिक शक्तिशाली इंजिनाची गरज आहे. एजेई-350 ट्विन इंजिन आहे, जे एका लढाऊ विमानाला सामर्थ्य पुरवू शकते. आम्ही हेलिकॉप्टर्सच्या दिशेने देखील काम करत आहोत. यासाठी टर्बोशाफ्ट तंत्रज्ञानावर काम सुरू असल्याचे श्रीधर यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महिन्याभराच्या आत अमेरिकेच्या NSA ने दिला पदाचा राजीनामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्ता संभाळून अद्याप महिनाही झालेला नसताना त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लायन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि अन्य अधिका-यांना रशियन राजदूताबरोबर झालेल्या चर्चेची दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे फ्लायन यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे.

अमेरिकेतील रशियन राजदूताबरोबर फोनवरुन अनेकदा चर्चा केली पण उपराष्ट्राध्यक्षांना अपूर्ण माहिती दिली असे फ्लायन यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

उपराष्ट्राध्यक्ष फ्लायन यांच्याकडून मिळणा-या माहितीवर अवलंबून होते. यावेळी रशियावर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधासंबंधीही चर्चा झाली. ट्रम्प यांनी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल किथ किलॉग यांची हंगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बँकांसाठी इंद्रधनुष्य 2.0 राबविणार

सरकारने इंद्रधनुष्य 2.0 योजना सुरू करण्याची तयारी केली आहे. हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पुन्हा भांडवल उभारण्यासाठीचा उपक्रम आहे. यामुळे बँकांना बासेल-3 नियमांची पूर्ती करण्यासाठी भांडवल उभारणीसाठी मदत होणार आहे.

अर्थ मंत्रालयाच्या कागदपत्रांनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेकडून इंद्रधनुष्य 2.0 साठी एसेट क्वॉलिटी रिव्हय़ू एक्यूआर नंतर अंतिम रुप देण्यात येईल. मार्च अखेरीस त्याला पूर्ण करण्यात येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 आरबीआयने डिसेंबर 2015 पासून बँकांच्या एसेट क्वॉलिटी रिव्हय़ूवर जोर दिला आहे. मोठय़ा अनार्जित कर्जाच्या खात्यांची ओळख करत त्यांच्यासाठी उपयुक्त राशि उपलब्ध करण्यास बँकांना सांगण्यात आले. या निर्णयाचा बँकांच्या समभागावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होणार आहे. मध्यवर्ती बँकेने ही प्रक्रिया मार्च 2017 पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

अर्थ मंत्रालयांतील कागदपत्रानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सरकारी क्षेत्रातील बँकांच्या एसेट क्वॉलिटी रिव्हय़ू आणि ताळेबंद सुधारणासाठी पावले उचलण्यात येत आहेत. यानंतर इंद्रधनुष्य 2.0 नुसार भांडवलाचा सुधारित कार्यक्रम प्रकाशित करण्यात येणार आहे. सरकारने 2015 मध्ये इंद्रधनुष्य कार्यक्रमाची घोषणा केली होती. यानुसार चार वर्षांच्या कालावधीत बँकांत 70 हजार कोटी रुपये ओतण्याची घोषणा केली होती. उर्वरित 1.1 कोटी रुपये बाजारातून उभारण्यात येणार आहे. बासेल-3 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जोखीम पातळी उभारण्यासाठी मानांकनासाठी बँकांना भांडवलाची आवश्यकता आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अवैध दारू धंद्याबाबत ग्रामरक्षक दलाची स्थापना

अवैध दारू धंद्याबाबत ग्रामीण भागात ग्रामरक्षक दल स्थापना करण्याचा कायदा मंजूर करण्यात आला आहे. या ग्रामरक्षक दलाच्या नियमावलीबाबत मंगळवारी मंत्रालयात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली.

ज्या गावातील लोक ग्रामरक्षक दल स्थापन करण्यास उत्सुक असतील त्या गावात 25 टक्के महिलांनी मतदान करून त्यांची संमती दर्शविल्यास त्या गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येईल.

गावांमधील अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, बाळगणे व विक्री आदींबाबतची माहिती पोलिस उत्पादन शुल्क विभागास कळविणे, तसेच गावांमधील मद्य सेवन करणाऱ्या मद्यपींना आळा घालण्यासाठी त्याचे समुपदेशन करणे, व्यसनाधिनता रोखण्यासाठी व मद्य प्राशन केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत लोकशिक्षण व जनजागृती करणे. पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहून साक्षीदार म्हणून कायदेशीर प्रक्रियांमध्ये सहकार्य करणे इत्यादी कामे ग्रामरक्षक दलाकडून करण्यात येतील, या विषयावर चर्चा झाली.

ग्रामरक्षक दलांनी वर्षातून दोनदा दारूबंदीबाबत जनजागृती अभियान केल्यास त्यांना सरकारकडून अनुदान व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन ग्रामरक्षक दलाला राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येईल.

तसेच ज्या संस्था दारूबंदीविषयी गावांमध्ये जनजागृती अभियान चालवितात अशा तीन संस्थांनादेखील शासनाकडून पुरस्कृत करण्यात येईल. या व्यतिरिक्त उत्पादन शुल्क विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना ही सरकारकडून सन्मानित करण्यात येईल. उत्पादन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येईल. उत्पादन शुल्क विभागांच्या कामांचा अढावा घेण्याची जबाबदारी या समितीवर असेल. ही समिती या विभागांच्या कामांचा नियमित अढावा घेईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹संवेदनशील "ब्राह्मोस' क्षेपणास्त्राचा पल्ला वाढणार

भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र असलेल्या "ब्राह्मोस'चा पल्ला साडेचारशे किमीपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून आज (बुधवार) करण्यात आली. ब्राह्मोस हे भारत व रशिया या देशांनी संयुक्तरित्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.

या नव्या रुपातील ब्राह्मोसची पहिली चाचणी येत्या 10 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. सध्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा पल्ला तीनशे किमी इतका आहे. याचबरोबर, येत्या अडीच वर्षांत ब्राह्मोसचा पल्ला आठशे किमीपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचा मनोदय डीआरडीओकडून व्यक्त करण्यात आला आहे. डीआरडीओचे मुख्य अधिकारी एस ख्रिस्तोफर यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. ब्राह्मोसचा पल्ला वाढविण्यात आल्यामुळे पाकिस्तानमधील कोणत्याही भागामध्ये या क्षेपणास्त्राने हल्ला करण्याची क्षमता भारतास प्राप्त होणार आहे.

क्षेपणास्त्रांच्या विकास कार्यक्रमाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटामध्ये (एमटीसीआर) नुकत्याच झालेल्या समावेशानंतर आता ब्राह्मोसचा पल्ला वाढविण्याचा भारताचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. एमटीसीआर अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळेच ब्राह्मोसचा पल्ला तीनशे किमीपर्यंत मर्यादित ठेवणे भारतास भाग पडले होते. मात्र आता एमटीसीआरचे निर्बंध हटविण्यात आल्याने ब्राह्मोससहित एकंदरच भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमास नवी उर्जा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्रोची विक्रमी झेप; १०४ उपग्रहांसह PSLV अवकाशी

विक्रमाची नवनवी शिखरं सर करणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) आज इतिहास रचला आहे. तब्बल १०४ उपग्रहांना घेऊन ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही सी ३७ ने आज सकाळी बरोब्बर ९.२८ वाजता अवकाशात झेप घेतली आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. अमेरिका, रशिया या अंतराळ संशोधनातील दिग्गजांनाही जे जमलं नव्हतं, ते भारतानं करून दाखवलं.

इस्रोच्या ‘पीएसएलव्ही सी ३७’च्या उड्डाणाकडे जगाचं लक्ष लागलं होतं. एकाच उड्डाणात १०० हून अधिक उपग्रह वाहून नेण्याचं महाकठीण आव्हान इस्रोचे शास्त्रज्ञ पेलणार का, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. सकाळपासून सगळ्यांच्या नजरा श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर खिळल्या होत्या. धावपळ, धडधड वाढत होती. अन् अखेर कालपासून सुरू झालेली उलटगणती ९.२८ वाजता संपली आणि ‘पीएसएलव्ही सी ३७’ने निर्विघ्नपणे अवकाशात उड्डाण केलं.

एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. स्वाभाविकच, तसा प्रयत्न रशिया, अमेरिकेनं करून पाहिला होता. परंतु, एका उड्डाणात ३७ उपग्रहांपेक्षा अधिक उपग्रह अवकाशात पाठवणं कुणालाच जमलं नव्हतं. २०१४ मध्ये रशियानं ही किमया केली होती. अमेरिकेला एका वेळी २९ उपग्रह अवकाशात पाठवणं जमलं होतं. पण भारतानं - इस्रोनं १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच केला आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत.

पीएसएलव्ही सी-३७ मधून अवकाशात पोहोचलेल्या १०४ उपग्रहांपैकी कार्टोसॅट-२ सह तीन उपग्रह भारताचे आहेत, तर उर्वरित १०१ उपग्रह अन्य देशांचे आहेत. त्यात एकट्या अमेरिकेचे ८८ उपग्रह असून जर्मनी, इस्रायल, कझाकिस्तान, यूएई, नेदरलँड, स्वित्झर्लंडनंही इस्रोवर विश्वास दाखवून आपले उपग्रह अवकाशात पाठवले आहेत..

भारताच्या तीन उपग्रहांचं एकूण वजन ७६८ किलो आहे तर उरलेल्या उपग्रहांचं एकूण वजन ६०० किलो आहे. हे सगळे उपग्रह एकमेकांना न धडकता पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करण्याचं आव्हान इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे होतं. ते त्यांनी समर्थपणे पेललं असून त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

अवकाश क्षेत्रातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील खासगी कंपन्या आपले उपग्रह नासा किंवा अमेरिकी कंपन्यांऐवजी ‘इस्रो’च्या माध्यमातून प्रक्षेपित करणे किफायतशीर समजत आहेत, यातच येत्या काळात भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधीची झलक दिसून येते.

