Post views: counter

How To Prepare For MPSC State Service Pre Exam ?

                    
mpsc-state-before-to-deal-with-the-examination


    राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धापरीक्षेची पूर्वतयारी करताना काही अभ्यासतंत्रे विकसित करणे आवश्यक असते. त्याविषयी..
                             गेल्या काही वर्षांत राज्यभरातून स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा विचार करता, सुमारे ४५० पदांसाठी, १२-१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेलाही १३-१४ लाख विद्यार्थी बसतील, अशी अपेक्षा आहे. या परीक्षेला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

How To Read NCERT Books For Civil Servicess?

                         
ncert-books-base-for-upsc-examination


यूपीएससी अभ्यासाच्या आराखडय़ातील सर्वात महत्त्वाचा घटक किंवा साधन म्हणजे 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके होत.
                         पदवीचे शेवटचे वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्षात अभ्यासाच्या तयारीचा संकल्प करतात, त्या वेळी अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, कोणती पुस्तके वाचावीत, असे अनेक प्रश्न समोर येतात. अशा परिस्थितीत सुरुवातीची दिशा महत्त्वाची असते. प्रारंभिक दिशाच चुकली तर पुढील प्रयत्न भरकटण्याची शक्यता अधिक असते. खरेतर या टप्प्यावर मार्गदर्शकाची निवड महत्त्वाची ठरते, जो आपल्याला एक आराखडा आणि मार्ग ठरवून देऊ शकतो. अशा निर्णायक प्रसंगी योग्य सुरुवात करण्यासाठी थोडा अधिक वेळ घेतला तरी चालू शकतो.

Understanding MPSC Paper No-2 : पेपर-२ आकलन

                                  अनेकदा विद्यार्थ्यांची अभ्यासाची कल्पना म्हणजे त्या विषयाशी संबंधित विविध पुस्तके वाचणे, अशी वेगवेगळी पुस्तके मिळवण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथालयांकडे धाव घेणे, मित्रवर्गाकडून परीक्षेतील विषयांच्या वेगवेगळ्या नोट्स मिळवणे.. अशी नियोजन-शून्य पळापळ बहुसंख्य विद्यार्थी करत असतात. ज्याचा काहीही उपयोग नसतो. म्हणूनच आधी अभ्यास ही संकल्पना समजून घ्यायला हवी. अभ्यासाचे नियोजन करायला हवे.  शिस्तशीर - पद्धतशीर अभ्यास करून विषयांवर हुकूमत मिळवायला हवी.
                                  अभ्यासाचे नियोजन करताना वेळेचे व्यवस्थापन करावे लागते.  अभ्यास किती वेळ आणि कुठल्या वेळात करायचा हे निश्चित करावे लागते. वेळेचा परिणामकारक वापर करण्याची काही तंत्रे आहेत. ती शिकून नियोजनपूर्वक अभ्यासाची गुणवत्ता वाढवता येईल. इथे वेळेचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र अभ्यासावे लागेल. अभ्यासाची गुणवत्ता वाढवावी लागेल.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा : योग्य दृष्टिकोन हवा

                            राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती अलीकडेच पार पडल्या. १,३६७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यापकी बहुतांश उमेदवार एकतर पद प्राप्त असतात किंवा एक/दोन मुख्य परीक्षांचा अनुभव असणारे किंवा दोन/तीन वर्षांपासून प्रयत्न करणारे किंवा यूपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार असे होते. २०१२ साली, २०१३ साली आणि २०१४ साली राज्यसेवा, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या परीक्षांद्वारे यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहिल्यास नेमकी हीच बाब अधोरेखित झालेली लक्षात येईल. त्यावेळी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी झालेले उमेदवारसुद्धा आहेत, पण हे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१२ नंतर प्रकर्षांने जाणवणारा हा महत्त्वपूर्ण बदल आहे. या बदलामागे काही कारणे आहेत-

How the study doing that important:राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यास 'कसा' करता, हे महत्त्वाचे!

how the study doing that important
                                पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची सरळ दोन भागांत विभागणी करावी- खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचे. पहिल्या भागामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था या चार घटकांना ठेवावे. अभ्यासण्यासाठी बाकीचे चार घटक दुसऱ्या भागामध्ये येतील. या अतिमहत्त्वाच्या घटकांचे महत्त्व जास्त का याचा विचार केला की लक्षात येते, इतिहास वगळता या विषयांवरचे प्रश्न 'मूलभूत' संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येत नाहीत. प्रश्नांचा रोख संकल्प, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पलूंवर विचारण्यावर असतो. त्यामुळे याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. 'इतिहास' विषय हा गटात असण्याचे कारण म्हणजे या विषयावरील प्रश्नांची जास्त संख्या आणि प्रश्नांचे विश्लेषणात्मक स्वरूप.