Exam Guidance लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Exam Guidance लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Post views: counter

Basic Economics for MPSC Exams ..


                                 यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयात-निर्यातसंबंधित आकडेवारी.
                              राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये अर्थशास्त्रासंबंधात खालील प्रकरणांचा समावेश आढळतो- शाश्वत विकास, दारिद्रय़, सर्वसमावेशक धोरण, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार.

Prepration Of Economics For STI Exam

विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा- 

                                   विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्रविषयक जो अभ्यासक्रम नमूद केलेला आहे, त्यामध्ये बँकिंग या उपघटकाचाही समावेश आहे. बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना भारतीय बँक व्यवसाय, बँकांचे राष्ट्रीयीकरण, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्य, व्यापारी बँकांचे कार्य, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, अग्रणी बँक योजना, सहकारी बँक व्यवसाय तसेच नाबार्ड, विमा कंपन्या इ. अभ्यास करावा. बँक व्यवसायासंबंधित अभ्यास करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे चलनविषयक धोरण समजून घेत अभ्यास केल्यास हा घटक सोपा होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे. या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये खालील प्रश्न विचारले गेले आहेत.

Post views: counter

How to prepare for PSI Exam ?

                


              एमपीएससी'मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या शारीरिक चाचणीची आणि नंतर मुलाखतीची तयारी कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन.
                  गेल्या दोन वर्षांत 'एमपीएससी'च्या विविध परीक्षापद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे, परसेन्टाइल सिस्टीम, मुलाखतीमध्ये 'कट ऑफ मार्क्स' यासारख्या बदलांचा उल्लेख करता येईल. 'पीएसआय'- पोलीस उपनिरीक्षक आणि 'असिस्टंट' परीक्षांच्या गुणांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्येही बदल झाले असून 'एसटीआय' सोबत 'टॅक्स असिस्टंट' पदांची भरती करण्यासारखे बदलही आपल्या लक्षात येतात.

How to prepare for PSI/STI/Asst pre Exam ?

                 
 मित्रांनो, परीक्षा जसजशी जवळ येते तसतसे मनावरचे दडपण वाढत जाते.. साधारणत: दिवसांचा अगदीच गणिती भाषेत तासांचा हिशेब केला आणि त्या तासांचा आपल्या जबाबदाऱ्या व अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा मेळ घातला तर आपल्यापाशी फारच कमी वेळ आहे, असे तुम्हाला जाणवेल. पण हातात असलेल्या वेळेचा योग्य मेळ साधला तर यश मिळवणे कठीण नाही. या परीक्षेची तयारी करताना पुढे नमूद केलेल्या घटकांचा सविस्तर अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
                   आगामी PSI/STI/Asst पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे ५० मिनिटांच्या अभ्यासानंतर

How to prepare for MPSC Interview ?

                
मुलाखतीच्या संदर्भात उमेदवारांमध्ये अनेक गैरसमज असतात- उदा. उमेदवाराचे दिसणे महत्त्वाचे ठरते, अमूक एका पद्धतीचा पेहराव केलेला असावा, पाठ केल्यासारखी उत्तरे देणे योग्य, उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होती अशी द्यावीत.. हे सारे तद्दन गैरसमज आहेत. एक मात्र नक्की की, मुलाखतीची नीट तयारी करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला जाताना नेटकेपणाने, टापटीपीने जाणे आवश्यक असते.

Way to Success in MPSC Exam ?




सफलता मिळत नसते, मिळवावी लागते ....

मित्रांनो,
मला बरेच जण (नेहमीच कुणी ना कुणी) विचारतात कि “मी हे हे
शिक्षण करत आहे किंवा कम्प्लीट केल आहे मग
मी एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल होईल का?”.

आता मलाच हा प्रश्न पडतो कि मला त्यांच्याबद्दल काहीच
माहित नाही आणि मी कस काय सांगू कि ते सफल होतील
कि नाही?

…पण एक मात्र मी खात्रीने सांगू शकतो कि सफलता मिळत
नसते तर ती मिळवावी लागते.
प्रत्येकाला सफल व्हाव अस वाटत असते आणि त्यात चूक
काहीच नाही.
एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो किंवा युपीएससीची असो,
त्यासाठी अभ्यास करायचा असतो हे तर सर्वांनाच माहित
असते आणि प्रत्येक जन अभ्यास करतात हे तर आहेच.

स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सुचना..
  1. स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करु नका तर तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवा. प्रत्येक गोष्टीत अभ्यास शोधा तरच तुमच्यामध्ये भावी अधिकारी होण्याचे गुण तयार होतील.
  2. अनेक जण फक्त पाठांतरावर जास्त जोर देतात. आणि आपली बौद्धिक पातळी वाढवतात परंतू परिस्थितीला समजून घेण्याची क्षमता वाढवत नाहीत.घोकंपट्टीकरण्याऐवजीसमजून उमजून लक्षात ठेवण्यावर भर द्या.
Post views: counter

How To Prepare For MPSC State Service Pre Exam ?

                    
mpsc-state-before-to-deal-with-the-examination


    राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धापरीक्षेची पूर्वतयारी करताना काही अभ्यासतंत्रे विकसित करणे आवश्यक असते. त्याविषयी..
                             गेल्या काही वर्षांत राज्यभरातून स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा विचार करता, सुमारे ४५० पदांसाठी, १२-१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेलाही १३-१४ लाख विद्यार्थी बसतील, अशी अपेक्षा आहे. या परीक्षेला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

How To Read NCERT Books For Civil Servicess?

