Post views: counter

Analysis of question paper is important:प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे!

                          यूपीएससी परीक्षेचे गुणात्मक स्वरूप समजण्याकरिता गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण आणि विश्लेषण आवश्यक ठरते. ते कसे करावे, याविषयी..

                         शैक्षणिक वाटचालीमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत असताना प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणास अभ्यासक्रमाइतके महत्त्व दिले जात नाही. खरे तर प्रश्नाभिमुख अभ्यास एका अर्थाने परीक्षाभिमुखच असतो. मर्यादित जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागरी सेवा परीक्षा त्याला अपवाद नाही. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीमध्ये प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अनेक अंगांनी फायद्याचे ठरते.

UPSC Reference Books Are Important.....

                         अभ्यासासंबंधित मुद्दय़ांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच त्या विषयावरील सद्य चर्चेचे भान येण्याकरता यूपीएससी परीक्षेच्या तयारीत संदर्भपुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
                        अभ्यासाच्या प्रारंभिक टप्प्यात प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि 'एनसीईआरटी'च्या क्रमिक पुस्तकांचे वाचन याविषयी मागील काही लेखांमध्ये चर्चा केलेली होती. आजच्या लेखात अभ्यास पक्का व्हावा म्हणून संदर्भपुस्तकांची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विषयाच्या उपयोजनावर (application) तसेच चालू घडामोडींवर आधारित असतील तर वर्तमानपत्रे आणि नियतकालिके सोडून संदर्भपुस्तकांची गरज असते का, असा प्रश्न यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सतावत

वैकल्पिक विषयाची निवड : How to select optional subject ?

                    
How to select optional subject ?
                     अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषय यांमध्ये सुवर्णमध्य किंवा समान दुवा साधता आला तर कमी कालावधीत हमखास यशाप्रत पोहोचता येईल. त्याविषयी..
                         नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी चाचणीमधील वैकल्पिक (Optional)  विषय ५०० गुणांपुरता (१,७५० गुणांपकी) मर्यादित असला तरी एकूण परीक्षेमध्ये कळीचा ठरू शकतो. २०१३ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात एकच वैकल्पिक विषय अनिवार्य केलेला आहे. नागरी सेवा परीक्षेमध्ये विषयाची खोली जाणून घेण्याचे उद्दिष्ट वैकल्पिक विषय ठेवण्यामागे असते. या परीक्षेची तयारी करताना काही विद्यार्थी बऱ्याचदा वैकल्पिक विषयास सुरुवातीपासून अधिक महत्त्व देऊन त्याची तयारी सुरू करतात. याउलट काहीजण त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करून पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षा तोंडावर आली असताना विषयाची निवड करून तयारीला लागतात. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षेचे खरेखुरे स्वरूप न समजल्याकारणाने नियोजनामध्ये छोटय़ा चुका राहून जातात. किंबहुना अभ्यासाचे उचित नियोजन केले जात नाही. परिणामी, घेतलेले कष्ट वाया जातात.

MPSC Exam TimeTable 2015

सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक …. 
या परीक्षांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
MPSC Exam Timetable 2015 




निबंध लेखन एक दुर्लक्षित टप्पा

essay-writing-a-neglected-stage
                            डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेतील निबंधाच्या अनिवार्य प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने २५० गुणांसाठी दोन निबंध लिहिणे अनिवार्य केले. त्या अंतर्गत एक निबंध अमूर्त तत्त्वविचारावर आणि दुसरा वर्तमान घडामोडींवर बेतलेला आहे. या दोन्ही निबंधाला प्रत्येकी चार पर्याय दिलेले असल्याने निवडीला अधिक वाव आहे. प्रत्येक निबंध विषयास किमान शब्दमर्यादा एक हजार असून ही प्रश्नपत्रिका लेखी चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण बनली आहे.
                           निबंधाच्या प्रश्नपत्रिकेमधून विद्यार्थ्यांची ताíकक विचारक्षमता आणि विश्लेषणात्मक ताकद जोखणे हा आयोगाचा उद्देश आहे. अभ्यासाद्वारे तर्क आणि विश्लेषण यावर आधारित स्वत:ची विचारप्रक्रिया जागी करून निबंध लेखनामध्ये ती रूपांतरीत करणे गरजेचे आहे. निबंधातून विद्यार्थ्यांच्या विचाराची समग्रता, ताíककता, विश्लेषणक्षमता आणि मुद्देसूद लेखन कौशल्य जाणवायला हवे.