यापूर्वी एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह पाठविण्याचा विक्रम रशियाच्या नावावर आहे, त्यांनी एकाच प्रक्षेपकातून 37 उपग्रह पाठविले होते. भारताने 2015 मध्ये 23 उपग्रह यशस्वीरीत्या पाठविले होते, परंतु आजची झेप ही सर्वांत मोठी होती. 104 उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणासह भारताने नवा इतिहास रचला. इस्त्रोने या मोहिमेसाठी एक्सएल श्रेणीतील सर्वांत ताकदवान प्रक्षेपक वापरला. यापूर्वी तो चंद्रयान या मोहिमेसाठी वापरण्यात आला होता. या उपग्रहातील 101 उपग्रह हे प्रवासी असून त्यात अमेरिकेच्या 96 उपग्रहांसह इस्त्राईल कझाकस्तान, नेदरलॅण्ड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती या इस्त्रोच्या पाच आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पाच उपग्रहांचाही समावेश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘आयपीएल’च्या यंदाच्या पर्वात अफगाणी खेळाडूंना संधी

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) या देशातील सर्वाधिक लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. खेळाडूंच्या लिलावात सध्या दमदार फॉर्मात असलेल्या खेळाडूंवर लागणाऱया बोलीवर तर सर्वांचे लक्ष असेलच, पण यावेळी सहकारी संघांमधील सहा खेळाडूंना देखील यावेळी आयपीएलमध्ये आपले नशीब आजमवण्याची संधी मिळणार आहे. यातील पाच खेळाडू हे अफगाणिस्तानच्या संघाचे असणार आहेत. अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद याने गेल्या काही वर्षांत आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेहजाद अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा मुख्य दुवा आहे. अफगाणिस्तानकडून खेळताना शेहजादने ४८ सामन्यांत ४ शतकं आणि ७ अर्धशतके ठोकली आहेत. वैयक्तिक १३१ धावांची सर्वोत्तम खेळी देखील त्याने साकारली आहे. त्यामुळे शेहजादला यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. शेहजादला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी संघ उत्सुक असतील असे सांगण्यात येत आहे. मोहम्मद शेहजादसोबतच अफगाणिस्तानचा कर्णधार असगर स्तानजकई याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू मोहम्मद नबीचे नाव देखील आघाडीवर आहे. ट्वेन्टी-२० विश्वात नबीने ७०४ धावा केल्या असून ५६ विकेट घेतल्या आहेत. दौलत जारदान याच्यावरही आयपीएलच्या संघ मालकांची नजर यावेळी पडू शकते. ३२ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तर ४४ धावा देऊन ४ विकेट्स ही त्याची सर्वाधिक वैयक्तिक कामगिरी राहिली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹खगोल वैज्ञानिकांकडून १०० संभाव्य बाह्य़ग्रहांचा शोध

वैज्ञानिकांनी १०० संभाव्य बाह्य़ग्रह शोधून काढले असून त्यात ८.१ प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा समावेश आहे. खगोल वैज्ञानिकांनी रॅडिअल व्हेलॉसिटी पद्धतीच्या वापरातून घेतलेली निरीक्षणे सादर केली आहेत.

ग्रहाचे गुरूत्व हे ताऱ्यावर परिणाम करत असते या तत्त्वावर आधारित ही निरीक्षण पद्धत आहे. खगोलवैज्ञानिकांच्या मते ग्रहाची थरथर अभ्यासून ताऱ्यात निर्माण होणारे गुरूत्वाचे बदल लक्षात येतात. दोन दशके रॅडिअल व्हेलॉसिटी तंत्राने ग्रहशोधनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात हवाईतील मोना किया येथे डब्ल्यू एम केक वेधशाळेच्या ‘केक १’ या दहा मीटरच्या दुर्बिणीवरील वर्णपंक्तीमापी वापरण्यात आला आहे. या माहितीत एकूण ६१ हजार मापने असून १६०० ताऱ्यांचा त्यात समावेश आहे. याची माहिती जाहीर करून वैज्ञानिकांनी संभाव्य बाह्य़ग्रहांच्या संशोधनासाठी आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे.

सांताक्रूझ येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील स्टीव्ह व्हॉग्ट यांनी सांगितले की, हायरेज वर्णपंक्तमापीच्या मदतीने एवढे चांगले काम बाह्य़ग्रहांच्या संदर्भात होईल असे वाटले नव्हते. आता ही निरीक्षणे तिसऱ्या दशकात पोहोचली असून आता आम्ही यातील काही माहिती जाहीर केली आहे.

हर्टफोर्डशायर विद्यापीठाचे मिक्को तुओमी यांनी सांगितले की, बाह्य़ग्रहांबाबत बरीच विश्वासार्ह माहिती मिळाली असून १०० संभाव्य ग्रह यात शोधले आहेत. ते जीजे ४११ या ताऱ्याभोवती फिरत असून याच ताऱ्याचे नाव लॅलांडे २११८५ असे आहे.

तो सूर्याला चौथा जवळचा तारा आहे व सूर्याच्या ४० टक्के इतके त्याचे वस्तुमान आहे. त्याच्याभोवतीच्या एका ग्रहाचा कक्षीय काळ दहा दिवसांचा आहे, त्यामुळे तो पृथ्वीसारखा नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹घाऊक महागाईचा उच्चांकी फणा

नवीन वर्षांच्या सुरुवातीचा जानेवारी महिन्यांत किरकोळ महागाई दराने उसंत घेतली असली तरी घाऊक महागाईचा दर मात्र या महिन्यांत गेल्या ३० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. अन्नधान्याच्या महागाई दरात स्वस्ताई असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या वाढलेल्या किमतीतून देशांतर्गत इंधनाच्या वाढत्या दरांमुळे या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

आधीच्या, डिसेंबर २०१६ मध्ये हा दर ३.३९ टक्के तर वर्षभरापूर्वी, जानेवारी २०१६ मध्ये घाऊक किंमत निर्देशांक उणे १.०७ टक्के या पातळीवर होता. यापूर्वी घाऊक महागाई दर जुलै २०१४ मध्ये ५.४१ टक्के असा सर्वाधिक नोंदला गेला होता.

गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर सलग दुसऱ्या महिन्यात घसरताना उणे ०.५६ टक्के राहिला आहे. मात्र इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई दर जानेवारीत दुपटीने विस्तारत १८.१४ टक्क्यांवर गेला आहे. डिसेंबरमध्ये इंधन दर ८.६५ टक्के होता. यंदा डिझेल व पेट्रोलच्या किमती अनुक्रमे ३१.१० व १५.६६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला इंधन उत्पादक देशांची संघटना ओपेकने गेल्या आठ वर्षांमध्ये प्रथमच इंधन उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेलाचे दर वाढते राहिले. एलएनजीचेही दर यानंतर लक्षणीय वाढले.

अन्नधान्यांमध्ये भाज्यांच्या किमती सलग पाचव्या महिन्यात उणे स्थितीत राहताना जानेवारीत ३२.३२ टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. यामध्ये कांद्याचे दर उणे २८.८६ टक्के असे किमान राहिले आहेत. डाळी (६.२१ टक्के), बटाटे (उणे ०.२० टक्के) यांचेही दर घसरले. खाद्यान्नांमध्ये अंडी, मांस, मासे यांच्या किमती जानेवारीत ३.५९ टक्क्यांपर्यंत वाढल्या. साखरेचे दर २२.८३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. निर्मिती क्षेत्रातील वस्तूंमध्येही डिसेंबरमधील ३.६७ टक्क्यांच्या तुलनेत गेल्या महिन्यात ३.९९ टक्के वाढले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शैक्षणिक अभ्यासक्रमात सिंगूर आंदोलनाचा समावेश

 सिंगूर आंदोलन लवकरच इतिहासाच्या पुस्तकांचे भाग बनणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने आपल्या शाळांमध्ये याच वर्षापासून हा मुद्दा इतिहासाच्या अभ्यासक्रमात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना पराभूत करत तृणमूल काँग्रेस सत्तेत येण्यामागे सिंगूर आंदोलनाला मोठे कारण मानले जाते. शिक्षणमंत्र्यांनी सिंगूर आंदोलनाला शेतकऱयांचा ऐतिहासिक विजय ठरविले. त्यांनी आठवी इयत्तेच्या इतिहासाच्या पुस्तकात सिंगूर आंदोलनावर एक विस्तृत धडा असेल असे म्हटले. सिंगूर आंदोलनाबरोबरच तेभागा आणि कृषक आंदोलनाला देखील शालेय अभ्यासक्रमात सामील केले जाणार आहे. हे आंदोलन देशाच्या इतिहासाच्या मैलाच्या दगडांपैकी एक असल्याचे विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले.

