Post views: counter

Current Affairs May 2017 Part- 3 ( चालू घडामोडी )

🔰 Current Affairs Marathi 🔰


🔹जूनमध्ये अवकाशी झेपावणार ISRO चे शक्तिशाली रॉकेट - GSLV-Mark-III

यशाची नवनवी शिखरं सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था - अर्थात इस्रो पुढच्या महिन्यात आणखी एक ऐतिहासिक भरारी घेण्यासाठी सज्ज होत आहे. भारताचं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट - GSLV-Mark-III जूनमध्ये अवकाशात झेपावणार आहे. तब्बल ४,००० किलो वजनाचा संपर्क उपग्रह वाहून नेण्याची या यानाची क्षमता असल्यानं त्याकडे 'गेम चेंजर' रॉकेट म्हणूनच पाहिलं जातंय.

सध्या इस्रोच्या पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल - अर्थात पीएसएलव्ही यानातून २,५०० किलो वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवता येतात. परंतु, जिओसिन्क्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (जीएसएलव्ही) मार्क 3 ची ताकद 'बाहुबली'सारखीच अफाट आहे. ४ टनाचा भार हे रॉकेट पेलू शकतं. त्यामुळे त्याचं उड्डाण यशस्वी झाल्यावर उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा भाव प्रचंड वधारणार आहे.

सध्या अडीच टनपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी भारताला युरोपीय देशांची मदत घ्यावी लागतेय. त्यासाठी हे देश प्रचंड शुक्ल आकारतात. हा सगळा खर्च जीएसएलव्ही मार्क-3 मुळे वाचू शकेलच, पण अनेक देश त्यांचे वजनदार उपग्रह घेऊन भारताकडे येतील. त्यातून देशाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकेल आणि अंतराळ संशोधनाला मोठं बळ मिळू शकेल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी दिली.


याच वर्षी, १५ फेब्रुवारीला इस्रोनं एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम रचला होता. रशिया, अमेरिका या महासत्तांनाही जे जमलं नाही, ते इस्रोनं करून दाखवलं होतं. त्यांच्या या कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली होती आणि भारताची मान अभिमानानं उंचावली होती. आता जून महिन्यात पुन्हा इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फोर्ब्स’मध्ये १०० भारतीय

फोर्ब्स’ने आखाती देशांतील आघाडीच्या १०० भारतीयांची यादी जाहीर केली असून, रिटेल क्षेत्रातील युसूफ अली आणि ‘पेप्सिको’चे संजीव चढ्ढा यांनी अनुक्रमे ‘उद्योजक’ आणि ‘अधिकारी’ या विभागांत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

अली हे लुलू ग्रुप इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत; तर चढ्ढा हे पेप्सिको इंटरनॅशनलच्या आशिया, आखात आणि आफ्रिका विभागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. फोर्ब्सने यंदा प्रथमच उद्योजकांच्या पुढील पिढीचाही या यादीसाठी विचार केला आहे. आपल्या कुटुंबाचा उद्योगवारसा पुढे नेणाऱ्या २८ गुणवान भारतीय उद्योजकांचा या यादीत समावेश आहे.

भारताचे दुबईतील कौन्सुल जनरल विपुल म्हणाले, ‘आखाती देशांमध्ये ७० लाखांहून अधिक भारतीय राहतात. ते या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचा वाटा उचलत आहेत.’ यापैकी २७ उद्योजक मूळचे केरळचे आहेत, २३ सिंधी आहेत; तर १६ गुजराती आहेत.

🔹बजरंगाची कमाल; भारताला सुवर्णपदक

आशियाई कुस्ती स्पर्धेत बंजरंग पूनियाने कमाल करत भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. बंजरंग पूनियाने ६५ किलो वजनी गटात कोरियन कुस्तीपटू ली शुंग चुल याला ६-२ अशी मात देत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर महिलांच्या ५८ किलो वजनी गटात सरिताने रौप्य पदक पटकावले.

अंतिम फेरीच्या सामन्यात पहिल्या राउंडमध्ये बजरंग पूनिया ०-२ अशा पिछाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये बजरंनने जबरदस्त कामगिरी करत सामन्यात पुनरागमन करत कोरियाच्या ली शुंग चुलचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. तर, ५८ किलो वजनी गटाच्या सामन्यात सरिताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या ए. टीनबेकोवाने सरिताचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. सरिता ही ६० किलो वजनी गटात खेळणार होती. मात्र, ऐन स्पर्धेच्या तोंडावर तिला ५८ किलो वजनी गटात खेळण्यास सांगण्यात आले होते.

आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत आतापर्यंत भारताने ८ पदव जिंकले असून त्यातील पाच पदके महिला कुस्तीपटूंनी जिंकली आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय बहिष्करण अहवाल 2016 जाहीर

भारताच्या सेंटर फॉर इक्विटी स्टडीज (CES) ने 2016 भारतीय बहिष्करण अहवाल (Indian Exclusion Report -IXR) जाहीर केला आहे. हा अहवाल दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांना सार्वजनिक सुविधांना समानतेने प्रवेश मिळण्यापासून वगळण्यात येणारी स्थिती दर्शवतो.

हा अहवाल चार सार्वजनिक सुविधांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. ते आहेत – वृद्धांसाठी निवृत्तीवेतन, डिजिटलबाबींना प्रवेश, शेतीसाठी जमीन आणि विचाराधीन कैदीसाठी कायदेशीर न्याय .

▪️अहवालातील नमूद बाबी

जमिनीचे मालक हे नेहमीच उच्च श्रेणी जातींशी संबंधित आहेत, शेतकरी मध्यम श्रेणी जातींशी संबंधित आहेत. तर दलित आणि आदिवासी मुख्यत्वे कृषि कामगार म्हणून राहतात आणि दलितांमध्ये भूमीहीनता सर्वाधिक म्हणजेच 57.3% आहे. तसेच, 52.6% मुस्लीम आणि 56.8% स्त्रि प्रमुख असलेली कुटुंबे भूमीहीन आहेत.

विकासात्मक उपक्रमांमुळे विस्थापित झालेल्यांमध्ये सुमारे 40% आदिवासी आहेत.

जमिनीबाबत सुधारणेच्या प्रयत्नांचा दलितांना, स्त्रियांना किंवा मुसलमानांना गरज असलेल्या प्रमाणात लाभ दिला जात नाही. दलित मुस्लिम आणि स्त्रियांकडे असलेला जमिनीचा पट्टा आकाराने फारच कमी आहे. फक्त 2.08% दलित कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे.

अनुसूचित जाती-जमातींना जमीन वाटप प्रक्रिया प्रभावीपणे लागू केलेले नाही.

इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत भारताला अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळाले असले तरीही 1.063 अब्ज भारतीय इंटरनेटचा वापर करीत नाही आहेत. याला गरीबी आणि भौगोलिक स्थान हे दोन प्रमुख अडथळे असू शकतात.

कमकुवत पायाभूत सुविधा, अपुरे संस्थात्मक कार्यचौकट, लक्ष्यित भागात कमी साक्षरता आणि सरकारी योजना राबविण्यामध्ये सरकारी कार्यालयांचे खराब कार्यान्वयन अशी प्रमुख करणे डिजिटल वापरासाठी अडचण ठरत आहे.

डिजिटल इंडिया अभियानांतर्गत एप्रिल 2016 मधील स्थितीनुसार देशभरातली केवळ 6727 पंचायतींना इंटरनेट सुविधा प्राप्त झाली आहे.

🔹आंतरराष्ट्रीय वेसक दिन साजरा

10 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय वेसक दिन साजरा करण्यात आला आहे. हा बौद्ध धर्मातील सर्वात मोठा उत्सव आहे. या वर्षी हा दिन UN च्या नेतृत्वात श्रीलंकेकडून साजरा केला गेला आहे. यानिमित्त 12 मे 2017 रोजी “बुद्धिस्ट टिचिंग फॉर सोशल जस्टिस अँड सस्टेनेबल वर्ल्ड पीस” संकल्पनेखाली तेथे परिषद आयोजित केली गेली.

🔹तेजसद्वारे डर्बी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

देशी बनावटीच्या हलक्या वजनाचे लढाऊ विमान तेजसद्वारे हवेतून हवेत मारा करणार्या व दृष्टीक्षेपापलीकडील (BVR) लक्ष्य भेदणार्या डर्बी क्षेपणास्त्राची ओडिशात चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. डर्बी (अल्टो) क्षेपणास्त्र हे BVR, मध्यम पल्ल्याचे (कमाल 50 कि.मी.) अॅक्टिव रडार होमिंग क्षेपणास्त्र आहे.

🔹35 परिचारिकांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते 12 मे ला झालेल्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त देशभरातील 35 परिचारिकांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दिला गेला आहे. 1920 सालापासून फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दिला जात आहे. 50,000 रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔹केंद्र सरकारने IIP, WPI डेटाच्या नव्या मालिका प्रसिद्ध केल्या

औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production -IIP) आणि घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index -WPI) च्या नव्या मालिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. चांगले धोरण तयार करण्यासाठी, अधिक अचूकता आणण्यासाठी आणि सुधारीत समन्वयासाठी यामुळे मदत होईल.

नव्या मालिकांमध्ये केले गेलेले बदल
IIP आणि WPI साठी आधारभूत वर्ष हे 2011-12 असेल आणि सध्या वापरण्यात येणारे 2004-05 नसणार.

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि सकल स्थानिक उत्पादन (GDP) आणि सकल मूल्यवर्धन यासाठीही 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे.

आधारभूत वर्षामुळे तफावत कमी होणे आणि तुलना करण्यास सुलभता होणे अपेक्षित आहे.

IIP च्या नवीन मालिकेत स्मार्टफोन, टॅब्लेट, LED टेलिव्हिजन आणि टॅब्लेट यासारख्या तंत्रज्ञानाच्या वस्तूंचा समावेश करणार.

IIP च्या नवीन वस्तूंच्या सूचीमध्ये 809 उत्पादने असतील, जे 521 श्रेणीमध्ये वर्गीकृत केले गेले आहे. शिवाय यात खनिकर्म क्षेत्रातील 55 उत्पादने आणि वीजेला एक उत्पादन म्हणून गृहीत धरणार.

▪️हे बदल का केले गेले?

सध्या IIP मालिकेसाठी आधारभूत वर्ष म्हणून 2004-05 हे गृहीत धरले जात आहे. त्यामुळे निर्माण होणारी माहिती मोठ्या प्रमाणात असल्याने आकलन करणे किचकट जाते.

शिवाय, भारताची अर्थव्यवस्था अद्याप विकसनशील आहे आणि औद्योगिक क्षेत्राचे स्वरूप आणि जटिलता वेगाने विकसित होत आहे. उद्योग आणि उत्पादनांसाठी वर्गीकरण प्रणाली ही एका मूलभूत परिवर्तनातून जात आहे. ज्या पद्धतीने डेटा एकत्रित केला जातो, सादर केला जातो आणि वापरले जाते त्या पद्धतीत सुधारणाची आवश्यकता असलेले अनेक वारसा घटक आहेत.