                         
ncert-books-base-for-upsc-examination


यूपीएससी अभ्यासाच्या आराखडय़ातील सर्वात महत्त्वाचा घटक किंवा साधन म्हणजे 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके होत.
                         पदवीचे शेवटचे वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्षात अभ्यासाच्या तयारीचा संकल्प करतात, त्या वेळी अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, कोणती पुस्तके वाचावीत, असे अनेक प्रश्न समोर येतात. अशा परिस्थितीत सुरुवातीची दिशा महत्त्वाची असते. प्रारंभिक दिशाच चुकली तर पुढील प्रयत्न भरकटण्याची शक्यता अधिक असते. खरेतर या टप्प्यावर मार्गदर्शकाची निवड महत्त्वाची ठरते, जो आपल्याला एक आराखडा आणि मार्ग ठरवून देऊ शकतो. अशा निर्णायक प्रसंगी योग्य सुरुवात करण्यासाठी थोडा अधिक वेळ घेतला तरी चालू शकतो.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा : योग्य दृष्टिकोन हवा

                            राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती अलीकडेच पार पडल्या. १,३६७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यापकी बहुतांश उमेदवार एकतर पद प्राप्त असतात किंवा एक/दोन मुख्य परीक्षांचा अनुभव असणारे किंवा दोन/तीन वर्षांपासून प्रयत्न करणारे किंवा यूपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार असे होते. २०१२ साली, २०१३ साली आणि २०१४ साली राज्यसेवा, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या परीक्षांद्वारे यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहिल्यास नेमकी हीच बाब अधोरेखित झालेली लक्षात येईल. त्यावेळी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी झालेले उमेदवारसुद्धा आहेत, पण हे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१२ नंतर प्रकर्षांने जाणवणारा हा महत्त्वपूर्ण बदल आहे. या बदलामागे काही कारणे आहेत-

How the study doing that important:राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यास 'कसा' करता, हे महत्त्वाचे!

how the study doing that important
                                पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची सरळ दोन भागांत विभागणी करावी- खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचे. पहिल्या भागामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था या चार घटकांना ठेवावे. अभ्यासण्यासाठी बाकीचे चार घटक दुसऱ्या भागामध्ये येतील. या अतिमहत्त्वाच्या घटकांचे महत्त्व जास्त का याचा विचार केला की लक्षात येते, इतिहास वगळता या विषयांवरचे प्रश्न 'मूलभूत' संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येत नाहीत. प्रश्नांचा रोख संकल्प, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पलूंवर विचारण्यावर असतो. त्यामुळे याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. 'इतिहास' विषय हा गटात असण्याचे कारण म्हणजे या विषयावरील प्रश्नांची जास्त संख्या आणि प्रश्नांचे विश्लेषणात्मक स्वरूप.
Post views: counter

How To Read News Paper For Civil Services?



how to Read news paper for civil Services

                                 ब्रिटिशकालीन भारतात वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी एका बाजूला ज्ञान, शिक्षण आणि प्रबोधन तर दुसऱ्या बाजूला लोकांना संघटितरीत्या कृतिसज्ज बनवून वसाहतिक शोषणयंत्रणेच्या विरुद्ध उभे करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी राज्यसत्तेच्या कारभार प्रक्रियेची समीक्षा करून राज्यसत्तेला लोकाभिमुख बनविण्याची भूमिका स्वीकारली. १९९० नंतर माहिती- तंत्रज्ञान क्रांतीच्या परिणामातून माहितीचे नवनवीन स्रोत समोर आले. अशा परिस्थितीत वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना नव्या परिस्थितीला अनुकूल असे स्वरूप आत्मसात करणे भाग पडले. त्यातून साहजिकच माहितीच्या आदानप्रदान प्रक्रियेच्या स्पध्रेचा आरंभ झाला.

MPSC: Exam Exam Pattern MPSC/PSI/STI/ASST

MPSC Exam

 

State Service Exam

Prelim Exam:

Compulsory 2 papers:

  1. General Studies ( 200 Marks )- Objective type 100 questions (MCQs) – 2 hours

  2. CSAT ( 200 Marks )- Objective type 80 questions (MCQs) – 2 hours

How To Read Current Affairs ?

                     
how to read current affairs
                              
                          प्रश्नपत्रिकेचे अलीकडचे स्वरूप बघता बरेचसे प्रश्न हे राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चालू घडामोडींविषयी विचारले जातात, हे स्पष्ट होते. हे तीनही विषय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात चालू घडामोडींवर आधारित कमी प्रश्न विचारले जातात, असे वाटले तरी पूर्वपरीक्षेतील प्रत्येक घटक विषयाला जोडून चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जातात. या महिन्यात विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षा झाली. परीक्षेनंतर बहुतांश उमेदवारांची प्रतिक्रिया होती की, प्रश्नपत्रिका बरीच अवघड होती. 'आपण वाचलेल्या पुस्तकांतील प्रश्नच येत नाहीत, चालू घडामोडींचा नेमका स्रोत कळत नाही,' असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.