नव्या पुस्तकांचे वितरण शाळांमध्ये करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाद्वारे सिंगूरमध्ये टाटा कंपनीद्वारे अधिग्रहित जमीन परत शेतकऱयांमध्ये वितरित करण्याचा निर्णय देण्यात आल्यानंतर राज्य शिक्षण विभागाने अभ्यासक्रम समितीला याविषयी एक प्रस्ताव पाठविला होता. शिक्षण विभागाने माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात सिंगूर आंदोलन सामील करण्याच्या प्रस्तावावर समितीकडून मंजुरी मागितली होती. समितीद्वारे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हा धडा इयत्ता 8 वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात जोडण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सलग पाच महिन्यात निर्यात वृद्धी

जानेवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात निर्यातीमध्ये वृद्धी नोंदविण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 22.1 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली. आयातीमध्ये 10.7 टक्क्यांनी वाढ झाली. देशाच्या व्यापारी तुटीमध्येही वाढ झाली. व्यापारी तूट 9.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जानेवारीत व्यापारी तूट 7.6 अब्ज डॉलर्स होती. गेल्या महिन्यात हा आकडा 10.36 अब्ज डॉलर्स होता. एप्रिल-जानेवारी 2016-17 दरम्यान भारताची व्यापार तूट 86.3 अब्ज डॉलर्स होता. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 107.7 अब्ज डॉलर्स होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ई-व्यापार क्षेत्राचा वेगाने वाढ

2021 पर्यंत आवाका 3.52 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज

भारतात ई-व्यापाराचा वेगाने वाढत आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अहवालात, ई-व्यापार क्षेत्र 2021 पर्यंत 3.52 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते असे म्हणण्यात आले. स्मार्टफोनच्या किमतीत घसरण, कमी डेटा दर आणि वाढत्या स्मार्टफोनच्या वापरामुळे डिजिटल क्षेत्रातील खरेदी वाढत असल्याचे सांगण्यात आले.
भारतातील या क्षेत्रातील वाढत्या संधीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, अपॅरल, होमवेअर आणि फर्नीचर, लक्झरी, आरोग्य, एफएमसीजी, फूड आणि किराणा वस्तूच्या ऑनलाईन खरेदीमुळे ई-व्यापार क्षेत्राचा विस्तार वाढणार आहे.

2025 पर्यंत ग्राहक इलेक्ट्रॉनिकची ई-व्यापारात मागणी सर्वात जास्त राहणार आहे. ही मागणी 38 ते 42 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या हा हिस्सा 13 ते 15 टक्के आहे. फूड आणि किराणा वस्तूंच्या मागणीत 1 ते 3 टक्क्यांनी वाढ होत या क्षेत्रातील ही कमी राहील. गेल्या तीन वर्षात डिजिटल शॉपिंगमध्ये 20 टक्क्यांनी वाढ होत आहे. 2013 मध्ये 3 टक्क्यांवर असणारा हा हिस्सा 2016 मध्ये 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. यादरम्यान ग्राहकांवरील डिजिटल प्रभाव 9 टक्क्यांवरून वाढत 30 टक्क्यांवर गेला आहे.

भारतात ऑनलाईन खरेदी करण्याच्या संख्येत वाढ होण्याचे कारण सवलत देण्यात येणे ही आहे. ऑनलाईन खरेदीवर सवलत देण्यात येत असल्याने 22 टक्के लोकांनी आपण खरेदी करत असल्याचे मान्य केले. 2014 मध्ये हा आकडा 40 टक्के होता.

स्वस्त मोबाईल आणि डेटाने वाढ…

स्मार्टफोनच्या किमतीत घसरण, कमी डेटा दर आणि वाढता स्मार्टफोनचा वापर यामुळे डिजिटल खरेदीत वाढ होत आहे. स्मार्टफोनचा वापर गेल्या काही वर्षात 3 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ऑस्ट्रेलियाचा ऍडॅम व्होजेस निवृत्त

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ऍडॅम व्होजेसने मंगळवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली निवृत्ती जाहीर केली. 37 वर्षीय व्होजेसने 20 कसोटी, पाच शतके, चार अर्धशतकांसह 61.87 धावांच्या सरासरीने 1485 धावा जमविल्या आहेत. त्याने 31 वनडे आणि सात टी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये किमान 20 सामन्यांत फलंदाजी सर्वाधिक धावांची सरासरी राखणाऱया फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे दिवंगत सर डॉन ब्रडमन आघाडीवर असून त्यानंतर व्होजेस दुसऱया स्थानावर आहे. सध्या लंकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर आहे. बुधवारपासून लंका आणि अध्यक्षीय इलेव्हन संघ यांच्यात सरावाचा सामना होणार असून व्होजेस अध्यक्षीय संघाचे नेतृत्व करणार आहे. व्होजेसचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ऍडलेड येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दिवस-रात्रीच्या तिसऱया कसोटीवेळी व्होजेसला ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'नेत्र'मुळे भारतीय सीमेत घुसण्याआधीच होणार पाक फायटर विमानांचा खात्मा

भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले अॅवॉक्स टेहळणी विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले आहे. 'नेत्र' असे या विमानाला नाव देण्यात आले असून, जगातील दुसरा मोठा एअर शो असलेल्या 'एरो इंडिया' मध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी हवाई दल अधिका-यांच्या ताब्यात हे विमान सोपवले. हवाई दलाच्या येलहंका तळावर हा छोटेखानी सोहळा पार पडला.

'नेत्र' मुळे हवाई दलाच्या क्षमतेमध्ये वाढ झाली असून, हवाई युध्दात हे विमान गेमचेंजर ठरेल. जमीन, पाणी आणि हवेमधून होणा-या हल्ल्याची माहिती मिळेल. शत्रूची क्षेपणास्त्रे, विमाने 300 कि.मी. अंतरावर असताना 'नेत्र'कडून नियंत्रण कक्षाला आगाऊ सूचना मिळेल. त्यामुळे हल्ला परतवून लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

डीआरडीओच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीमने महिला वैज्ञानिक जे.मंजुला यांच्या नेतृत्वाखाली हे विमान विकसित केले आहे. महिला वैज्ञानिकांनी या विमानाच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. 'नेत्र'मुळे सध्या पाकिस्तानकडे जी क्षमता आहे त्यापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

भारतातील हवा प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 ने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून चीन पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. भारतात गतवर्षी प्रदूषणामुळे तब्बल 2 लाख 54 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फक्त चीन आणि भारतातील मृतांचा आकडा जगभरातल्या आकडेवारीच्या अर्ध्याहून जास्त आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन वायू निर्माण होत असून श्वसनेंदियांचे रोग जडत आहेत. गतवर्षी दिवाळीत दिल्ली आणि एनसीआर परिसरात पसरलेली प्रदूषणाची चादर यामुळे ही समस्या किती जठील झाली आहे याची प्रचिती आली होती. ओझोन वायूमुळे होणा-या मृत्यूंचा आकडा भारतात जास्त आहे. भारताचा हा आकडा बांगलादेशच्या 13 तर पाकिस्तानच्या 21 पट जास्त आहे.

जगातील 92 टक्के लोकसंख्या ही अशुद्ध हवेत जगत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 'जगभरात हवा प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. या नव्या अहवालामुळे वेळेआधीच मृत्यू होण्यामध्ये हवा प्रदूषणाचा किती हात आहे हे लक्षात येतं', असं हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटचे संचालक डॅन ग्रीनबॉम यांनी सांगितलं आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कृषी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजनेला प्रारंभ

कृषी पदवीधरांचे सर्व अभ्यासक्रम रोजगाराशी निगडीत करण्यात आले असून हे अभ्यासक्रम व्यावसायिभिमुख करण्यात आल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितले. नवी दिल्लीतल्या कुलगुरू आणि संचालकांच्या वार्षिक परिषदेत त्यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

युवक हे देशाची शक्ती असून कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी या क्षेत्राकडे वळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांची यात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्टुडंट रेडी’ या योजनेअंतर्गत 2016-17 या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला 1 हजार रुपयांवरुन 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच पीडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजनेअंतर्गत 5 कोटी 35 लाख रुपयांच्या निधीतून 100 केंद्र सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

भारत आणि सेनेगल यांच्यातल्या आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या विभागात प्रामुख्याने सहकार्य करण्यावर भर राहील:

1) एकात्मिक रोग निदान आणि देखरेख
2) वैद्यकीय संशोधन
3) आपत्कालीन मदत
4) रुग्णालय व्यवस्थापन
5) औषध आणि औषध निर्माण उत्पादन आणि रुग्णालय साधने
6) पारंपरिक औषधे
7) एड्स नियंत्रण
8) परस्पर हिताचे आणखी काही विभाग
सहकार्याविषयी अधिक तपशील ठरवण्यासाठी आणि सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी गटाची स्थापना करण्यात येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमिताभ कांत यांनी भारत नावीन्यता निर्देशांक सुरू केला

2017 पासून नावीन्यतेनुसार राज्यांची क्रमवारी

भारताला नावीन्यता-प्रणित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नीती आयोग, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि भारतीय उद्योग महासंघाने एकत्रितपणे ‘भारत नाविन्यता निर्देशांक’ सुरू केला आहे. देशाच्या पहिल्या ऑनलाईन नाविन्यता निर्देशांक पोर्टलच्या माध्यमातून नाविन्यतेनुसार राज्यांची क्रमवारी निश्चित केली जाईल.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज या पोर्टलचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या संकेतस्थळावरुन या पोर्टलला भेट देता येईल. नीती आयोग या पोर्टलवरील माहिती नियमितपणे अद्ययावत करेल असे कांत म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त होणार

मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त होणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला सांगितले. नियोजन आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांच्यासोबत काल मुंबईत त्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीत, हागणदारीमुक्त होण्याचे ध्येय महाराष्ट्र लवकरच गाठेल असा विश्वास क्षत्रिय यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सरकार केवळ हागणदारीमुक्त होण्याचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील नाही तर राज्यात स्वच्छ भारत अंमलबजावणीचा भाग म्हणून स्वच्छतेच्या इतर सवयी नागरिकांच्या बाणविण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. राज्यात स्वच्छ कार्यालय, स्वच्छ ग्रामपंचायती, स्वच्छ शाळा अशा स्वच्छताविषयक विविध मोहिमा राबविल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या या मोहिमांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन नियोजन आणि स्वच्छता मंत्रालयाच्या सचिवांनी दिले. जिल्हा स्वच्छ भारत प्रेरक उपक्रमांतर्गंत राज्यांमध्ये स्वच्छ भारत मोहिमेच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी जिल्हा पातळीवर प्रेरकाची नियुक्ती केली जाणार आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांसमोर एक सादरीकरण करण्यात आले. शालेय स्वच्छतेसह स्वच्छताविषयक अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी नमूद केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसाठी एमआरआय स्कॅनिंगची सुविधा

सार्वजनिक आरोग्य ही प्रामुख्याने संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी असते आणि राज्यातील नागरिकांना एमआरआयसह इतर आरोग्य सुविधा पुरविणे हा त्या जबाबदारीचा भाग आहे. आपल्या रुग्णालयांमध्ये एमआरआय स्कॅनिंगची सुविधा सुरु करण्यासाठी त्यांना मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे केंद्र सरकारने आज राज्यसभेत स्पष्ट केले.