वैयक्तिक उत्पादनांच्या उत्पादनातील वाढीचा दर व्यापक स्वरुपात वेगवेगळा असू शकतो. मालिकेचे आधारभूत वर्ष आणि वेटींग डायग्राम यांची वेळोवेळी पुनरावृत्ती हा निर्देशांकमध्ये स्पष्टपणे या बदलांना एकत्रित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

🔹निवड झालेला भारताचा फेमतो प्रायोगिक उपग्रह SR-4 अग्निबाणाद्वारे
प्रक्षेपित होणार

अठरा वर्षीय मोहम्मद रशिद शारूक याच्या चमूने तयार केलेल्या "फेमतो" (वजन: 64 ग्राम) प्रायोगिक उपग्रहाची निवड NASA व आयडूडल लर्निंग द्वारा आयोजित "क्यूब्स इन स्पेस" स्पर्धेत निवडलेल्या 80 मॉडेलमध्ये झाली आहे. पृथ्वीच्या कक्षेत SR-4 अग्निबाणाद्वारे सोडल्या जाणार्या उपग्रहांमध्ये भारतामधून निवडला गेलेला हा एकमेव उपग्रह आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एस ओ पी विकसित केले

बाल न्याय प्रणाली अंतर्गत कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी महिला आणि बाल मंत्रालयाने प्रमाणित कार्यान्वित प्रणाली (SOP) विकसित केली आहे. पुनर्वसनाला प्रोत्साहन देणे हे SOP चे मुख्य उद्दिष्ट आहे आणि अशा मुलांना संस्थात्मक काळजी, दत्तक पालन सारख्या सुविधा उपलब्ध करुन त्यांचे सामाजिक-पुर्नएकात्मिकरण करणे.

हिंसा, पिळवणूक आणि छळ यापासून मुलांचे संरक्षण करताना त्यांची कैद कमी करणे हे SOPचे उद्दिष्ट आहे. कुटुंब आणि समाजाचा सहभाग असलेल्या पुनर्वसनाला SOP प्रोत्साहन देते जे कोणत्याही दंडात्मक उपाययोजनेपेक्षा जास्त योग्य आणि परिणामकारक आहे.

कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुलांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी SOP संधी उपलब्ध करुन देते.

🔹तांत्रिक, वैद्यकीय, आयुर्वेद, युनानी आदी क्षेत्रांमध्ये शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी 5 जागतिक दर्जाच्या संस्था स्थापन करणार

अल्पसंख्याक व्यवहार (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले की, अल्पसंख्याक मंत्रालय यावर्षी दोन नवीन योजना सुरु करणार आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती शतकोत्सवा दरम्यान उस्ताद सन्मान समारोह सुरु करण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील कलाकार आणि कारागीरांना सन्मानित केले जाईल. दुसरी शिक्षण अभियानासाठीची योजना माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पहिल्या पुण्यतिथी म्हणजेच 15 ऑक्टोबर 2017 रोजी सुरु करण्यात येईल. हे अभियान 2017-18 दरम्यान राबविले जाईल. यासाठी 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या 3 वर्षाच्या कालावधीतील अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या कर्तृत्वाविषयी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना नक्वी यांनी सांगितले.

 सरकारने 3 ई-शिक्षण
(Education), रोजगार (Employment) आणि सशक्तिकरण (Empowerment)च्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील गरीब, मागासलेल्या आणि दुर्बल घटकांना यशस्वीरित्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.

अल्पसंख्याकांचे सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक सशक्तिकरण करण्यासाठी सरकारने वर्ष 2017-18 साठीचे अल्पसंख्याक मंत्रालयाचा निधी 4195.48 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.

अल्पसंख्याक समाजातील मुलांना दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. हे लक्षात ठेवूनच अल्पसंख्याक मंत्रालय तांत्रिक, वैद्यकीय, आयुर्वेद, युनानी आदी क्षेत्रांमध्ये शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी 5 जागतिक दर्जाच्या संस्था स्थापन करणार आहे, असंही मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. या संस्था देशात कुठे स्थापन कराव्या याची चाचपणी करण्यासाठी 10 जानेवारी 2017 रोजी एक उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.

🔹तिहारमध्ये के व्ही आय सी तर्फे मधमाशी पालन कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मधुर क्रांती’ आणि ‘कौशल्य भारत’ प्रकल्पाने प्रेरित होऊन खादी आणि ग्राम उद्योग आयोगाने तिहार जेलमध्ये तरुण कैद्यांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 20 ते 28 वर्ष वयोगटातील 50 कैद्यांना या कार्यक्रमांतर्गत, प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर के व्ही आय सी जेल परिसरात 500 मधमाशी खोके बसवण्यात येणार आहेत. या खोक्यांमधून दरवर्षी 12,500 किलो मध आणि 300 किलो मेणाचे उत्पन्न होईल, अशी माहिती के व्ही आय सी चे अध्यक्ष व्ही.के.सक्सेना यांनी दिली.

🔹रोजगार आकडेवारीबाबत कृती दलाची निर्मिती

रोजगारनिर्मितीला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारतात रोजगाराबाबत विश्वासार्ह आणि समयोचित आकडेवारीचा अभाव असल्याने, वेगवेगळ्या काळात रोजगारनिर्मितीच्या विस्ताराचे मूल्यांकन करणे धोरणकर्त्यांना आणि स्वतंत्र निरीक्षकांना कठीण जात होते. कामगार ब्युरोसारख्या काही एजंसीकडून काही प्रमाणात आकडेवारी गोळा करून ती प्रकाशितही केली जाते, मात्र त्याच आवाका अल्प आहे. कामगार ब्युरोकडून केवळ काही क्षेत्रातलीच आकडेवारी जमा केली जाते आणि त्यांची पद्धतीही निरीक्षक प्रतिसादाच्या अद्ययावत पॅनेलला अनुसरून नसते. परिणामी धोरणनिर्मिती आणि परीक्षण या दोन्ही बाबी व्यापक आणि नेमक्या आकडेवारीच्या अभावातच कराव्या लागत असत.

रोजगाराबाबत, समयोचित आणि विश्वासार्ह आकडेवारीचे महत्व जाणून, देशाच्या सांख्यिकी रचनेत असलेली ही दीर्घकालीन त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि संबंधित मंत्रालयाला याविषयी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अरविंद पनगढिया यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल निर्माण करण्यात आले असून, कामगार सचिव साथियावती, सांख्यिकी सचिव डॉ टी सी ए अनंत, नीती आयोगाचे प्रो. पुलक घोष आणि रिझर्व्ह बँकेच्या मंडळाचे सदस्य मनीष सबरवाल हे याचे सदस्य राहतील. या कृती दलाच्या शिफारसीची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल. विश्वासार्ह आकडेवारीवर आधारित योग्य मूल्यांकनासह रोजगारविषयक धोरण निर्माण करता यावे यासाठी या कामाला गती द्यावी असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.

🔹मूल्य समर्थन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याकडून तूर खरेदी

चालू खरीप हंगाम 2016-17 दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून तूर खरेदीसाठी मूल्य समर्थन योजनेची (PSS) अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. महाराष्ट्रात 12.56 लाख मेट्रिक टन तूर उत्पादन होण्याचा अंदाज प्रस्तावामध्ये व्यक्त केला होता.

5 मे 2017 रोजी महाराष्ट्राने पुन्हा एकदा पीएसएसची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. प्रस्तावामध्ये राज्य सरकारने 31 मे 2017 पर्यंत केंद्र सरकारने 20 लाख क्विंटल तूर खरेदी करावी अशी विनंती केली होती. या प्रस्तावावर विचार करत विभागाने 31 मे 2017 पर्यंत पीएसएसअंतर्गत एक लाख टन तूर खरेदीला मंजूरी दिली आहे.

🔹मातृत्व लाभ (सुधारित) कायदा, 2017 संदर्भात स्पष्टीकरण

केंद्र सरकारने 28 मार्च 2017 रोजी मातृत्व लाभ (सुधारित) कायदा, 2017 अधिसूचित केला या सुधारित कायद्यातील तरतूदींची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून केली जाईल, तर यामधील पाळणा घरासंदर्भातील सुविधांची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून केली जाईल.

विविध स्तरातून प्राप्त झालेले प्रश्न लक्षात घेता कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 12 एप्रिल 2017 रोजी मातृत्व लाभ (सुधारित) कायदा, 2017 च्या विविध तरतूदीं संदर्भात काही स्पष्टीकरण जारी केले. मंत्रालयाने जारी केलेल्या स्पष्टीकरणामधील हे मातृत्व लाभ रजा वाढवण्यासंदर्भात आहे. या सुधारित कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या स्त्रिया आधीच मातृत्व रजेवर गेल्या होत्या त्यांना देखील याच लाभ मिळेल.

🔹भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या प्राध्यापक विक्रम विशाल यांना 2017 चा आयएसए तरुण वैज्ञानिक पुरस्कार

मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधील पृथ्वी विज्ञान विभागामधील सहाय्यक प्राध्यापक विक्रम विशाल यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे (आयएनएसए) देण्यात येणारा प्रतिष्ठेचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार देते. कांस्य पदक आणि 25 हजार रुपये रोख असे हे पुरस्काराचे स्वरुप आहे. 2015 पर्यंत आयएनएसए ने 737 तरुण वैज्ञानिकांचा सन्मान केला आहे.

प्राध्यापक विशाल सध्या कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषयावर काम करीत आहेत.

🔹खगोलशास्त्रीय आंतरराष्ट्रीय ऑलंपियाडचे फुकेत, थायलंड येथे 12-21 नोव्हेंबर 2017 दरम्यान आयोजन

खगोलशास्त्रीय खगोलभौतिक विषयावरील आंतरराष्ट्रीय ऑलंपियाडचे 12-21 नोव्हेंबर, 2017 दरम्यान फुकेत, थायलंड येथे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2016 पासून या ऑलंपियाडकरीता संघ निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. भारतात टाटा इन्स्टिटयूट फॉर फंडामेंटल रिसर्च, मुंबई, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्यूकेशन या दोन संस्था अगदी सुरुवातीपासून खगोलशास्त्रीय ऑलंपियाडसाठी मुलांची निवड करणे आणि प्रशिक्षण देयाचे काम करतात.

भौतिकशास्त्र शिक्षकांच्या भारतीय संघटनेने आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील परिक्षेमध्ये देशभरातील 16,220 विक्षर्थी सहभागी झाले होते, त्यामधील 531 विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्याच्या भारतीय राष्ट्रीय खगोलशास्त्रीय ऑलंपियाड परिक्षेसाठी निवड झाली होती.

भारतीय राष्ट्रीय खगोलशास्त्रीय आँलपियाड परिक्षा संपूर्ण देशभरात 18 केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. 22 एप्रिल ते 8 मे दरमयान एचबीसीएसई येथे आयोजित खगोलशास्त्रीय ऑलंपियाडसाठी अभिमुखता आणि निवड शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी या परिक्षेमधील 51 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

या शिबिराचा समारोप कार्यक्रम 8 मे 2017 रोजी (दुपारी 12 ते 1.30) व्ही.जी. कुलकर्णी सभागृह, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

🔹वेंकय्या नायडू यांच्या हस्ते “स्वच्छ जंगल की कहानी – दादी की जुबानी” या पुस्तक संचाचे प्रकाशन
प्रकाशन विभागातर्फे 15 भाषांमध्ये प्रकाशित

प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेल्या
स्वच्छ जंगल की कहानी – दादी की जुबानी” या पुस्तक संचाचे प्रकाशन आज माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांमध्ये स्वच्छतेप्रति संवेदना आणि जागरुकता निर्माण करणे हा पुस्तकांचा उद्देश आहे. प्रसिद्ध बालकथा लेखक डॉ. मधु पंत यांनी रंजक पद्धतीने ही चार पुस्तके लिहिली आहेत. 15 भाषांमध्ये ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लावण्यास यामुळे मदत होईल.

🔹इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर

434 शहरांमध्ये करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण- 2017 मध्ये इंदूर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. शहर विकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी आज या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले.
भोपाळ, विशाखापट्टणम, सुरत, मैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, वडोदरा आणि चंदिगढ या शहरांचा पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये समावेश आहे.

सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीत गोंडा शहर (434) पहिल्या क्रमांकावर असून त्याखालोखाल भुसावळ, बगाहा, हरदोई, कटिहार, बाहरेच, मुक्तसर, खुर्जा ही शहरे आहेत.

सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करताना नायडू म्हणाले की, मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी 2014 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातील मानांकन सुधारत चांगली कामगिरी केली आहे. 2016 मध्ये राजधानी शहरांव्यतिरिक्त दहा लाख लोकसंख्या असलेल्या 73 शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले.

अव्वल 50 स्वच्छ शहरांमध्ये एकूण 14 राज्यांचे प्रतिनिधित्व आहे. गुजरातमधील 12, मध्य प्रदेशातील 11, आंध्र प्रदेशातील 8 तर चंदीगढ, छत्तीसगड, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, सिक्किम आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे. सर्वात अस्वच्छ 50 शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील 25 तर राजस्थान आणि पंजाबमधील प्रत्येकी 5 शहरे, महाराष्ट्रातील 2 तर हरियाणा, कर्नाटक आणि लक्षद्वीपमधील प्रत्येकी एक शहर आहे.

वाराणसी सर्वात वेगाने स्वच्छ शहर बनले आहे. 2014 मध्ये वाराणसीचे मानांकन 418 होते, ते यावेळी 32 इतके झाले आहे.

नायडू म्हणाले की, यावेळच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष हा देशातील शहरी भागातील 37 लाख नागरिकांनी स्वच्छतेबाबत उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले की, अशा प्रकारचे सर्वेक्षण सर्व 4041 शहरांमध्ये केले जाईल.

नायडू म्हणाले की, भारताने जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांकातील आपल्या मानांकनात 12 स्थानांनी सुधारणा केली आहे.

🔹भारत आणि जपान यांच्यातल्या रेल्वे सुरक्षा सहकार्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

रेल्वे सुरक्षेबाबत जपानबरोबर सहकार्य करण्याच्या कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.फेब्रुवारी 2017 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. रेल्वे मार्ग आणि रूळ सुरक्षा,यासंदर्भात अद्ययावत तंत्रज्ञान यासह आणखी काही क्षेत्रात या करारामुळे सहकार्य करायला मदत होणार आहे. तज्ञ् आणि त्यांच्या सल्ल्याचे आदान प्रदान, उत्तम प्रथांच्या माहितीची देवाण घेवाण यामुळे शक्य होणार आहे.

🔹विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यायला मंत्रिमंडळाची मान्यता

आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा 2014 अंतर्गत, विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे,आंध्र प्रदेशमध्ये,
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

🔹2017 च्या राष्ट्रीय पोलाद धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्रेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2017 च्या राष्ट्रीय पोलाद धोरणाला मान्यता देण्यात आली. यामध्ये पोलाद क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घ दृष्टीचा अवलंब करण्यात आला आहे. 2030 -31 पर्यंत 10 लाख कोटी अतिरिक्त गुंतवणुकीद्वारे, 300 एम टी पोलाद निर्मितीचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले आहे.

देशांतर्गत पोलाद वापर वाढवण्याबरोबरच उच्च दर्जाची पोलाद निर्मिती आणि तांत्रिकदृष्टया प्रगत आणि जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक पोलाद उद्योग उभारण्यावर या धोरणात भर देण्यात आला आहे.खाजगी निर्मात्यांना धोरणात्मक आधार आणि मार्गदर्शनाद्वारे पोलाद उद्योगात स्वयंपूर्णता निर्माण करणे, क्षमता वृद्धीला प्रोत्साहन देणे, वाजवी किमतीत उत्पादन करणे, परकीय गुंतवणूक सुलभ करणे,देशांतर्गत पोलाद मागणी वाढवणे ही या धोरणाची मुख्य वैशिट्ये आहेत.

🔹संपदा” या नव्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनांच्या फेर रचनेला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे.स्कीम फॉर ऍग्रो मरिन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर म्हणजेच संपदा (SAMPADA ) या योजनेअंतर्गत ही फेररचना करण्यात येणार आहे. यामुळे 20 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून 2019 -20 पर्यंत देशात 530500 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. कृषी प्रक्रियेचे आधुनिकीकरण, कृषी क्षेत्राला जोड आणि कृषी क्षेत्रातले वाया जाणारे धान्य कमी करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

🔹अँथनी लिआनझुआला यांनी नवे लेखा महानियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला

अँथनी लिआनझुआला यांनी आज नवे लेखा महानियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालयत उच्च पदांवर काम केले आहे. हे पद भूषविणारे ते ईशान्येकडील पहिले अधिकारी आहेत.

🔹
वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून देशभरात स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन

वस्त्रोद्योग मंत्रालय 1 ते 15 मे 2017 दरम्यान स्वच्छता पंधरवडा पाळत आहे. स्वच्छतेला आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा स्वच्छता पंधरवडा पाळण्यात येत आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामता यांनी आज नवी दिल्लीत उद्योग भवन येथे याचा शुभारंभ केला. त्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. ते म्हणाले की, प्रत्येकाने स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला तर स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल.

🔹स्वच्छ भारत अभियानांतर्गत दहा नव्या स्थानांचा समावेश

स्वच्छ भारत अभियानांतर्गत, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने हाती घेतलेल्या स्वच्छ आयकॉनिक अर्थात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा नव्या स्थानांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, उज्जैनचे महांकालेश्वर मंदिर, हैदराबादचा चारमिनार, श्रवणबेळगोळचे गोमटेश्वर, गया तीर्थ, गुजरातमधले सोमनाथ मंदिर यांचा समावेश आहे. स्वच्छतेचा अत्युच्च दर्जा आणि पर्यटकांसाठी सोयी पुरवण्यावर याठिकाणी अधिक लक्ष पुरवण्यात येणार आहे.

स्वच्छ आयकॉनिक ठिकाणांसंदर्भात दुसरी तिमाही आढावा बैठक आज जम्मू कश्मीरमधल्या कट्टा इथे झाली. त्यावेळी पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या प्रगतीची वाटचाल त्यांनी अधोरेखित केली. 1.92 लाख खेडी हागणदारीमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

🔹वीज वापरास प्रवेशासंबंधी स्थितीचा
अहवाल ( SEAR) 2017 जाहीर

जागतिक बँक समर्थित ग्लोबल ट्रॅकिंग फ्रेमवर्क (GTF) 2017 मार्फत वीज वापरास प्रवेशासंबंधित स्थितीचा अहवाल (State of Electricity Access Report -SEAR) 2017 जाहीर झाला आहे.

हा अहवाल जगभरातील लोकांना वीज वापरास प्रवेश याबाबत परिस्थितीचे आकलन करतो. अहवाल एका परिवर्तनीय वीजेला प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी अनुकूल पर्यावरण कसे तयार करू शकते हे शोधून काढते.

▪️अहवालातील ठळक मुद्दे

2030 सालापर्यंत जगाच्या सार्वत्रिक वीज वापरास प्रवेशासंबंधी लक्ष्य सध्या करण्यास जग झपाट्याने पाऊले उचलत नाही आहे.

2040 सालापर्यंत उप-सहारन आफ्रिकामध्ये जवळपास 1 अब्ज लोकांना वीज वापरास प्रवेश मिळू शकतो, मात्र अंदाजे 530 दशलक्ष लोकांना अद्याप वीज उपलब्ध नाही.

ऊर्जा ही इतर महत्त्वपूर्ण शाश्वत विकासासंबंधी आव्हानांशी निगडीत आहे. ते म्हणजे आरोग्य, शिक्षण, अन्नसुरक्षा, स्त्री-पुरुष समानता, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार आणि हवामानातील बदल, आदी.

वीज वापरास प्रवेश कमी असलेल्या अनेक देशांमध्ये, ग्रिड आणि ऑफ-ग्रिड या दोन्ही उपाय सार्वत्रिक प्रवेशासाठी महत्त्वाचे आहेत.

सौर ऊर्जेच्या तंत्रज्ञानासाठीच्या खर्चात वेगाने घट आणल्यास आणि ऊर्जेच्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रीत केल्यास लोकांना ऊर्जा मिळू शकेल.

▪️भारताची स्थिती

जागतिक बँकेच्या “वीज वापरण्यास प्रवेश (electricity accessibility)” क्रमवारीता 2017 मध्ये भारतात 26 व्या स्थानावर पोहचले आहे, जी स्थिती 2014 साली 99 वी होती.

सरकारचे ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 18,452 खेड्यापैकी जवळपास 13,000 हून अधिक खेड्याचे विद्युतीकरण झाले आहे आणि लक्ष्यित उद्देश 1,000 दिवसात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

🔹मुंबई मध्ये जगातील सर्वात व्यस्त एकेरी धावपट्टीचे विमानतळ

GVK समुहाद्वारे चालवले जाणारे मुंबई विमानतळ हे एकेरी धावपट्टी सुविधांमध्ये जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरलेले आहे. मुंबई विमानतळ वर्ष 2016-17 मध्ये दररोज 837 उड्डाणे किंवा सरासरी 65 सेकंदात एक उड्डाण व्यवस्थापित करते. यानंतर लंडनच्या गॅटविक विमानतळाला (757 उड्डाणे) मागे टाकले आहे.

🔹आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला 1
सुवर्ण, 5 रौप्य व 4 कांस्यपदके

नवी दिल्लीत खेळल्या गेलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद 2017 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 10 पदकांची (1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य) कमाई केली आहे. ही स्पर्धा एशियन असोसिएटेड व्रेस्टलिंग कमिटीद्वारे दरवर्षी पुरुषांची स्पर्धा 1979 सालापासून तर महिलांची स्पर्धा 1996 सालापासून आयोजित करण्यात येत आहे.

गेल्यावेळेस बँकॉक येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ९ पदके मिळाली होती.

🔹INS दर्शक ने श्रीलंकेमधील सर्वेक्षण पूर्ण केले

पूर्वीय नौदल आदेशाचे INS दर्शक हे जहाज श्रीलंकेत दोन महिन्यांपासून तैनात होते. या जहाजाने श्रीलंकेच्या वेलीगमा उपसागर आणि दक्षिणी किनारपट्टीचे सर्वेक्षण 12 मे 2017 रोजी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या जहाजाद्वारे 7000 नॉटिकल मैल अंतराहून अधिक सागरी क्षेत्रातील जल-सर्वेक्षणाची माहिती गोळा केली गेली आहे.

🔹जगभरात "रॅनसमवेयर" कम्प्युटर मालवेअरचा सायबर हल्ला

भारतासह जवळपास शंभर देशांवर "वॉनाक्राय रॅनसमवेयर" या कम्प्युटर मालवेअरचा सायबर हल्ला झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीपासून "सायबर शस्त्र" म्हणून वापर करणार्या "रॅनसमवेयर" ची याआधी चोरी झाली होती. 14 एप्रिल 2017 पासून हा मालवेअर आढळून येत आहे. सायबर हल्ल्यात प्रथम स्वीडन, ब्रिटन आणि फ्रान्स बळी पडले.

🔹अरुणाचल प्रदेशात दीनदयाल उपाध्याय स्वावलंबन योजनेचा शुभारंभ

अरुणाचल प्रदेश सरकारने राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेती व संबंधित क्षेत्रांना प्रोत्साहीत करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय स्वावलंबन योजनेचा शुभारंभ केला आहे. योजनेअंतर्गत उद्योजकांना 30% च्या अनुदानासह 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत बँक कर्ज दिले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशात न्युमोनियासाठी नवी
न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लस सुरु केली

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी 13 मे 2017 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात न्युमोनियासाठी नवी न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लस (PCV) देण्यास सुरुवात केली आहे.
नवी PCV सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा (UIP) भाग आहे.  यापुढे, ही लस नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत दिली जाईल.

PCV संबंधित नवे लसीकरण कार्यक्रम

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण हिमाचल प्रदेश तसेच बिहारमधील 17 जिल्हे आणि उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यांना समाविष्ट केले जाईल.

नवी PCV न्यूमोनिया होणार्या 13 प्रकारच्या न्युमोकोकल जीवाणूंपासून संरक्षण देईल. नवी PCV ही स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया आणि न्यूमोनिया, कानसंबंधित संक्रमण, नासिकेसंबंधित संक्रमण आणि मेनिन्जायटीस यांसारख्या रोगांपासून संरक्षण देते.

▪️न्युमोनिया म्हणजे काय?

न्यूमोनिया हा फुफ्फुसासंबंधित रोग आहे. हा सामान्यतः संसर्गामुळे होतो. जगभरातील पाच वर्षांखालील बालकांसाठी हे मृत्युचे एक प्रमुख कारण आहे. हा रोग जीवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होऊ शकतो. न्यूमोनिया होणारा सर्वात सामान्य जीवाणू स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया हा आहे. ताप, थंडी वाजणे, खोकला येणे, श्वास घेण्यास अडथळा आणि थकवा ही रोगाची लक्षणे आहे.
भारतात दरवर्षी एक लाखाहून अधिक बालकांचा न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडतात. PCV प्रथम 2000 साली सादर करण्यात आली होती.

🔹हिपॅटायटीससाठी सदिच्छा राजदूत: अमिताभ बच्चन

जागतिक आरोग्य संघटनेने बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रात हिपॅटायटीससाठी सदिच्छा राजदूत म्हणून निवड केली आहे. WHO आणि बच्चन यांच्यातील ही पहिली औपचारिक संधी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने अग्न्येय आशियात हेपेटायसिस जनजागृती वाढवून या साथीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. WHO च्या ईशान्य प्रादेशिक संचालक पूणम खेत्रपाल सिंग यांनी अमिताभ बच्चन यांची निवड केली आहे.

विषाणूजन्य हेपेटायसिस भारतासह या प्रदेशात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. मी हेपेटायसिस निर्मूलनास पूर्णपणे बांधील आहे.

हेपेटायसिस या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन यासंदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील.

🔹प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा आसाममध्ये शुभारंभ

13 मे 2017 रोजी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आसाममध्ये प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा (PMUY) शुभारंभ केला आहे. PMUY (1 मे 2016) योजनेअंतर्गत BPL कुटुंबांना आणि महिलांच्या नावाखाली कुटुंबांना 5 कोटी LPG जोडणी दिली जाईल. केंद्र सरकारच्या प्रति LPG जोडणी 1600 रुपये अनुदानासोबतच आसाम सरकार आणखी 1000 रुपये देणार आहे.

🔹शहरी परिवहन क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि यूके यांच्यात करार

भारत आणि यूनायटेड किंगडम (ब्रिटन) यांच्यात 12 मे 2017 रोजी लंडन येथे शहरी वाहतूक धोरण नियोजन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वाहतूकीच्या संस्थात्मक संघटना क्षेत्रात द्वैपक्षीय सहकार्यासाठी सामंजस्य करार (MoU) झाला आहे. ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (TFL) आणि भारतीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्यात हा करार झाला आहे.

🔹UN मानवतावादी चे प्रमुख: ब्रिटनचे मार्क लोकोक

ब्रिटिश मानवतावादी तज्ज्ञ मार्क लोकोक यांची पुढील मानवतावादी कामकाज समन्वयासाठी UN कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सप्टेंबर 2017 मध्ये पद सांभाळतील. ही नियुक्ती मानवतावादी कामकाज विभागाचे दुय्यम चिटणीस स्टीफन ओ’ब्रायन यांच्या जागेवर झाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय बहिष्करण अहवाल 2016 जाहीर

भारताच्या सेंटर फॉर इक्विटी स्टडीज (CES) ने 2016 भारतीय बहिष्करण अहवाल (Indian Exclusion Report -IXR) जाहीर केला आहे. हा अहवाल दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांना सार्वजनिक सुविधांना समानतेने प्रवेश मिळण्यापासून वगळण्यात येणारी स्थिती दर्शवतो.

हा अहवाल चार सार्वजनिक सुविधांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. ते आहेत – वृद्धांसाठी निवृत्तीवेतन, डिजिटलबाबींना प्रवेश, शेतीसाठी जमीन आणि विचाराधीन कैदीसाठी कायदेशीर न्याय .

▪️अहवालातील नमूद बाबी

जमिनीचे मालक हे नेहमीच उच्च श्रेणी जातींशी संबंधित आहेत, शेतकरी मध्यम श्रेणी जातींशी संबंधित आहेत. तर दलित आणि आदिवासी मुख्यत्वे कृषि कामगार म्हणून राहतात आणि दलितांमध्ये भूमीहीनता सर्वाधिक म्हणजेच 57.3% आहे. तसेच, 52.6% मुस्लीम आणि 56.8% स्त्रि प्रमुख असलेली कुटुंबे भूमीहीन आहेत.

विकासात्मक उपक्रमांमुळे विस्थापित झालेल्यांमध्ये सुमारे 40% आदिवासी आहेत.

जमिनीबाबत सुधारणेच्या प्रयत्नांचा दलितांना, स्त्रियांना किंवा मुसलमानांना गरज असलेल्या प्रमाणात लाभ दिला जात नाही. दलित मुस्लिम आणि स्त्रियांकडे असलेला जमिनीचा पट्टा आकाराने फारच कमी आहे. फक्त 2.08% दलित कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे.

अनुसूचित जाती-जमातींना जमीन वाटप प्रक्रिया प्रभावीपणे लागू केलेले नाही.

इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत भारताला अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळाले असले तरीही 1.063 अब्ज भारतीय इंटरनेटचा वापर करीत नाही आहेत. याला गरीबी आणि भौगोलिक स्थान हे दोन प्रमुख अडथळे असू शकतात.

कमकुवत पायाभूत सुविधा, अपुरे संस्थात्मक कार्यचौकट, लक्ष्यित भागात कमी साक्षरता आणि सरकारी योजना राबविण्यामध्ये सरकारी कार्यालयांचे खराब कार्यान्वयन अशी प्रमुख करणे डिजिटल वापरासाठी अडचण ठरत आहे.

डिजिटल इंडिया अभियानांतर्गत एप्रिल 2016 मधील स्थितीनुसार देशभरातली केवळ 6727 पंचायतींना इंटरनेट सुविधा प्राप्त झाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महिला क्रिकेटः सलामीच्या फलंदाजांचा नवा विक्रम

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या सीरिजमध्ये भारताच्या महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या सलामीच्या फलंदाजांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. आयर्लंडविरुद्ध खेळताना वनडे सामन्यात ३२० धावांची खेळी करीत या दोघींनी एका नव्या विक्रमाची नोंद केली.

महिला वनडे क्रिकेट सामन्यात सलामीला खेळताना या जोडीनी ३२० धावा करीत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफ्स्टूमच्या सेनवेस पार्कमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ३०० धावांची भागीदारी करणारी दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघींची ही जगातील पहिलीच सलामीची जोडी ठरली आहे.

आयर्लंडविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या जोडीने ४५.३ षटकापर्यंत मैदान गाजवले. या दोन्ही फलंदाजांनी आयर्लंड संघाविरुद्ध ३०० धावांची भागीदारी रचली. भारताची ३२० धावसंख्या झाली असताना १८८ धावांवर खेळत असलेली दीप्ती शर्मा बाद झाली. तोपर्यंत भारताच्या या सलामीच्या फलंदाजांनी एका नव्या विक्रमाची नोंद केली होती. याआधी २००४ मध्ये भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध २ बाद २९८ धावा केल्या होत्या.

१८८ धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या दीप्ती शर्माने १६० चेंडूचा सामना करीत २७ चौकार आणि २ षटकार ठोकले. या खेळीनंतर भारताकडून सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रमही दीप्तीच्या नावावर झाला आहे. २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये खेळताना भारताच्या जया शर्माने सर्वाधिक १३८ धावा केल्या होत्या.