अशा प्रकारचे सर्व प्रस्ताव तातडीने तपासले जाऊन सक्षम प्राधिकरणामार्फत त्यांना आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वार्षिक सागरी शक्ती परिषद – 2017

नवी दिल्लीत येत्या 9 ते 10 फेब्रुवारी दरम्यान वार्षिक सागरी शक्ती परिषद-2017 चे आयोजन करण्यात आले आहे. “नील अर्थव्यवस्था : संकल्पना,घटक आणि विकास” ही या परिषदेची संकल्पना आहे.

परिषदेत एकूण पाच सत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या सत्रांमध्ये नील अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकास, सागरी सुरक्षा आणि उद्योग अशा विविध विषयांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ते अध्यक्षीय भाषण करणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार

देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सौर दिवे पुरवण्याच्या कामी आयआयटी मुंबईने पुढाकार घेतला आहे. संस्थेने आतापर्यंत देशभरात एक दशलक्ष सौर दिव्यांचे वितरण केले असून तब्बल सात दशलक्ष सौर दिव्यांचे वितरण करण्यासाठी नियोजन करण्याची आणि अंमलबजावणीची जबाबदारी संस्थेवर सोपवण्यात आली आहे.

हा उपक्रम राबवताना आयआयटी मुंबईने ग्रामीण भागातील स्थानिक सौर उत्पादकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राजस्थानमध्ये दुंगारपूर येथे सौर उत्पादने घेणारा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प आदिवासी महिलांचा असून त्याचे संपूर्ण कामकाज या महिलाच बघतात. या महिलांना आयआयटी मुंबईतर्फे संबंधित कामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

🔹सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार

देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सौर दिवे पुरवण्याच्या कामी आयआयटी मुंबईने पुढाकार घेतला आहे. संस्थेने आतापर्यंत देशभरात एक दशलक्ष सौर दिव्यांचे वितरण केले असून तब्बल सात दशलक्ष सौर दिव्यांचे वितरण करण्यासाठी नियोजन करण्याची आणि अंमलबजावणीची जबाबदारी संस्थेवर सोपवण्यात आली आहे.

हा उपक्रम राबवताना आयआयटी मुंबईने ग्रामीण भागातील स्थानिक सौर उत्पादकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राजस्थानमध्ये दुंगारपूर येथे सौर उत्पादने घेणारा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प आदिवासी महिलांचा असून त्याचे संपूर्ण कामकाज या महिलाच बघतात. या महिलांना आयआयटी मुंबईतर्फे संबंधित कामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹2015 वर्षासाठी पंतप्रधान श्रम पुरस्कारांची घोषणा

केंद्र सरकारने आज 2015 वर्षासाठी पंतप्रधान श्रम पुरस्कारांची घोषणा केली. 500 किंवा त्याहून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांमधील 56 कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

यावर्षी प्रतिष्ठेच्या श्रम रत्न पुरस्कारासाठी कोणीही योग्य उमेदवार सापडला नाही. श्रम भूषण पुरस्कारासाठी चार नामांकने, श्रम वीर/श्रम वीरांगनासाठी 24 आणि श्रम श्री/श्रम देवी पुरस्कारांसाठी 28 नामांकनांची निवड करण्यात आली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील महत्त्वाच्या 91 जलसाठ्यातील पाण्याच्या पातळीमध्ये दोन टक्यांनी घट

देशभरातील महत्त्वाच्या 91 जलसाठ्यांमध्ये 19 जानेवारी 2017 रोजी संपलेल्या आठवड्यात 82.915 बीसीएम जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण साठवण क्षमतेच्या 53 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या या काळातील तुलनेमध्ये हे प्रमाण 126 टक्के आहे तर गेल्या दहा वर्षाच्या सरासरीनुसार जलसाठ्याचे प्रमाण 99 टक्के आहे.

देशातील 91 जलसाठ्यांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता 253.338 बीसीएम आहे. सध्या या जलसाठ्यांमध्ये 157.799 बीसीएम पाणी आहे, हे प्रमाण जवळपास 62 टक्के आहे. 91 जलसाठ्यांपैकी 37 ठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले असून त्याद्वारे 60 मेगावॅटपेक्षा जास्त ऊर्जेची निर्मिती केली जाते.

गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश पश्चिम क्षेत्रामध्ये होतो. या क्षेत्रात 27 जलसाठे असून त्यांची एकूण 27.07 बीसीएम जलसाठा क्षमता आहे. या जलसाठ्यांमध्ये एकूण क्षमतेच्या 65 टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात 37 टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर गेल्या दहा वर्षांची सरासरी पाहिली तर या काळात 61 टक्के जलसाठा उपलब्ध होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रेल्वेचे 41के अभियान

भारतीय रेल्वेने ऊर्जेसंदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमांसंदर्भात झालेल्या संबंधितांच्या चर्चेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 41के अभियानाची माहिती दिली. पुढल्या दशकात रेल्वेचा 41 हजार कोटी रुपये ऊर्जा खर्च वाचवण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवले आहे, असे प्रभू यांनी सांगितले. भारतीय रेल्वेने 1000 मेगावॅट सौर ऊर्जेचे आणि 200 मेगावॅट पवन ऊर्जेचे लक्ष्य ठेवले आहे, असे प्रभू यांनी यावेळी सांगितले. चर्चेला रेल्वे मंडळातील वरिष्ठ अधिकारी, ऊर्जा क्षेत्रातल्या सरकारी आणि खासगी कंपन्यांमधले प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जगातला सर्वात मोठा एलईडी पथदिवे कार्यक्रम पियुष गोयल यांच्याकडून राष्ट्राला अर्पण

दक्षिण दिल्ली महापालिका क्षेत्रात राबवलेला पथदिवे राष्ट्रीय कार्यक्रम केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्राला अर्पण केला. हा जगातला सर्वात मोठा पथदिवे बदलण्याचा कार्यक्रम आहे.

महाराष्ट्रासह पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यात पथदिवे राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत 15.59 लाख पथदिव्यांच्या जागी एलईडी बल्ब लावण्यात आले आहेत. यामुळे 20.66 कोटी किलोवॅट ऊर्जेची बचत झाली आहे.
जनतेला सबल करण्याबरोबरच देशातले ऊर्जा पायाभूत जाळे मजबूत आणि सशक्त करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे जनतेला अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठा वाजवी दरात उपलब्ध होईल, असे गोयल यांनी यावेळी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ग्रामीण गृहबांधणी लक्ष्य 2016-17 मध्ये दुप्पट-ग्रामीण विकास मंत्रालय

ग्रामीण विकास विभागाला 2016-17 या वर्षात 33 लाख घरांची निर्मिती पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आलं होते. यामध्ये इंदिरा आवास योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या आणि 1 एप्रिल 2016 पर्यंत बांधकाम अपुऱ्या राहिलेल्या घरांचाही समावेश होता. यापैकी अनेक कामं अनेक वर्षे अपूर्ण होती. या घरांपैकी 21-57 लाख घरांचे काम आतापर्यंत पूर्ण झालं आहे. 2012-13 ते 2014-15 या कालावधीत दरवर्षी पूर्ण झालेल्या कामांपेक्षा हे काम दुप्पट आहे.
चालू आर्थिक वर्षात राज्यांच्या भागीदारीतून 33 लाख घरं पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत.

चालू आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवास योजनेचा औपचारिक प्रारंभ केला. याआधी मंजूर झालेल्या 33 लाख घरांबरोबर नवीन प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत आता घरांच्या संख्येत 44 लाखापर्यंत वाढ झाली आहे. राज्यांना लक्ष्याबाबत माहिती देण्यात आली आहे. 2011 च्या सामाजिक-आर्थिक मागासवर्ग जनगणनेनुसार आणि ग्रामसभेच्या मदततीने लाभार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. राज्यांनी घर बांधणीसाठी नांव नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत 14 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

44 लाख घरांपैकी बहुतेक घरांचे काम डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षात एकूण 1 कोटी 33 लाख घरे पूर्ण होतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हातमाग विणकरांसाठी ‘बुनकर मित्र’ हेल्पलाईन सुरू

तंत्रज्ञान, युवक आणि परंपरा यांचा अपूर्व संगम-केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हातमाग विणकरांसाठी ‘बुनकर मित्र’ या नावाने नुकतीच हेल्पलाईन सुरू करण्यात आली. ही हेल्पलाईन म्हणजे तंत्रज्ञान, युवक आणि परंपरा यांचा अपूर्व संगम असल्याचे मत यावेळी स्मृती इराणी यांनी व्यक्त केले. या विणकरांचे प्रश्न, तक्रारी, गाऱ्हाणी, ताबडतोब सोडविण्यासाठी उपयोगी ठरणारी हेल्पलाईन विकसित केल्याबद्दल स्मृती इराणी यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले.

या हेल्पलाईनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील कोणत्याही विणकऱ्याला संपर्क साधून मार्गदर्शन घेता येणार आहे. ही सेवा आठवड्याचे सातही दिवस सकाळी 11.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलगू, बंगाली, कन्नड आणि आसामी भाषांतून सध्या ही सेवा उपलब्ध असणार आहे.

‘बुनकर मित्र’ हेल्पलाईनच्या आधारे पुढील सेवा देण्यात येणार आहेत.

· तांत्रिक गोष्टींसाठी सहाय्य
· मार्गदर्शन दिले जाणारी क्षेत्रे
· कच्च्या मालाचा पुरवठा
· पतपुरवठ्याची उपलब्धता
· गुणवता नियंत्रण
· बाजारपेठेची माहिती-संलग्नता
· विविध योजना आणि प्रक्रिया यांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन!

यंदाच्या दमदार पावसाळ्याच्या जोरावर तीन वर्षांपूर्वीचा विक्रम इतिहासजमा करीत तांदूळ, गहू, भरड धान्य, मका, डाळी, तेलबिया या प्रमुख पिकांच्या विक्रमी उत्पादनासह एकूण अन्नधान्याचा २७१.९८ दशलक्ष टन उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्तविला आहे.

विविध राज्यांकडून तसेच अन्य स्रोतांकडून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे बुधवारी देशातील प्रमुख पिकांचा दुसरा अग्रीम अंदाज जाहीर करताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने चालू वर्षात धानाचे विक्रमी १०८.८६ दशलक्ष टन, गव्हाचे विक्रमी ९६.६४ दशलक्ष टन, भरड धान्याचे विक्रमी ४४.३४ दशलक्ष टन, मक्याचे विक्रमी २६.१५ दशलक्ष टन, डाळींचे विक्रमी २२.१४ दशलक्ष टन होण्याची शक्यता वर्तविली आहे. चना डाळीचे ९.१२ दशलक्ष टन, तुरीचे विक्रमी ४.२३ दशलक्ष टन आणि उडीदाचे विक्रमी २.८९ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलबियांचेही ३३.६० दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता असून त्यात सोयाबीन १४.१३ दशलक्ष टन, भुईमूग ८.४७ दशलक्ष टन आणि एरंडीच्या १.७४ दशलक्ष टन उत्पादनाचा समावेश आहे. कापसाच्या ३२.५१ दशलक्ष गाठींचे (प्रतिगाठ १७० किलो कापूस) आणि उसाचे ३०९.९८ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता या दुसऱ्या अग्रीम अंदाजात वर्तविण्यात आली आहे. दमदार मान्सून आणि सरकारच्या धोरणात्मक पुढाकारामुळे यंदा देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्याचा दावा कृषी मंत्रालयाने केला आहे.

उत्पादन ७० लाख टनांनी जास्त
२०१३-१४ सालच्या एकूण धान्य उत्पादनाच्या २६५.०४ दशलक्ष टन विक्रमाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन ६९.४ लाख टनांनी जास्त आहे. चालू वर्षातील उत्पादन हे २०११-१२ ते २०१५-१६ दरम्यानच्या पाच वर्षांतील अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा १४.९७ दशलक्ष टनांनी जास्त असल्याचे कृषी खात्याने म्हटले आहे. गेल्यावर्षीच्या अन्नधान्य उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे खाद्यान्न उत्पादन २०.४१ दशलक्ष टनांनी जास्त ठरणार आहे.

यंदा धानाच्या १०८.८६ दशलक्ष टन उत्पादनाने २०१३-१४ चा १०६.६५ दशलक्ष टन उत्पादनाचा विक्रम मोडीत निघणार आहे. पाच वर्षातील धानाच्या १०५.४२ दशलक्ष टन सरासरी उत्पादनापेक्षा यंदाचे उत्पादन ३.४४ दशलक्ष टनांनी जास्त आहे. २०१५-१६ साली धानाचे उत्पादन १०४.४१ दशलक्ष टन होते.

यंदा गव्हाच्या ९६.६४ दशलक्ष टन उत्पादनानेही नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे कृषी खात्याने म्हटले आहे. २०१३-१४ च्या ९५.८५ दशलक्ष टन विक्रमी उत्पादनापेक्षा यंदाचे उत्पादन जास्त ठरणार आहे. २०१५-१६ च्या ९२.२९ दशलक्ष टन गव्हाच्या उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन ४.३६ दशलक्ष टनांनी जास्त आहे. जाड्याभरड्या धान्याचे उत्पादन ४४.३४ दशलक्ष टनांचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. २०१०-११ मधील ४३.४० दशलक्ष टन विक्रमापेक्षा यंदाचे उत्पादन ९.४ लाख टनांनी जास्त आहे. सर्वप्रकारच्या डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रफळ वाढल्यामुळे २०१६-१७ मध्ये डाळींचे एकूण उत्पादन विक्रमी २२.१४ दशलक्ष टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. २०१३-१४ साली डाळींचे विक्रमी १९.२५ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. गेल्या मोसमात डाळींचे उत्पादन १६.३५ दशलक्ष टन झाले होते.

गेल्या मोसमाच्या तुलनेत ८.३५ दशलक्ष टनांच्या वाढीसह यंदा तेलबियांचे उत्पादन ३३.६० दशलक्ष टनांच्या विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या मोसमातील ३४८.४५ दशलक्ष टनांच्या तुलनेत ऊसाचे उत्पादन घटून ३०९.९८ दशलक्ष टन झाले आहे. यंदा कपाशीची कमी क्षेत्रफळाखाली पेरणी होऊनही उच्च उत्पादकतेमुळे २०१५-१६ च्या ३०.०१ दशलक्ष गाठींच्या तुलनेत कापसाचे यंदा ३२.५१ दशलक्ष गाठींचे उत्पादन झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जीवघेणी प्रदूषित हवा

मुंबईमध्ये मालाड आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेचा दर्जा कायमच धोकादायक स्तराचा इशारा देत असतो. मुंबईच्या हवेची प्रतवारीही अनेकदा वाईट असते. या हवेमुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडतात. केवळ मुंबईच नाही तर देशातील हवेच्या प्रतवारीबद्दल चिंता व्यक्त करणारा अहवाल बोस्टन येथे प्रकाशित करण्यात आला आहे. द स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०१७ या अहवालातून २.५ पीएम या प्रदूषकांमुळे देशभरात अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. भारतामध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १९९० पासून तब्बल ४८ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा गांभीर्याने विचार करण्यासाठी ही धोकादायक घंटा आहे.

ओझोनचा थर विरळ होत असल्याने अकाली मृत्यू होणाऱ्या भारतीयांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. यानुसार २०१५मध्ये २ लाख ५४ हजार लोकांचा मृत्यू ओढवला.

२०१५ मधील प्रदूषणाचे मृत्यू

-चीन- ११.८ लाख भारत- १०.९० लाख
-युरोपियन देश - २.५७ लाख रशिया- १.३७ लाख
-पाकिस्तान- १.३५ लाख बांग्लादेश- १.२२ लाख
-अमेरिका- ८८ हजार ४००
-जागतिक स्तरावर २.५ प्रदूषकांमुळे ४२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
-जगातील ९२ टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेमध्ये श्वासोच्छवास करते. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये प्रदूषित हवेमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के आहे. प्रदूषित हवेमुळे झालेल्या मृत्यूमध्ये चीन प्रथम क्रमांकावर आहे. तर, या सूचीत भारताचा क्रमांक दुसरा आहे

श्वसनविकार बळावले…

देशातील एका संस्थेच्या पुढाकाराने देशातील १३ हजार डॉक्टरांनी २०११च्या फेब्रुवारीत एका ठराविक दिवशी देशाच्या वेगवेगळ्या भागातील अडीच लाख रुग्ण तपासले होते. या तपासण्यांचे विश्लेषण असता त्यातील एक लाख रुग्णांमध्ये खोकला, दमा आदी श्वसनाचे विकार आढळून आले. गेल्या सात वर्षांत श्वसनाच्या विकारात अधिकच वाढ झाल्याचे डॉक्टर सांगतात.

सीओपीडी दुसऱ्या क्रमांकावर

देशात हृदयविकाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एक क्रमांकावर आहे. त्याखालोखाल सीओपीडीने (श्वसनाचा न बरा होणारा आजार) मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण असल्याचे प्रख्यात मधुमेह व अस्थमा तज्ज्ञ डॉ. मनीष सचदेव सांगतात.

डिझेल घातक

डिझेलच्या वाहनांमधून उर्त्सजित होणाऱ्या प्रदूषणाचा सर्वात मोठा धोका शहरी भागाला जाणवतो. या धुरातून बाहेर पडणारे सूक्ष्ण कण थेट फुप्फुसात जाऊन साचतात. त्यातून जीवघेणे आजार जडण्याची भीती असते.

डम्पिंगचा धूर धोकादायक

डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा जाळल्याने त्यातून निर्माण होणारा धूर अतिशय धोकादायक असतो. असंख्य प्रकारचे वायू वातावरणात मिसळतात. त्यातून वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे श्वसनाचे, फुप्फुसाचे अनेक आजार जडण्याचा धोका असतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांत सीओपीडीचा धोका वाढत असल्याचे डॉ. सचदेव सांगतात.

ओझोन घातक

ओझोन वायू मानवी शरीरावर घातक ‌परिणाम करतो. ओझोनच्या प्रदूषणामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची भीती डॉक्टर व्यक्त करतात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पळनीस्वामी तामिळनाडूचे नवे CM

अनेक दिवसांच्या राजकीय धुमशानानंतर अखेर तामिळनाडूला आज नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुक पक्षाची धुरा वाहणाऱ्या पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांच्या मर्जीतील एडाप्पाडी के. पळनीस्वामी यांनी राजभवनावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पळनीस्वामी हे तामिळनाडूचे १३वे मुख्यमंत्री ठरले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी पळनीस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

पळनीस्वामी यांच्यासह ३१ मंत्र्यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी पळनीस्वामी यांनी १२४ आमदारांचं समर्थन असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं होतं. त्याआधारेच राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापण्यासाठी पाचारण केलं होतं.

विशेष म्हणजे २०१६मध्ये अण्णा द्रमुक पक्षाने जयललिता यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर गेल्या १० महिन्यांत मंत्रिमंडळ बदलण्याची ही तिसरी वेळ आहे.

शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने चार वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी आमदारांची बैठक बोलवून पळनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली होती. त्यानंतर पळनीस्वामीच हे तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित झाले होते.

दरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांना अधिकृत निवासस्थानी दिलेलं पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडची सरकारी कारही परत घेण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'शिर्डी साई संस्थानवर IAS अधिकारी नेमा'

भारतातील श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या शिर्डीतील साई संस्थानचा कारभार आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले. येत्या १५ मार्चपासून साई संस्थानची सूत्रं आयएएस अधिकाऱ्याकडे द्यावी, असेही कोर्टाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

भाजपचे राजेंद्र गोंदकर आणि संदीप कुलकर्णी यांनी साई संस्थानवर आयएएस अधिकारी नेमावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू ठेवला होता. अडीच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी निकाल देताना साई संस्थानचा कार्यकारी अधिकारी म्हणून एखाद्या आयएसएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असे आदेश दिले होते. मात्र राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊन स्थगिती मिळवली होती.

याप्रकरणी सर्व बाजू ऐकून आज सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे साई संस्थानचा कारभार आता लवकरच आयएएस अधिकाऱ्याच्या हाती जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एसबीआय विलिनीकरणाला मंजुरी

भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) जागतिक दर्जाची बँक बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बुधवारी एसबीआयमध्ये तिच्या पाच सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली. एसबीआयमध्ये भारतीय महिला बँकेच्या विलिनीकरणाबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

यापूर्वी कॅबिनेटने या विलिनीकरणास तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव प्रत्येक बँकेच्या संचालक मंडळात मांडला गेला होता. एसबीआयमध्ये विलिन होणाऱ्या प्रत्येक बँकेच्या संचालक मंडळाने याला मंजुरी दिल्यानंतर आता सरकारने यावर शिक्कामोर्तब केले आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑप मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा व स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचा एसबीआयमध्ये विलिन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ई-व्हिसावरील पर्यटकांना मोफत सिम कार्ड

भारतात ई-व्हिसावर येणाऱ्या पर्यटकांना सरकारकडून विमानळावरच मोफत बीएसएनएलचे सिमकार्ड दिले जाणार आहे. या कार्डवर 50 रुपयांच्या टॉकटाईमसह 50 एमबी डेटीही फुकट मिळणार आहे.

या योजनेची सुरवात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांच्या हस्ते झाली. या वेळी बोलताना शर्मा म्हणाले, ""भारतात पोचल्यानंतर विदेशी पर्यटकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधणे सोपे जावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ई-व्हिसाची प्रत विमानतळावर स्वीकारतानाच बीएसएनएलचे सिमकार्ड पर्यटकांना देण्यात येणार आहे. ही सुविधा केवळ ई-व्हिसावर भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. सध्या ही सुविधा दिल्ली विमानतळावर सुरू करण्यात आली असून, लवकरच ती अन्य विमानळांवर सुरु करण्यात येणार आहे.''

या सिमकार्डमध्ये 50 रुपये टॉकटाईम आणि 50 एमबी डेटा असणार आहे. हे सिम कार्ड लगेचच सुरू होणार आहे. यामुळे पर्यटकांना त्याचा वापर लगेच सुरू करता येईल. पर्यटकांना भारतात आगमन झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधणे सुकर व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच, पर्यटन मंत्रालयाच्या 1800111363 या हेल्पलाईनवरही पर्यटकांना त्यांच्या भाषेत हवी ती माहिती मिळविता येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹उसेन बोल्ट, सिमोनी बिलेस सर्वोत्कृष्ट खेळाड

क्रीडा विश्वातील महान धावपटू उसेन बोल्ट आणि जिम्नॅस्ट सिमोनी बिल्स यांची प्रतिष्ठेच्या लॉरेस जागतिक पुरस्कारात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

खेळामधील 'ऑस्कर' म्हणून या पुरस्कारांची ओळख आहे. बोल्टने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. यापूर्वी बोल्ट 2009, 10 आणि 13 मध्ये या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

 टेनिसपटू रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, साहसी क्रीडापटू केली स्लॅटर यांनीही हा पुरस्कार यापूर्वी चार वेळा पटकावला आहे. बोल्टला सर्वकालिक सर्वोत्तम धावपटू मायकेल जॉन्सनच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बोल्टप्रमाणेच ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणारी सिमोनी बिलेस महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू ठरली. रियो ऑलिंपिकमध्ये तिने चार सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदके मिळविली.

ऑलिंपिकमधील सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सला जोरदार पुनरागमन करणारा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पुनरागमनाच्या स्पर्धेत त्याने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. 'फॉर्म्युला वन' मधील जगज्जेता निको रॉसबर्ग यालदेखील 'ब्रेक थ्रू ऑफ दि इयर' पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये उपविजेता राहिल्यानंतर गेल्यावर्षी रॉसबर्गने प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली होती.

अन्य पुरस्कार

बीआट्रिस व्हिओ : अपंग खेळाडू
ऑलिंपिक रिफ्युजी टीम : प्रेरणा पुरस्कार
वेव्हज फॉर चेंज : सर्वोत्कृष्ट क्रीडा कार्यक्रम
रचेल ऑथर्टन : ऍक्शन स्पोर्टसमन
लिस्टर सिटी : ऍचिव्हमेंट पुरस्कार
शिकागो क्लब : सर्वोत्कृष्ट संघ
बार्सिलोना 12 वर्षांखालील संघ : पहिला विशेष क्रीडा पुरस्कार

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मनूकुमार जैन ‘शिओमी’च्या उपाध्यक्षपदी

चीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी शिओमीच्या उपाध्यक्षपदी मनूकुमार जैन यांची निवड झाली आहे. मनू कुमार जैन हे सध्या शिओमीमध्येच भारतातील प्रमुख म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी कंपनीने मनू कुमार जैन यांना उपाध्यक्षपदी बढती दिली आहे.

शिओमी ही चीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी असून या कंपनीचे उपाध्यक्ष ह्यूगो बारा यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. शुक्रवारी एमआय इंडियाने मनूकुमार जैन यांना उपाध्यक्षपदी बढती दिल्याचे जाहीर करण्यात आले. कंपनीतील उपाध्यक्ष पदासोबतच मनूकुमार जैन हे ‘शिओमी’चे भारतातील प्रमुख म्हणूनही कामकाज बघत आहेत. मनूकुमार जैन हे जून २०१४ मध्ये शिओमी कंपनीमध्ये रुजू झाले होते. यापूर्वी ते जबाँगमध्ये काम करत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹केंद्रीय विद्यालयांमध्ये एनसीइआरटी पाठय़पुस्तके येणार

2017-18 शैक्षणिक वर्षापासून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) ला निगडीत देशातील सर्व केंद्रीय विद्यालये समान पाठय़पुस्तके वापरणार आहेत. सदर निर्णय नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग (एनसीइआरटी) ने घेतला आहे. देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांना समान अभ्यासक्रम असण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.

केंद्रीय मानवी संसाधन बलमंत्री (युएमएचआरडी) प्रकाश जावडेकर यांच्या समालोचनात्मक बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनसीइआरटी पाठय़पुस्तकापेक्षा 300 ते 600 टक्के महाग असलेली खासगी पुस्तके लाखो पालकांना विकत घेण्याची सक्ती होती. त्यांनी या समान अभ्यासक्रमाचे निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्व पाठय़पुस्तके योग्य संख्येत व मार्चअखेरपर्यंत मिळण्याची सूचना एचआरडी अधिकाऱयांनी एनसीइआरटीला केली आहे. सीबीएसई विद्यालये सीबीएसईच्या वेबसाईटवरून 22 फेब्रुवारी 2017 च्या मानाने आपली वाढती मागणी नोंदवू शकतात.

एनसीइआरटीची पुस्तके ठराविक वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी विद्यालये व पालकांकडून आल्याने मानवी संसाधन खात्याला हा निर्णय घ्यावा लागला. त्याचप्रमाणे खासगी प्रकाशकांकडून प्रकाशित झालेली पुस्तके शाळा विकत असल्याच्या तक्रारीही अनेक होत्या.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमली पदार्थाविरोधातील मोहीमेचे हिमाचलच्या राज्यपालाकडून उद्घाटन

अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेने संपूर्ण समाजाचे अधपतःन होते. यामुळेच अनेक गंभीर गुन्हे जन्माला येतात. असे सांगत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यात थैमान घालत असलेल्या या संकटाविरूद्ध ‘निर्वाणिचा लढा’ उभारण्याचे आव्हान केले आहे.

शिमला प्रेस क्लबद्वारे अमली पदार्थाच्या व्यसनाधिनतेविरोधात आयोजीत कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जनतेसाठी त्यातही विशेषत्वाने युवक आणि संपुर्ण समाजासाठी घातकीय असल्याचे राज्यपालाने सांगितले. त्याकारणाने हिमाचलप्रदेशाला ‘अमली पदार्थमुक्त’ बनवण्याचे आव्हान त्यांच्याकडून करण्यात आले. मणीपूर, मिझोरम आणि पंजाब येथून मागील वर्षी तपास यंत्रेणेने मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यावरुन याराज्यातील अमली पदार्थांचा अवैध कारोभार कैकपटीने वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच तपासयंत्रणांच्या नजरेतून सूटलेल्या अमली पदार्थांचा आकडा यापेक्षाही नक्कीच मोठा असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमलीपदार्थ फक्त शारीरीक आणि मानसिक आघातच पोचवत नसून व्यसनाधीनांना अकार्यक्षम आणि दुर्बल बनवतो. यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळते. याकारणाने प्रसारमाध्यमांनी या सामाजिक अपप्रवृत्ती विरोधातील मोहीमेत आक्रमकपणे भाग घेतले पाहिजे असे देवव्रत यांनी सांगितले. अमली पदार्थाविरोधात जनांदोलन उभाकरणे ही या घडीची गरज असल्याचे सांगत याविरोधातील मोहीमेसाठी प्रेस क्लब ऑफ इंडियाला पाच लाखाच्या निधीचीही घोषणा केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अतुल खरे यांना संयुक्त राष्ट्राकडून सेवाविस्तार

 संयुक्त राष्ट्रा महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी वरिष्ठ शांती रक्षक अधिकारी आणि भारताचे वरिष्ठ राजनैतिक अतुल खरे यांना एक वर्षाचा सेवा विस्तार दिला आहे. खरे हे 1 एप्रिल 2018 पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील.