🔹रॅन्समवेअर’चा धुमाकूळ; १०० देशांना फटका

जगभरातील शंभरपेक्षा जास्त देशांमधील यंत्रणांमध्ये शुक्रवारपासून ‘वॅन्नाक्राय’ या ‘रॅन्समवेअर’ने धुमाकूळ घातला. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीमधून (एनएसए) चोरण्यात आलेल्या प्रोग्रॅमच्या मदतीने हा ‘रॅन्समवेअर’ तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अनेक देशांमध्ये शुक्रवारपासून या ‘रॅन्समवेअर’मुळे यंत्रणा बंद पडू लागल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. ‘वॅन्नाक्राय’ असे त्याचे नाव असून, अन्य काही देशांमध्ये वेगळे नावही दिसत आहे. प्रामुख्याने रशिया, युक्रेन, तैवानसह युरोपीय देशांवर परिणाम झाला असून आतापर्यंत ७५ हजार तक्रारी आल्याचे ‘एव्हास्ट’ या सायबर सिक्युरिटी संस्थेने सांगितले. भारतातील यंत्रणांवरही या ‘रॅन्समवेअर’चा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हॅकर्सकडून विंडोज एक्सपी वापरणाऱ्या कम्प्युटरना लक्ष्य करण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये आरोग्य यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले. ‘माय हार्ट सर्जरी वॉज कॅन्सल्ड’ असा संदेश कम्प्युटरवर झळकून यंत्रणाच बंद पडल्यामुळे, अनेक रुग्णालयांमधील तपासणी, शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. रशिया आणि चीनलाही याचा फटका बसला. जर्मनीमध्ये रेल्वे तिकीट यंत्रणा बंद पडली, तर स्पेनमध्ये टेलिकॉम आणि नैसर्गिक वायू कंपनीची यंत्रणा विस्कळित झाली. फ्रान्समध्ये रिनॉल्ट कार कंपनी, पोर्तुगालमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्या, तर अमेरिकेमध्ये फेडएक्ससारख्या कंपन्यांच्या कामांवरही परिणाम झाला. इटलीमध्ये सुरू असणाऱ्या जी-७ देशांच्या परिषदेमध्येही या व्हायरसवर चर्चा करण्यात आली. या ‘रॅन्समवेअर’चा सर्वांत मोठा फटका रशियाला बसला असून, तेथील बँकिंग यंत्रणेबरोबरच गृह मंत्रालयाच्या एक हजार कम्प्युटरमध्येही ‘रॅन्समवेअर’ने शिरकाव केला. मात्र, गोपनीय माहिती अबाधित असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

▪️ट्रम्प यांच्या निषेधासाठी?

तज्ज्ञांच्या मते, मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेतील त्रुटी लक्षात घेऊन, अमेरिकेच्या एनएसएनेच विकसित केलेला हा व्हायरस ‘द शाडो ब्रोकर्स’ या हॅकरच्या गटाने चोरला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निषेधार्थ एप्रिलमध्ये तो सर्वांसाठी उपलब्ध करून दिला होता.

🔹कमला भसीन यांना लाडली जीवनगौरव

देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा लाडली मीडिया अॅवॉर्ड आता जागतिक पातळीवर देण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका व नेपाळमध्ये लैंगिक शोषण, बालविवाह, लैंगिक समानता या क्षेत्रांत काम करणाऱ्या पत्रकारांना दक्षिण आशिया लाडली मीडिया पुरस्काराने प्रथमच सन्मानित करण्यात आले. या विजेत्यांमध्ये पाकिस्तानमधील पत्रकार लुब्रा जेरार नक्वी यांचा समावेश आहे. यंदाचा लाडली जीवनगौरव पुरस्कार महिला हक्कांवर सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या कमला भसीन यांना प्रदान करण्यात आला.

मुंबईत एनसीपीएमध्ये झालेल्या या कार्यक्रमात लाडली मीडिया अॅवॉर्डस फॉर जेंडर सेन्सेटिव्हिटी २०१५-२०१६ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. खासदार शशी थरूर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लिंगभेद, महिला हक्क अशा विषयांवर काम करणाऱ्या महिला पत्रकार तसेच लघुचित्रपट, नाट्य, वैशिष्ट्यपूर्ण फिल्म, पुस्तके, अॅडल्ट फिल्म तयार करणाऱ्यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात आला. दक्षिण आशिया लाडली मीडिया अँड अॅडव्हर्टायझिंग अॅवॉर्ड राधिका पुरी यांच्या वॉटर व्हॉइसला बेस्ट शॉर्ट फिल्म गटात देण्यात आला. पुस्तक विभागातील पुरस्कार व्होल्गा यांना सीता लिबरेशनसाठी, प्रशंसनीय चित्रपटाचा पुरस्कार नील बट्टे सन्नाटा व पार्च या चित्रपटाला, जाहिरात विभागाचा पुरस्कार व्हिक्स जाहिरातीला तर स्टार इंडियाच्या गेम चेंजरला मीडिया पुरस्कार देण्यात आला.

नाट्यक्षेत्राचा पुरस्कार फैज जलाली लिखित व दिग्दर्शित शिखंडी नाटकाला तर जीवनगौरव पुरस्कार माहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये पाकिस्तानमधील लुब्रा जेरार नक्वी व श्रीलंकेतील पत्रकार दिनिथा रत्नावके, नेपाळमधील पत्रकार रामकला खडका यांचा समावेश आहे.

🔹महिला वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर, मिताली राजकडे नेतृत्त्व

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचे नेतृत्त्व मिताली राजकडे देण्यात आले आहे. येत्या २४ जून ते २३ जुलै या कालावधीत महिला क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) निवड समितीने सोमवारी घेतलेल्या बैठकीत १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यंदाचा हा ११ वा वर्ल्डकप असून इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. याआधी १९७३ आणि १९९३ साली इंग्लंडला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या यजमान पदाचा मान मिळाला होता. २००५ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला होता. भारताला उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण यंदा भारतीय संघाचा फॉर्म पाहता वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा चाहत्यांना आहेत.

भारतीय संघ-
मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पुनम राऊत, दिप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिक्षा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पुनम यादव, नुझात प्रविण, स्मृती मंधना

🔹भारतीय मुलाने बनवला जगातील सर्वात हलका उपग्रह!

नासा’ येत्या जून महिन्यात जगातील वजनाने सर्वात हलका असा उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. आनंदाची बाब म्हणजे अशी की तामिळनाडूत राहणाऱ्या १८ वर्षांच्या मुलाने हा उपग्रह बनवला आहे. नासा आणि ‘आय डुडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत चेन्नईचा रिफत शाहरुख सहभागी झाला होता. या स्पर्धेसाठी रिफतने हा उपग्रह बनवला. या उपग्रहाला त्याने ‘कलामसॅट’ असे नाव दिले आहे.

हा उपग्रह रिइनफोर्स्ड कार्बन फायबर पॉलिमरने तयार करण्यात आला असून तो टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम करेल तसेच भविष्यात किफायतशीर अंतराळ मोहिमांच्या योजनांसाठी प्रोत्साहन प्रदान करेल.

या उपग्रहाचे वजन आहे फक्त ६४ ग्रॅम आहे. दुसरी अभिमानाची बाब म्हणजे भारतीय विद्यार्थ्याने एका स्पर्धेत बनवलेला उपग्रह पहिल्यांदाच नासा प्रक्षेपित करणार आहे. हा छोटासा उपग्रह बनवणे खूपच आव्हानात्मक होते, असेही रिफतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. एका छोट्याशा ठोकळ्यात हा सॅटेलाईट बसवणे खूप कठीण काम होते पण रिफतने ते साध्य करून दाखवले. जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रफितने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे. २१ जूनला या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ही मोहिम २४० मिनिटांची असणार आहे आणि १२ मिनिटे हा उपग्रह अंतराळाच्या कक्षेत भ्रमण करणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर (वय ८५) यांचं 15 मे 2017 रोजी दीर्घ आजारानं निधन झालं. ते गेल्या काही दिवसापासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.

कृष्णा बोरकर यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून ‘रंगभूषाकार’ म्हणून प्रवास सुरू केला. वयोपरत्वे रंगभूषेच्या कामातून निवृत्ती पत्करल्यानंतर बोरकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या अभ्यासक्रमात ‘रंगभूषा’ हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवण्याचं काम केले. गेली सत्तर वर्षाहून अधिक वर्षे नाट्य व्यवसायात रंगभूषेची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.

१९९२च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक, गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

🔹भारताचा सर्वाधिक लांबीचा पूल

चीनच्या सीमेनजीक ब्रह्मपुत्रा नदीवर उभारणी

चीनच्या सीमेनजीक भारताच्या सर्वाधिक लांबीच्या नदीवरील पूलाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे रोजी आसाममध्ये करतील. या पूलावरून 60 टन वजनी रणगाडा देखील जाऊ शकणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर तयार झालेल्या 9.15 किलोमीटर लांबीच्या ढोला-सादिया पूलाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी रालोआ सरकारला 3 वर्षू पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमातून करतील.

भारताकडून चीन सीमेवर आपल्या संरक्षणसज्जतेला बळकट करण्याची तयारी म्हणून या पूलाकडे पाहिले जात आहे. मोदी सरकार आसाम आणि अरुणाचलप्रदेश सारख्या चीनला लागून असलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये हवाई तसेच रेल्वे संपर्क व्यवस्था बळकट करण्यावर भर देत आहे.

याचबरोबर लष्करी सामान सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील असे प्रयत्न केले जात आहे. भारतात आतापर्यंत बांद्रा-वरळी सी लिंकलाच सर्वात मोठय़ा पूलाचा दर्जा मिळाला होता, परंतु हा पूल यापेक्षा 3.55 किलोमीटर लांब असेल. अत्यंत महत्त्वपूर्ण या पूलाला मोदी 26 मे रोजी राष्ट्राला समर्पित करतील. या पूलामुळे ईशान्येत मार्गसंपर्क व्यवस्था बळकट होईल. आसाम आणि अरुणाचलच्या नागरिकांसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरेल असे आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांनी म्हटले. जवळपास 950 कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या या पूलाचे निर्मितीकार्य 2011 साली सुरू झाले होते. लष्करी ट्रक्सची ये-जा सुलभ होऊ शकेल यानुसार या पूलाची रचना करण्यात आली आहे. भारतासाठी आसाम आणि अरुणाचल प्रदेश धोरणात्मकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हा पूल चीननजीक असून आमचे सैनिक आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक सुलभ ठरेल असे सोनोवाल यांनी सांगितले.

🔹लष्करी सामर्थ्यात भारत चौथ्या क्रमांकावर

ग्लोबल फायरपॉवरचे नवे मानांकन : अमेरिका अग्रस्थानी

कोणत्या देशाचे लष्कर किती सामर्थ्यशाली आहे हा नेहमीच कुतुहलाचा विषय ठरतो. आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल फायरपॉवरने (जीएफपी) 127 देशांच्या लष्करी क्षमतेचा 50 मानकांवर अभ्यास करून यादी जारी केली आहे. या यादीत अपेक्षेनुसार अमेरिकेने पहिले स्थान मिळविले असून दुसऱया स्थानी रशिया तर तिसऱया क्रमांकावर चीन आहे. भारत या यादीत चौथ्या स्थानी असून पाकिस्तान 13 व्या क्रमांकावर आहे.

▪️अण्वस्त्रांचा ताफा

जीएफपीने 127 देशांच्या अण्वस्त्र क्षमतेचा अभ्यास केला, परंतु याचा अहवालात समावेश केलेला नाही. अन्य अहवालांनुसार अण्वस्त्रांप्रकरणी रशिया सर्वोच्चस्थानी आहे.

उत्तर कोरियाच्या क्षमतेत वाढ
जगासाठी चिंतेचा विषय ठरलेल्या उत्तर कोरियाची लष्करी क्षमता वाढली आहे. यादीत त्याचे स्थान 23 असून त्या देशाचे संरक्षण बजेट 7.5 अब्ज डॉलर्सचे आहे. त्याच्याकडे 5028 रणगाडे, 944 विमाने, 967 नौदल क्षमता आहे. त्याचबरोबर 7 लाख सक्रीय आणि 45 लाख राखीव लष्करी दल आहे. 2016 मध्ये त्याचे स्थान 25 वे होते.

याशिवाय त्याच्याकडे अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रs असल्याचा दावा करण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुंबईच्या कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी - १२ मे २०१७

मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतुकीवर असलेला विलक्षण ताण कमी करण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या व मुंबईकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नरिमन पॉईंट ते कांदिवली दरम्यानच्या सागरी किनारी मार्गाला केंद्र सरकारने पर्यावणविषयक अंतिम मंजुरी दिली आहे.

मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाढत चाललेली वाहतूक व सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे.

 त्यासाठी नरिमन पॉईंट आणि कांदिवली यादरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

▪️प्रकल्पाची वैशिष्ट्ये

नरिमन पॉईंट ते कांदिवली सागरी किनारा मार्ग
मार्गाची एकूण लांबी - ३५ किलोमीटर
प्रवेश व निर्गमन वाटा - १८ ठिकाणी
जमीन आवश्यक - १६० हेक्टर
एकूण अंदाजे खर्च - १२ हजार कोटी

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹 डॉ. धनंजय दातार यांचा ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’तर्फे गौरव

अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे नुकतेच टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१७ – रीटेल ॲवॉर्ड पुरस्काराने गौरवण्यात आले. अरब जगतातील आघाडीच्या भारतीय नामवंतांच्या यादीत डॉ. दातार यांना ३२ वे मानांकन मिळाले आहे. जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यम गृहांपैकी असलेल्या फोर्ब्ज मिडल इस्टने कार्याची दखल घेणे, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. दातार यांनी व्यक्त केली.

यंदा सलग पाचव्या वर्षी फोर्ब्ज मिडल इस्टतर्फे या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरब जगताच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून योगदान देणाऱ्या आघाडीच्या भारतीयांची बहुप्रतिक्षीत यादी फोर्ब्ज मिडल इस्टने यानिमित्ताने जाहीर केली. दुबईतील द वेस्टइन दुबई मीना सेयाही बिच रिसॉर्ट अँड मरीना येथे झालेल्या समारंभात या नामवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) कौन्सुल जनरल विपुल कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अरब जगतात वास्तव्य करणाऱ्या किंवा उद्योग चालवणाऱ्या भारतीय व्यावसायिकांबाबत सखोल संशोधन व विश्लेषण केल्यानंतर त्यांना मानांकन देऊन प्रतिष्ठित यादी तयार केली जाते. फोर्ब्ज मिडल इस्ट मासिक व्यावसायिक माहिती व सहयोगासाठी प्रमुख संर्दभ बिंदू म्हणून भूमिका बजावते, या प्रदेशातील उद्योगक्षेत्रांतील निर्णयकर्ते व गुंतवणूकदारांना सहकार्य करते आणि अरब जगतातील आर्थिक प्रगतीला चालनाही देते. त्यांचा हा पुढाकार जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही उत्तम फलित निर्माण करणारा आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹डॉ. करमाळकर पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू

ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करमाळकर हे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

राज्यपाल आणि कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज प्रेस नोट काढून ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांच्या कुलगुरूपदाचा कार्यकाळ १५ मे रोजीच संपुष्टात आल्याने करमाळकर यांची नवे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यात करमाळकर यांची निवड करण्यात आली.

डॉ. करमळकर हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केलं आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्वच्छतेत पुणे स्टेशन ‘ए वन’; ‘टॉप टेन’मध्ये एन्ट्री!

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहराने आता स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या बाबतीतही बाजी मारली आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीत ए वन विभागात टॉप टेनमध्ये पुण्याने स्थान मिळविले आहे. विशाखापट्टणम पहिल्या स्थानी असून पुणे नवव्या क्रमांकावर आहे. याबरोबरच ए विभागात महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बडनेरा यांचाही समावेश असून ते अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

मागील वर्षी या यादीमध्ये पुणे ७५ व्या क्रमांकावर होते. मात्र एका वर्षात शहराने टॉप टेनमध्ये नाव पटकाविले आहे. एकीकडे शहरातील वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातून आणि देशभरातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, असे असूनही पुणे स्टेशनने टॉप टेनमध्ये मिळविलेले अव्वल स्थान पुणेकरांसाठी आणि राज्यासाठीही अभिमानाची बाब आहे.

 आयआरसीटीसीकडून देशातील सर्व रेल्वे स्टेशनचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ४०७ स्टेशनमधून टॉप टेन रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली असल्याचे भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

यामध्येही विभाग ए वन आणि ए अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यातील ए वन या विभागात पहिल्या दहामध्ये विशाखापट्टणम, सिकंदराबाद, जम्मू तवी, विजयवाडा, आनंद विहार टर्मिनल, लखनऊ अहमदाबाद, जयपूर, पुणे आणि बॅंगलोर यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतील वांद्रे १५ व्या क्रमांकावर आहे.

याशिवाय ए विभागात बियास, खम्माम, अहमदनगर, दुर्गापूर, मंचेरीयल, बडनेरा, रंगिया, वर्णागळ, दामोह आणि भूज हे टॉप टेनमध्ये आहेत. याबरोबरच लोणावळा २९ व्या तर सोलापूर १५ व्या क्रमांकावर आहे. याबरोबरच अस्वच्छ स्टेशनची यादीही तयार करण्यात आली असून दरभंगा भोपाळ आणि अंबाला कॅंट सर्वात अस्वच्छ स्टेशन असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🔹फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत अव्वल असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. जगातील २५ उद्योजकांमध्ये अंबानी यांना पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले असल्याने ही भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे. भारतीय जनतेला जिओच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सुविधा पुरविण्याच्या सुविधेमुळे अंबानी यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

तेल आणि गॅसबरोबरच अंबानी यांनी टेलिकॉम क्षेत्रातही दमदार प्रवेश केला आहे, रिलायन्सच्या जिओने भारतातील जवळपास १० कोटी नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, असे सांगत फोर्ब्सकडून अंबांनींचे कौतुक करण्यात आले आहे.

अंबानी यांच्याशिवाय या यादीमध्ये डायसन कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, सौदी येथील प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, टायकून क्रिस्टो आणि ब्लॅक रॉकचे लैरी फिंक यांनाही स्थान मिळाले आहे. यावेळी मुकेश अंबानी म्हणाले, जिओचं कार्ड आता घरपोच मिळणार आहे. हे सिमकार्ड पाच मिनिटांत अॅक्टिव्हेट होईल. शिवाय इतर मोबाईल नंबरही जिओ 4Gमध्ये पोर्ट करण्याची सोय असल्याचंही अंबानी यांनी सांगितलं. या यशासाठी अंबानी यांनी ग्राहक, सरकार आणि ट्रायचे आभार मानले. अवघ्या 3 महिन्यांतच जिओचे 5 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झाले आहेत. तसंच दिवसाला 6 लाख ग्राहक जिओ 4Gची सेवा घेत असल्याचं मुकेश अंबानी यांनी नमूद केलं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹निर्भया निधीतून रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीसाठी पाचशे कोटी

देशातील ९०० रेल्वे स्टेशन्सवर भारतीय रेल्वे निर्भया निधीतून सीसीटीव्ही टेहळणी प्रणाली बसवण्यात येणार आहे. रेल्वे परिसरातील सुरक्षेसाठी त्यासाठी पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबाबत निविदा काढण्यात येणार असून ९८३ स्थानकांवर एकूण १९ हजार सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांसह प्रवाशांना सुरक्षित वातावरण लाभणार आहे. केंद्र सरकारने निर्भया बलात्कारानंतर २०१३ मध्ये एक हजार कोटींचा निधी निर्भया निधी म्हणून वेगळा ठेवला होता, त्यात सरकार व स्वयंसेवी संस्थांनी महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या निधीचा उपयोगच केला नसल्याच्या तक्रारी अलीकडे आल्या होत्या. स्टेशन मास्तरांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्ये पाहता येतील, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेची देशात एकूण ८००० स्थानके असून त्यातील ३४४ स्थानकांवर आधीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. सध्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फायदाच होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, सीसीटीव्ही प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग हा गुन्हा घडून गेल्यानंतर तपासासाठी होत असतो. राजधानीसारख्या काही गाडय़ांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. हमसफर एक्सप्रेस व तेजस् सेवेतील गाडय़ांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

🔷23 मेपासून पेटीएम बँक सुरू

पुढील आठवडय़ापासून पेटीएमची बँक कार्यरत होईल. 23 मेपासून ही बँक सुरू करण्यात येणार आहे. ही बँक सुरू करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची अगोदरच परवानगी मिळाली आहे. या बँकेच्या खात्यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येईल असे पेटीएम पेमेन्ट्स बँक लिमिटेडने सांगितले.

पेटीएम आपला वॉलेट व्यवसाय पेमेन्ट्स बँकेकडे देणार आहे. 23 मेनंतर पेटीएम वॉलेटमधील रक्कम पेटीएम पेमेन्ट्स बँकेत जमा होईल. जर कोणत्याही ग्राहकाला आपल्या खात्यातील रक्कम बँक खात्यात जमा करायची नसेल तर पेटीएमला 23 मे अगोदर सांगावे लागेल. अन्यथा ग्राहकांची रक्कम पेटीएम बँकेत जमा होईल. पेटीएम पेमेन्ट्स बँकेत खाते खाते उघडण्यात आल्यानंतर खाते क्रमांक, धनादेश पुस्तिका, डेबिट कार्ड देण्यात येईल.

गेल्या सहा महिन्यांपासून कोणतेही पेटीएम वॉलेट सक्रीय नसेल तर ग्राहकाच्या परवानगीनंतर रक्कम हस्तांतरित करण्यात येईल. पेटीएम बँक सुरू करण्यात आल्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. कंपनीकडून यापूर्वी देण्यात येणाऱया सुविधा कायम राहतील.

🔹4 टक्के दराने वाढतेय डाटाचोरी

भारतात 3.6 कोटी दस्तऐवजांशी छेडछाड 2015च्या तुलनेत 14 टक्क्यांची वाढ

जागतिक डिजिटल सुरक्षा कंपनी जेमाल्टोने ऑनलाईन डाटाचोरी निर्देशांक-2016 जारी केला आहे. यानुसार जगभरात मागीलवर्षी एक अब्जापेक्षा अधिक डिजिटल दस्तऐवजांमध्ये भगदाड पाडण्यात आले. भारतात मागील वर्षी जवळपास 4 कोटी दस्तऐवजांना याचा फटका बसला. 2015 च्या तुलनेत यात 14 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. जगभरात प्रमुख 10 डाटाचोरींमध्ये सहावे स्थान केरळला मिळाले आहे.

सर्वाधिक धोकादायक घटना
वृद्ध लोकांची सोशल नेटवर्किंग साइट अडल्ट प्रेंड फाइंडरच्या डाटाबेसमध्ये भगदाड पाडून 41.2 कोटी लोकांची खाती हॅक करण्यात आली. याला निर्देशांकात (ब्रीच लेव्हल इंडेक्स) पूर्ण 10 गुण मिळाले.

केरळ ठरले शिकार

केरळमधील 3.4 कोटी लोकांचे उत्पन्न, वय, नाव आणि इतर वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यात आली. या डिजिटल चोरीला ब्रीच लेव्हल इंडेक्समध्ये 9.4 गुण मिळाले.

देशाची स्थिती

33 वेळा
पाडण्यात आले
दस्तऐवजांमध्ये भगदाड

3.66 कोटी
डिजिटल दस्तऐवजांशी झाली 33 वेळा छेडछाड.

जगातील चित्र

1792
जगभरात डिजिटल भगदाडाच्या घटना

52.2 टक्के
घटनांमधील प्रभावित दस्तऐवजांची संख्या अज्ञात.

जर्मनीने निर्मिले सायबर कमांड पथक

जर्मनीने सायबर हल्ल्यांपासून सुरक्षेसाठी सायबर कमांड युनिटची स्थापना केली आहे. असे करणारा तो नॉर्थ अटंलाटिक ट्रीटी ऑर्गनायझेनशचा (नाटो) पहिला देश ठरला आहे. तेथील लष्कर विभागाने सायबर अँड इन्फॉर्मेशन स्पेसला नौदल, लष्कर आणि हवाईदलासमान दर्जा दिला आहे.

सीआयआर

याचे मुख्यालय पश्चिम जर्मनीच्या बोन शहरात आहे. यात 260 आयटी तज्ञ तैनात करण्यात आले आहेत. जुलैमध्ये या तज्ञांची संख्या 13500 वर नेली जाणार आहे.

धोका वाढतोय

जर्मनीच्या लष्करी विभागाच्या संगणक नेटवर्कला 2017 च्या पहिल्या दोन महिन्यांमध्येच 2.84 लाखवेळा लक्ष्य करण्यात आले आहे.

जबाबदारी

हे पथक लष्करी आयटी विभाग आणि संगणकाने संचालित शस्त्रास्त्रांची सुरक्षा करेल. ऑनलाईन हल्ले रोखणे आणि युद्धासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी हे पथक पार पाडेल.

आरोग्य विभागात सर्वाधिक डाटाचोरी
एकूण हिस्सेदारी घटनांची संख्या संबंधित क्षेत्र

13 टक्के 229 अन्य
09 टक्के 157 शिक्षण
11 टक्के 189 तंत्रज्ञान
12 टक्के 214 वित्तीय
28 टक्के 483 आरोग्य
15 टक्के 269 सरकार
12 टक्के 215 रिटेल

डाटाचोरी उघडकीस येण्याच्या घटना…
4 टक्के 79 इतर आवश्यक डाटा
8 टक्के 143 उपद्रव
11 टक्के 190 ऑनलाईन खाते
59 टक्के 1050 ओळखपत्रविषयक
18 टक्के 330 रकमेची चोरी

🔹अक्षय्य ऊर्जेसाठीच्या गुंतवणुकीत भारत दुसरा

अक्षय्य ऊर्जेसाठीच्या गुंतवणूक प्रकरणी भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. याप्रकरणी आता फक्त चीनच भारताच्या पुढे असल्याचे युनायटेड किंग्डममधील ईवाय या कंपनीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 40 अक्षय्य ऊर्जा बाजारांसाठीच्या वार्षिक मानांकनात चीनने पहिले स्थान मिळविले आहे.

 अमेरिका या यादीत तिसऱया स्थानी घसरले आहे. मागील वर्षी भारताला या यादीत तिसरे स्थान मिळाले होते. मोदी सरकारने अक्षय्य ऊर्जेच्या माध्यमातून 2022 पर्यंत 175 गिगावॅट निर्मितीचे लक्ष्य राखले आहे. तर 2040 सालापर्यंत यात 40 टक्क्यांची वाढ करण्याची योजना आखल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताने 3 वर्षांमध्ये सौरऊर्जा निर्मिती क्षमतेत 10 गिगावॅटची भर केली आहे.

सरकारचा ठोस पाठिंबा तसेच आकर्षक अर्थव्यवस्थेने भारताला या यादीत दुसरे स्थान पटकाविण्यास मदत केली आहे. कोळसा प्रकल्पांच्या तुलनेत कमी दरात वीज उपलब्ध करण्याचा प्रस्ताव सौरऊर्जा उत्पादकांनी दिला आहे.

🔹82 वर्षीय चौताला तुरुंगातून 12 वी पास

 तिहार तुरुंगात कैद असणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांनी वयाच्या 82 व्या वर्षी 12 वीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळविली आहे. आता ते पदवी मिळविण्यासाठी तयारी करत आहेत. चौताला यांनी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगमदून 12 वीचे शिक्षण घेतले. चौताला आणि त्यांचे पुत्र अजय यांना 16 जानेवारी 2013 रोजी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 10 वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

तिहारमध्ये आपली सकाळ वृत्तपत्रांमधील वृत्तांवर चर्चेसह सुरू होते. यानंतर अभ्यास आणि टीव्ही पाहणे दिनक्रमात सामील असल्याचे अलिकडेच जामिनावर बाहेर पडलेल्या चौताला यांनी सांगितले.

निवडणुकीशी संबंध

हरियाणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील असाच नियम लागू होऊ शकतो असे मानले जात आहे. हे पाहता निवडणूक लढविण्यासाठी चौताला तुरुंगातूनच शिक्षण घेत आहेत.

5 वेळा राहिलेत मुख्यमंत्री

देविलाल चौताला यांचे पुत्र ओमप्रकाश चौताला 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे पुत्र अजय आणि अभय हे देखील राजकारणात सक्रीय आहेत. तर नातू दुष्यंत हे खासदार आहेत. तर दुष्यंत यांची आई नैना या आमदार आहेत.

🔹ऑपरेशन क्लीन मनी’ संकेतस्थळाचे उद्धघाटन

भारताचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी ‘ऑपेरेशन क्लीन मनी’ या आयकर खात्याच्या नव्या संकेतस्थळाचे उद्धघाटन केले. हे संकेतस्थळ प्रामाणिक करदात्यासाठी साहय्याक ठरेल. तर काळय़ा पैशाविरूद्धच्या लढय़ातंर्गत सुरू करण्यात आलेल्या या संकेतस्थळामुळे मोठय़ा प्रमाणतील रोख तसेच कर चुकवलेल्या पैशाद्वारे व्यवहार करणे आता सुरक्षित राहणार नाही. अशा व्यवहारांचा शोध घेणे अधिक सोपे होणार आहे. अशा व्यवहारात लिप्त व्यक्ती आता कायदय़ाच्या नजरेतून निसटू शकणार नसल्याचा इशारा जेटली यांनी यावेळी दिला. या संकेतस्थळात युझर गाईड, वारंवार उत्पन्न होणाऱया शंका आणि पडताळणी संबंधी प्रशिक्षण साधनांची माहिती उपलब्ध असणार आहे. करसंबंधीत नियमांची पुर्तता करणे या संकेतस्थळाद्वारे अधिक प्रशस्त होईल.

🔹आदेनच्या आखातामध्ये चाचेगिरीचा प्रयत्न आयएनएस शारदाने हाणून पाडला

आदेनच्या आखातामध्ये गस्त घालणाऱ्या नौदलाच्या आयएनएस शारदा या युद्धनौकेने सागरी चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ‘आयएनएस शारदा’ 6 एप्रिल 2016 पासून आदेनच्या आखातामध्ये गस्त घालण्यासाठी कार्यरत आहे.

दोन मोठी जहाजे आणि 7-8 छोटी गलबते मिळून सागरी चाचेगिरी करून लुटालुटीचा प्रयत्न करीत असल्याचा सुगावा लागताच शारदाने तातडीने कारवाई करून समुद्री चाच्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यासाठी भारतीय नौदलाच्या ‘मारकोस’ आणि सशस्त्र हेलिकॉप्टरची मदत घेऊन चाचेगिरी करणारी एक शिडी गलबतं आणि त्यांच्या सहकाऱ्यांची छोटी जहाजे कुठे आहेत, यांचा ठावठिकाणा शोधण्यात आला. या चाच्यांकडे उच्चप्रतीची एकेएम रायफल, जीवंत काडतुसे, इतर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांचा साठा सापडला.

🔹निर्यात व्यापारामध्ये वृध्दी

भारताच्या निर्यात व्यापारामध्ये एप्रिल 2017 मध्ये भरीव वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. देशाच्या निर्यातीमध्ये एप्रिल 2017 मध्ये 19.77 टक्के वाढ झाली आहे. एकूण 24635.09 दशलक्ष डॉलर इतकी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल 2016) 20568.85 दशलक्ष डॉलर किंमतीची निर्यात झाली होती.
निर्यात वाढीमध्ये अमेरिका (4.74 टक्के), जपान (13.30 टक्के) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

निर्यातीबरोबरच देशाच्या आयातीमध्येही वृध्दी नोंदवली गेली आहे. एप्रिल 2017 मध्ये भारताने 37884.28 दशलक्ष डॉलर्सची आयात केली. गेल्या वर्षी याच काळात 25413.72 दशलक्ष डॉलर्सची आयात केली होती.

एकूण भारताच्या आयात निर्यातीमध्ये यंदा सातत्याने वृध्दी होत आहे.

🔹भारतीय नौदल आणि उपग्रह केंद्र अहमदाबाद यांच्या दरम्यान सामंजस्य करार

भारतीय नौदल आणि हवामानशास्त्र समुद्रशास्त्र विभाग यांच्यादरम्यान आज माहितीची देवाण-घेवाण करण्यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय नाविक दलाचे व्हाईस ॲडमिरल एस.एन.घोरपडे आणि अहमदाबाद उपग्रह केंद्राचे संचालक तपन मिश्रा यांनी या करारावर आज स्वाक्षरी केल्या. या करारामुळे पर्यावरण शास्त्राबरोबरच हवामानशास्त्र आणि समुद्रीशास्त्र विषयीची माहिती आता नौदलाला मिळणार आहे. समुद्रातील हवामानाची अचूक माहिती मिळाल्यास त्याचा फायदा नौदलाला घेता येणार आहे. याप्रसंगी पर्यावरण, समुद्रशास्त्र क्षेत्रात संशोधन करणारे शास्त्रज्ञ, गुजरात नौदल क्षेत्राचे अधिकारी, समुद्रशास्त्र आणि हवामान विभागाचे मुख्य संचालक आदि उपस्थित होते.

🔹स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच तयार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

भारताच्या स्थानिक अणुऊर्जा कार्यक्रमाला गती देण्यासाठी आणि देशाच्या परमाणू उद्योगाला चालना देण्यासाठी,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच तयार करायला मंजुरी दिली. त्यांची एकूण स्थापित क्षमता ७हजार मेगावॅट इतकी असेल. या प्रकल्पामुळे अणुऊर्जा निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.

भारताची सध्याची स्थापित क्षमता ६७८० मेगावॅट इतकी आहे. सध्या निर्मिती सुरु असलेल्या प्रकल्पांमधून २०२१-२२ पर्यंत आणखी ६७०० मेगावॅट अणुऊर्जा उपलब्ध होईल.

या क्षेत्रात 'मेक इन इंडिया'
उपक्रमांमधील हा महत्वपूर्ण उपक्रम असेल.

शाश्वत विकास, ऊर्जेतील स्वयंपूर्णता आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना गती देण्याच्या भारताच्या कटिबद्धतेला यामुळे मदत मिळेल.

🔹देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला,
जो आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित केला आहे, कार्योत्तर मंजुरी दिली . पंतप्रधानांनी ३१ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात देशभरात मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती.

या कार्यक्रमांतर्गत , महिलांना वेतनाची नुकसान भरपाई रोख स्वरूपात देण्यात येणार आहे,
जेणेकरून महिलांना प्रसुतीच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेता येईल . या प्रस्तावाचा एकूण खर्च केंद्र आणि राज्य सरकारचा मिळून १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०२० पर्यंत १२,६६१ कोटी इतका आहे. तर केंद्र सरकारचा हिस्सा ७९३२ कोटी रुपये इतका आहे.

पहिल्या बाळाच्या प्रसुतीसाठी गरोदर महिला आणि स्तन्यदा माता ज्या सरकारी सेवेत कार्यरत नाहीत, त्यांना ३ हप्त्यांमध्ये ५ हजार रुपये आणि उर्वरित रक्कम मातृत्व लाभ कार्यक्रमाच्या निकषांनुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔹राज्यात नवीन 3165 तलाठी साझ्यांसह

528 महसूल मंडळांची निर्मितीस मंजूरी
2017-18, 2018-19, 2019-20 आणि 2020-21 या वित्तीय वर्षांमध्ये चार टप्प्यात राज्यात नवीन 3165 तलाठी साझे व 528 महसूल मंडळे यांच्या निर्मितीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विभागनिहाय कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तलाठी साझे व महसूल मंडळे निर्माण करण्यात येणार आहे.

राज्यातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या विचारात घेऊन महसूल यंत्रणेशी संबंधित विविध कामे तातडीने पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळाव्यात या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्याच्या संरचनेनुसार प्रत्येकी सहा तलाठी साझ्यांचे मिळून एक महसूल मंडळ असते. राज्यात एकूण 12,327 तलाठी साझे व 2,093 महसुली मंडळे कार्यरत आहेत.

🔹जनहिताच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा देण्यास मान्यता

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पांच्या उभारणीसाठी महसूल विभागाव्यतिरिक्त इतर शासकीय विभागाच्या अधिपत्याखालील अथवा व्यवस्थापनाखालील जमिनीची गरज निर्माण झाल्यास अशा जमिनीचा आगाऊ ताबा संबंधित प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या शासकीय यंत्रणेकडे देता यावा यासाठीच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

या निर्णयामुळे राज्याच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या, जसे की सार्वजनिक वाहतूक, सिंचन, जलविद्युत प्रकल्प, मोठे पाणीपुरवठा प्रकल्प, पर्यटन विकासासाठीचे प्रकल्प आदी प्रकल्पांच्या उभारणीस लागणारा विलंब दूर होण्यास मदत होणार आहे.

ज्या निकडीच्या सार्वजनिक प्रकल्पांना यापूर्वी मंत्रिमंडळ अथवा मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मान्यता दिली आहे मात्र त्यांना शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा मिळालेला नाही अशा प्रकल्पांनाही हे धोरण लागू होईल.

🔹सार्वजनिक कामकाजाच्या सूचकांक मध्ये केरळ प्रथमस्थानी

भारत सरकारने वर्ष 2017 साठी सार्वजनिक कामकाजाच्या सूचकांक (Public Affairs Index) प्रसिद्ध केला आहे. हा सूचकांक राज्यातील प्रशासनाची स्थिती दर्शवते. पब्लिक अफेयर्स सेंटर (PAC), बंगळुरू या वैचारिक संस्थेने याबाबत सर्वेक्षण केले आहे.

PAC च्या हा सर्वेक्षण 10 संकल्पना, 26 लक्ष्यित विषय आणि 82 निर्देशक यांच्या आधारावर केला गेला आहे.

PAI 2017 मधील ठळक मुद्दे
PAI 2017 मध्ये प्रथम पाच स्थानी अनुक्रमे केरळ (1), तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र (5) हे आहेत. यादीत शेवटी बिहार (18) आहे.

महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा वर्गात पंजाब हे सर्व राज्यांमध्ये उत्कृष्ट ठरले आहे. त्यानंतर अनुक्रमे तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि गुजरात हे आहेत.

मानव विकास वर्गात अनुक्रमे केरळ, महाराष्ट्र आणि पंजाब ही प्रथम तीन राज्ये आहेत तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसाम ही सर्वात वाईट कामगिरी करणारी राज्ये आहेत.

सामाजिक सुरक्षा धोरणांच्या अंमलबजावणीत अनुक्रमे केरळ, आसाम आणि मध्यप्रदेश या राज्यांनी यादीत प्रथम तीन स्थान मिळवली आहेत. तेलंगाना, हरियाणा आणि पंजाब हे या यादीत तळाशी आहेत.

स्त्री आणि मुलं यांच्या गटात प्रथम तीन स्थानी केरळ, ओडिशा आणि कर्नाटक आघाडीवर, तर झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र हे तळाशी आहेत.

तामिळनाडू कायदा व सुव्यवस्था राखण्यात, न्यायदान व वातावरण वर्गात प्रथम स्थानी तर प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वर्गात शेवटच्या स्थानी आहे.

वित्तीय व्यवस्थापन वर्गात तेलंगणा सर्वोत्तम तर, आंध्रप्रदेशने यादीत शेवटचे स्थान मिळवले आहे.

आर्थिक स्वातंत्र्य वर्गात गुजरात यादीत प्रथम स्थानी, तर बिहार शेवटच्या स्थानी आहेत.

🔹नर्मदा सेवा मिशनचा शुभारंभ

15 मे 2017 रोजी मध्य प्रदेशातल्या अमरकंटक येथे ‘नर्मदा सेवा यात्रा’ चा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशमध्ये 15 मेला नर्मदा सेवा मिशनचा शुभारंभ केला गेला आहे.
नर्मदा नदीचे संरक्षण करण्याकरिता जनजागृतीच्या हेतूने नर्मदा सेवा यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

🔹भारत-सिंगापूर संयुक्त नौदल सराव
'SIMBEX' आयोजित

सिंगापूर मध्ये हिंद महासागरात 24 व्या भारत-सिंगापूर संयुक्त नौदल सराव 'SIMBEX' चे आयोजन केले गेले आहे. 1994 सालापासून दरवर्षी 'SIMBEX' आयोजित करण्यात येत आहे. हिंद महासागर प्रदेशातील या दोन्ही देशांच्या नौदलात समन्वय वाढविण्याच्या हेतूने हा सराव आहे.

🔹कोलोनोस्कोपी करण्यासाठी पहिले-वहिले 'कॅप्सूल रोबोट' विकसित

अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी मोठ्या आतड्याच्या शस्त्रक्रियेत कोलोनोस्कोपी अधिक सुलभ करण्याकरिता पहिले-वहिले 'कॅप्सूल रोबोट' विकसित केले आहे.
18 मि.मी. आकाराचा हा रोबोट भविष्यात कर्करोगजन्य विकृती आणि ट्यूमर काढून टाकण्यास सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे वापरता येऊ शकेल.

🔹16 मे पासून भारत-चिली PTA लागू झाले आहे

भारत आणि चिली यांनी भारत-चिली अधिमान्य व्यापार करार (Preferential Trade Agreement -PTA) च्या विस्तारावर करार म्हणून त्यांच्या व्यापारसंबंधित संबंधामध्ये आणखी एक लक्ष्य साध्य केले आहे. 6 सप्टेंबर 2016 रोजी झालेला हा करार 16 मे 2017 पासून लागू केले जात आहे.

यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कर मर्यादा (tariff lines) च्या संख्येत विस्तारीत सवलती प्रदान करण्यात येतील ज्यामुळे अधिक द्वैपक्षीय व्यापार करण्यास सुविधा मिळणार.

PTA विस्तारत समाविष्ट बाबी

भारताद्वारा चिलीला प्रदान केल्या जाणार्या सूचीमध्ये फक्त 178 कर मर्यादा समाविष्ट आहेत, जेव्हाकी चिलीच्या सूचीत 8 अंकी स्तराच्या 296 कर मर्यादा समाविष्ट आहेत.

चिलीने भारताला 30% पासून 100% पर्यंतच्या मार्जिन ऑफ प्रिफरेंस (MoP) सोबत 1798 कर मर्यादांवर सवलती प्रदान केले आहे. तर भारताने चिलीला 8 अंकी स्तरावर 10% पासून 100% पर्यंतच्या MoP सोबत 1031 कर मर्यादांवर सवलती प्रदान केल्या आहेत.

भारत-चिली संबंध

चिली हा लॅटिन अमेरिकेच्या क्षेत्रातील ब्राजील, वेनेजुएला आणि अर्जेंटीना नंतर भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार वित्तीय वर्ष 2014-15 च्या काळात भारताचा द्वैपक्षीय व्यापार वाढून USD364.645 कोटी पर्यंत पोहचला आहे, जेव्हाकी वित्तीय वर्ष 2011-12 मध्ये व्यापार USD265.535 कोटी वर होता. तर वित्तीय वर्ष 2015-16 मध्ये USD67.932 कोटीची निर्यात आणि USD196.067 कोटीची आयात झाली.

भारत आणि चिली यांच्यात प्रथम 8 मार्च 2006 रोजी PTA वर स्वाक्षर्या झाल्या होत्या, जे ऑगस्ट 2007 मध्ये लागू झाले होते. मूळ PTA मध्ये कर मर्यादा कमी संख्येत होत्या. संसदेत एप्रिल 2016 मध्ये PTA च्या विस्तारास मंजूरी मिळाली होती.