संयुक्त राष्ट्राने राजनैतिक प्रकरणांचे अप्पर महासचिव जेफ्री फेल्टमॅन, शांती स्थापना सहयोगाचे सहाय्यक महासचिव ऑस्कर फर्नांडिस टरांको यांना देखील सेवा विस्तार दिला आहे. गुतेरेस यांनी एका अंतर्गत समीक्षा पथकाच्या स्थापनेची देखील घोषणा केली. हे पथक संयुक्त राष्ट्र सचिवालयाची शांतता तसेच सुरक्षा रणनीति, कामकाज तसेच रचनेत सुधारांना पुढे नेईल. मागील वर्षी महासचिव नियुक्त करण्यात आले त्यावेळी गुतेरेस यांनी याचा उल्लेख केला होता. समीक्षा पथक यावर्षी जूनपर्यंत गुतेरेस यांना आपल्या शिफारसी सोपवेल. यानंतर या शिफारसींवर संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांकडून चर्चेची प्रक्रिया सुरू होणार आहे. गुतेरेस यांच्यासमोर सीरिया, इराक आणि अफगाणमधील अस्थिरतेचे मोठे प्रश्न उभे ठाकले आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सर्वात मोठे सी-प्लेन लवकरच भरणार उड्डाण, चीनची निर्मिती

जगाचे सर्वात मोठे सी-प्लेन एजी600 पुढील काही महिन्यांमध्ये पहिले उड्डाण भरणार आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमाने याची माहिती दिली आहे. 4 इंजिन असणाऱया या चिनी विमानाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या सी-प्लेनला चीनच्या दक्षिणेकडील प्रांत झुहाईमध्ये बनविण्यात आले आहे. एजी6000 विमान 37 मीटर लांब असून याचा पंख आकार 38.8 मीटरचा आहे. हे विमान पाणी आणि हवेत दोन्ही ठिकाणी वेगाने धावू शकते. याचे वजन बोइंग 737 विमानाएवढे असल्याचे समजते. हे विमान विशेषकरून जंगलात लागणाऱया वणव्यांना विझविण्यासाठी बनविण्यात आले आहे. हे विमान आपल्यासोबत 53.5 टन वजन वाहून नेऊ शकते.
फक्त 20 सेकंदात 12 टन पाणी जमा करण्याची यात क्षमता आहे. हे पाणी थेट जंगलावर फवारून आग विझविण्याची योजना आहे. एवढेच नाही तर यात 50 जण सवार होऊ शकतात.

वैशिष्टय़े…

– एजी600 ला 2009 साली मिळाली मंजुरी
– आकार बोइंग 737 एवढाच विशाल
– कमाल उड्डाण क्षमता 4500 किलोमीटर
– 20 सेकंदात 12 टन पाणी जमा करणार
– लांबी 121 फूट, पंखांमधील अंतर 128 फूट

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹एचडीएफसी बँक दुसऱया क्रमांकाची कंपनी

बाजारमूल्याच्या बाबतीत रिलायन्स इन्डस्ट्रीजला टाकले मागे

एचडीएफसी बँकेच्या एफआयआय इन्व्हेस्टमेंन्टमध्ये एका मर्यादित प्रमाणात लावण्यात आलेली बंदी आरबीआयकडून हटविण्यात आल्याने कंपनीच्या बाजार मूल्यात तेजीने वाढ झाली. बँकेने रिलायन्स इन्डस्ट्रीजला मागे टाकत बाजारमूल्याच्या बाबतीत देशातील दुसऱया क्रमांकाची कंपनी बनली आहे. शुक्रवारी बँकेचा समभाग सर्वोच्च पातळीवर पोहोचला. या दरम्यान एचडीएफसीचे बाजारमूल्या रिलायन्स इन्डस्ट्रीजच्या तुलनेत 3,500 कोटी रुपये जास्त आहे.

एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य एकाच दिवसात 12,700 कोटी रुपयांनी वाढले. एचडीएफसी बँकेचा समभाग 3.75 टक्क्यांनी वधारत 1,377 वर बंद झाला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य 3.52 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रिलायन्स इन्डस्ट्रीजचे बाजारमूल्य शुक्रवारी 3.49 लाख कोटी रुपये होते. कंपनीच्या समभागात 1 टक्क्यांनी वाढ होत 1075 वर पोहोचला आहे. सध्या बाजारमूल्याच्या बाबतीत देशातील टीसीएस देशातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे मूल्य 4.74 लाख कोटी रुपये आहे.

शुक्रवारी एचडीएफसी बँकेच्या समभागात 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. यामुळे व्यवहारादरम्यान समभागात 1,450 पर्यंत पोहोचला होता. मात्र मर्यादा पूर्ण होताच पुन्हा प्रतिबंध लादण्यात आल्याने समभागात घसरण नोंदविण्यात आली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विश्व करंडक स्पर्धेच्या सहयजमानपदासाठी फिफाकडून प्रोत्साहन

2026 च्या फीफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे सहयजमानपदासाठी फीफाचे अध्यक्ष गियानी इन्फेनटिनो यांनी प्रोत्साहन दिले आहे. फीफाच्या अध्यक्षानी कतारला दिलेल्या भेटीमध्ये 2022 च्या फीफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱया कतारमधील काही शहरांना भेटी दिल्या. यावेळी यजमानपद भूषविणाऱया कर्तारमधील तीन किंवा चार देशांमध्ये प्रत्येकी चार किंवा पाच फुटबॉल स्टेडियमची उभारणी करणे जरूरीचे असल्याचे सांगितले. यासाठी फीफाकडून संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल, असे ग्वाही त्यांनी दिली.

विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे सहयजमानपद भूषविण्याची तयारी असणाऱया देशाला आमचे नेहमीच प्रोत्साहन राहील. 2018 साली विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱया रशियात फुटबॉलमधील हुल्लडबाजीची मला विशेष चिंता वाटत नाही, असे ते म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कादंबरीकार वेद प्रकाश शर्मा यांचं निधन

'वर्दी वाला गुंडा', 'बहू मांगे इंसाफ', 'राम बाण', 'असली खिलाडी', 'दूर की कौडी', 'लल्लू' आणि 'कानून बदल डालो' सारख्या जनसामान्यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या कादंबरींनी वाचकांच्या मनावर गारूड निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार वेद प्रकाश शर्मा यांचं शुक्रवारी मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६२ वर्षाचे होते.

वेद प्रकाश शर्मा गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर मेरठ आणि मुंबईतही उपचार करण्यात आले. वर्षभरापासून आजाराशी झुंज देणाऱ्या शर्मा यांची शुक्रवारी मध्यरात्री प्राणज्योत मालवली. शर्मा यांनी आतापर्यंत १७३ कादंबरी लिहिल्या आहेत.

एका दिवसात १५ लाख प्रति खपल्या
१९९३ मध्ये वेद प्रकाश शर्मा यांच्या 'वर्दीवाला गुंडा' या उपन्यासने देशभर धुमाकूळ घातला होता. या पुस्तकाच्या एका दिवसात १५ लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. मेरठ रेल्वेस्थानकात तर तासाभरात हे पुस्तक हातोहात विकले गेले होते. पुस्तके अॅडव्हान्स बुकींग करण्याची पद्धतही रूढ झालेली नव्हती अशा काळात शर्मा यांच्या पुस्तकांचे अॅडव्हान्स बुकींग व्हायचे. एवढी लोकप्रियता त्यांना लाभली होती. त्यांनी सहा-सात चित्रपटांसाठी पटकथा लेखनही केले आहे. त्यांच्या 'बहू मांगे इंसाफ' या उपन्यासवर 'बहू की आवाज' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनेता अमिर खान यांनी मेरठमध्ये नुकतीच त्यांची भेट घेतली होती. यावेळी अमिरने त्यांना नव्या सिनेमासाठी पटकथा लिहिण्याचा आग्रह धरला होता. शर्मा यांनी त्यावर कामही सुरू केलं होतं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यानी जिंकला विश्वासदर्शक ठराव

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के. पळनीस्वामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, १२२ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने तर ११ आमदारांनी विरोधात मतदान केले. हे ११ आमदार पनीरसेल्वम गटाचे होते.

गुप्त मतदानाच्या मागणीसाठी सकाळपासून सभागृहात गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी द्रमुकचे ८८ आमदार तर IUML पक्षाचे १ अशा एकूण ८९ आमदारांना सभागृहाबाहेर काढले तर काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यामुळे सभागृहात मतदानाच्या वेळी केवळ शशिकला गटाचे आणि पनीरसेल्वम गटाचे आमदार उपस्थित होते.

शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर तुरुंगात रवानगी होण्यापूर्वी त्यांनी आपले समर्थक आमदार पळणीस्वामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. राज्यपालांनी पळणीस्वामी यांना विश्वासदर्शक मतांसाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, २ दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जाणार होते. पण ते गुप्त मतदान पद्धतीने घेतले जावे या मागणीसाठी विरोधीपक्षातील आमदारांनी आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासूनच सभागृहात गोंधळ घातला. खुर्च्यांची, माईकची मोडतोड केली. परिणामी अध्यक्षांनी आधी १ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर मतदान घेण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'झिलँडिया' नावाचे आठवे महाद्वीप सापडले!

सात महाद्विपां व्यतिरिक्त आणखी एक महाद्वीप सापडल्याचा दावा 'जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात शास्त्रज्ञांनी केला आहे. या महाद्वीपाचा बराचसा भाग पाण्याखाली असल्याने आतापर्यंत ते ओळखता आले नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 'द इंडिपेंडण्ट' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे महाद्वीप न्यूझिलँडच्या बरोबर खालच्या भागात आढळले असून याचा सर्वाधिक भाग हा दक्षिण प्रशांत महासागराखाली बुडालेला आहे.

जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात संशोधकांनी असा दावा केला आहे की, 'झिलँडिया' नावाचे हे आठवे महाद्वीप असून त्याचे क्षेत्रफळ साधारण ५० लाख चौरस किमी म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या दोन तृतियांश क्षेत्रफळा इतके आहे. शिवाय इतर महाद्विपांमध्ये ज्या गोष्टी पाहायला मिळतात, त्या सर्व गोष्टी झिलँडियाच्या भूभागावर असल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

संशोधकांच्या माहितीनुसार, झिलँडियाचे स्वत:चे असे भूशास्त्र आहे. तसेच याचा तळ, समुद्री तळापेक्षा अधिक मोठा आणि टणक आहे. महाद्विपाचा ९४ टक्के भाग पाण्याखाली आहे. हे महाद्वीप तीन मोठे भूभाग मिळून बनलेले आहे. यात न्यूझिलँडचे उत्तर आणि दक्षिण द्वीप तसेच न्यू कॅलिडोनियाचा उत्तर भाग समाविष्ट आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, याला महाद्वीप मानल्यानंतरच ते कसे बनले आणि कशाप्रकारे तुटले असेल हे समजणे सोपे जाईल. न्यूझिलँडची संस्था 'जीएनएस सायन्स'नुसार झिलँडियाला महाद्वीप म्हणून गणलं जाणं हे केवळ महाद्विपांच्या संख्येत वाढ होणं किंवा एक आठवा महाद्विप आपल्याला मिळणं इथवरचं मर्यादीत नाही, तर त्यामुळे महाद्वीप कसे बनले याविषयी काही नव्या गोष्टी-गुपितं नव्याने उलगडतील.

महाद्विपाविषयीच्या या अहवालाचे लेखक असलेल्यांपैकी एक निक मॉर्टिमर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या महाद्विपाचा मोठा हिस्सा समुद्रात असल्याने त्याविषयी आकडेवारी मिळविणं अधिक कठीण काम आहे. मात्र संशोधन सुरू असल्याचे आणि लवकरच आपण केवळ सात नाही तर आठ महाद्विपांचा अभ्यास आपल्या पाठ्यपुस्तकांतून करू, असेही त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह विधेयकाला मंजूरी

पाकिस्तानच्या सिनेट सभागृहात अखेर हिंदू विवाह विधेयकाला मंजूरी देण्यात आली. यामुळे पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हिंदूना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कनिष्ठ सभागृहात या विधेयकाला मंजूरी देण्यात आली होती.

पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हिंदूना त्यांच्या लग्नाची नोंदणी करता येत नव्हती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना हिंदू कुटुंबियांना करावा लागत होता. या कायद्यानुसारे हिंदूसाठी मुलगा व मुलगी यांचे किमान वय १८ वर्ष ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय या कायद्यान्वये विवाह नोंदणी करण्यात येणार आहे. याचा मोठा फायदा स्त्रियांना होणार आहे.

हा कायदा पाकिस्तानमधील पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा भागात लागू होणार आहे. सध्या सिंध प्रातांत राज्याच्या कायदेमंडळाने संमत केलेला हिंदू विवाह कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा मंजूर करण्याच्या निर्णयाचे स्थानिक संघटनांनी स्वागत केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन

स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते ज्येष्ठ नेते 'विदर्भसिंह' जांबुवंतराव धोटे (८३ वर्ष) यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. धोटे यांच्या निधनामुळे विदर्भावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वतंत्र विदर्भासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केलीत. जांबुवंतराव धोटे काँग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभेची निवडणूक लढवली होती. धोटे हे पाच वेळा विधानसभेवर तर लोकसभेवर दोन वेळेस निवडून आले होते. विधानसभेत त्यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर आवाज उठवला होता. शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर मुद्देही धोटे यांनी आक्रमकपणे मांडले होते. स्वतंत्र विदर्भाची सातत्याने मागणी व आंदोलन करत असल्यामुळे धोटे यांना विदर्भवीर असे संबोधले जाते. धोटे यांनी २००२ साली विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. धोटे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाचा सच्चा पाठीराखा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

जांबुवंतराव धोटे यांचा अल्प परिचय:

> शारीरिक शिक्षक म्हणून पालिका शाळेत १९५८ साली रुजू
> १९५९ मध्ये जवाहरलाल दर्डा यांचा पराभव करून नगरसेवक झाले
> १९६२ साली फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून यवतमाळ विधानसभा निवडणूक लढवली व विजयी झाले
> १९६४ साली धोटे यांनी आमदार असताना विधानसभाचे अधिवेशनात दुष्काळी परिस्थितीवर बोलू न दिल्याने विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांना सभागृहात पेपरवेट फेकून मारला; परिणामी आमदारकी रद्द करण्यात आली, देशातील ही पहिलीच कारवाई
> डिसेंबर १९६४ मध्ये आमदारकी रद्द केल्याने पोटनिवडणूक झाली त्यात कॉग्रेस उमेदवाराचा पराभव करून पुन्हा विजयी झाले
> १९६७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव
> १९७१ साली नागपूर लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींची लाट असूनदेखी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून विजयी
> १९७८ साली यवतमाळ विधानसभेत आमदार
> विधानसभा निवडणुकीत इंदिरा कॉग्रेस सोबत युती
>१९८० सालची नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातून उमेदवारी; निवडणुकीत विजयी
>> जांबुवंतराव धोटे नि आजवर केलेली प्रमुख आंदोलन :
> स्वतंत्र विदर्भचे आंदोलन
> विणकर आंदोलन
> इंग्रजी भाषा च्या विरोधात आंदोलन
> अकोला येथे कृषी विद्यापीठ व्हावं म्हणून १९६८ मध्ये मोठे आंदोलन उभे केले त्यात ५ जण शहीद;
> १९७८ सालच्या 'जागो' या चित्रपटात मुख्य भूमिका

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लता मंगेशकर यांना ‘ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ प्रदान करण्यात आला. ब्रँड लॉरीअटकडून दिले जाणारे पुरस्कार हे जगभारातील नावाजलेल्या व्यक्तिंना दिले जातात. ८७ वर्षीय लतादीदींनी सोशल मीडियावर ट्विट करत पुरस्काराचा एक फोटो शेअर केला आहे.

ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले की, मला लिजेंडरी अॅवार्ड २०१७ देऊन सन्मानित केल्याबद्दल लॉरीअटचे खूप आभार. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल शाहरुख खानलाही २०१२ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. याआधी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला, नोबल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस, रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि मायकल शूमाकरला ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.

आतापर्यंत ३०,००० हूनही अधिक गाणी गायलेल्या दीदींनी त्यांच्या नंतरच्या ट्विटमध्ये त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. माझ्या कामावर मी समाधानी आहे. यासाठी मी माझ्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची आभारी आहे. १९४२ मध्ये लता दीदींनी मराठी गाण्यापासून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर १९४६ मध्ये वसंत जोगळेकर यांच्या हिंदी सिनेमातून त्यांनी पहिले हिंदी गाणे गायले. दोन वर्षांनंतर गुलाम हैदर यांनी लतादीदींना ‘दिल मेरा तोडा’ या गाण्यातून मोठा ब्रेक दिला. त्यानंतर लतादीदींना मागे वळून पाहिले नाही. आता लता मंगेशकर या गात नसल्या तरी त्यांच्या गाण्यात अशी जादू होती ज्याने पंडित नेहरुनांही डोळ्यात पाणी आणले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून वाजवले जावे, अशी मागणी करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. कायद्यात राष्ट्रीय गीत अशी संकल्पनाच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीत घोषित करून ते वाजवण्याचे आदेश देता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा आणि संविधानातील तरतुदींचा दाखला देत ही याचिका फेटाळून लावली. संविधानातील ५१ ए या कलमात केवळ राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचाच उल्लेख आहे. या कलमात राष्ट्रीय गीतासंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही वादाला आमंत्रण देऊ इच्छित नाही, असे न्यायमूर्ती आर. बानूमथी व न्यायमूर्ती मोहन एम. शांतागौडार यांनी म्हटले. तसेच या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची कार्यालये, न्यायालये, विधिमंडळ आणि संसदेत राष्ट्रगीत वाजविण्याची मागणीही फेटाळून लावली. मात्र, शाळांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती करण्याच्या विनंतीचा विचार करु असे न्यायालयाने सांगितले.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताचे ऐतिहासिक तथ्य शोधण्याचे निर्देश दिले होते. याच्यापूर्वी पीएमओने याबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिल्यानंतर सीआयसीने हे निर्देश दिले आहेत. हा विषय पीएमओ कार्यालयाच्या अंतर्गत येत नसल्याचे पीएमओने म्हटले होते. हरिंदर ढिंगरा यांनी याबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारणा केली होती. उत्तर न मिळाल्याने मागील महिन्यात माहिती अधिकार कार्यकर्ते हरिंदर ढिंगरा यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे याचिका दाखल केली होती. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत असल्याचे आणि राष्ट्रगीतासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कविता घेण्यात आली आहे काय? या संबंधित प्रश्नांचे उत्तर पीएमओ कार्यालयाकडून मिळवून द्यावे, असा आग्रह त्यांनी या याचिकेमध्ये केला होता. या प्रकाराबाबत सीआयसीचे आयुक्त एम. आचार्यलू यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. राष्ट्राशी संबंधित या विषयावर सर्व कार्यालयांचे केंद्रीय माहिती अधिकारी काहीही विचार न करता एकदुसऱ्याकडे फाइल पाठवत राहिले. योग्य उत्तर न देण्यात आल्याने अनेक प्रकारच्या शंका उपस्थित होत असून, केंद्र सरकारकडे ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’शी संबंधित माहिती आहे की नाही अशी शंका यामुळे उपस्थित होत असल्याचे आचार्यलू यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा