Post views: counter

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?

                        राज्य सेवा मुख्य परीक्षेत इतिहास घटकाची तयारी करताना भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे.  राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.

                        ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांविरूद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून याचा तक्त्यांच्या स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उदय़ोगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना या विषयीच्या बाबी कालक्रमाने लक्षात घ्याव्यात. १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये या मुद्दय़ांची भूमिका, महत्त्व काय होते याचा अभ्यास करावा.
सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी जसे- ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेले डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळी इत्यादींचा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक  आहे.

इतिहास घटकविषयाचा तार्किक अभ्यास

                                   इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो. कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा अधिक स्वारस्यपूर्ण असं बरंच काही या विषयात आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

                                   प्रशासनात काम करताना अधिकारी हे कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्या-तोटय़ाच्या तराजूपेक्षा जनतेच्या 'कल्याणा'चे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 'इतिहास' हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. 'इतिहासा'च्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा  स्वारस्यपूर्ण अशा अनेक गोष्टी या विषयात आहे, हे लक्षात येईल. 'इतिहास' हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.
                                  मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. हा पूर्ण भाग पूर्वपरीक्षेतही असल्याने एकत्रितपणे अभ्यास वेळेच्या बचतीसाठी आवश्यक आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती आपण पूर्वपरीक्षेच्या विभागात सविस्तरपणे पाहिली आहे. आधुनिक इतिहासाच्या तयारीसाठीची पद्धत या प्रकारामध्ये पाहू या.

भारत व जगाचा भूगोल

                             लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भूगोल हा महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. भूगोलाचा अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या उपघटकांवर प्राधान्याने अभ्यास करणे सूज्ञपणाचे ठरते.

                           नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेसाठी भूगोलाची परिणामकारक तयारी कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील भारत व जगाचा भूगोल या अभ्यासघटकाचे प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय अशा उपघटकांमध्ये वर्गीकरण करता येईल. इतिहासाप्रमाणे भूगोलाची व्याप्ती मोठी आहे. या विषयाचे स्वरूप semi-scientific असल्याने यातील संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे श्रेयस्कर ठरते. कारण परीक्षेत येणाऱ्या विश्लेषणात्मक स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संकल्पनांचा जास्तीत जास्त आधार घेतला जातो.

महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे

                            महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे

______________________________
     शिखर.                       उंची
______________________________
०१) कळसुबाई------------१६४६ मी
०२) साल्हेर----------------१५६७ मी
०३) महाबळेश्वर-----------१४३८ मी
०४) हरिश्चंद्र---------------१४२४ मी
०५) सप्तश्रुंगी-------------१४१६ मी
०६) तोरणा----------------१४०४,मी 
०७) अस्तंभा--------------१३२५ मी
०८) त्र्यंबकेश्वर------------१३०४,मी
०९) तौला-----------------१२३१ मी
१०) वैराट-----------------११७७ मी

स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे

 ● स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे ●

१) सुभाषचंद्र बोस ------------------------ नेताजी
२) रविंद्रनाथ टागोर ---------------------- गुरुदेव
३) पंडित जवाहरलाल नेहरू ------------ चाचा
४) मोहनदास करमचंद गांधी ----------- राष्ट्रपिता
५) मोहनदास करमचंद गांधी ----------- महात्मा
६) महात्मा गांधी ------------------------- बापू
७) खान अब्दुल गफार खान -------------सरहद्द गांधी
८) खान अब्दुल गफार खान ------------ बादशहाखान
९) विनोबा भावे ------------------------- आचार्य
१०) जे. बी. कृपलानी -------------------- आचार्य
११) बाळ गंगाधर टिळक --------------- लोकमान्य
१२) चक्रवर्ती राजगोपालाचारी ---------- राजाजी
१३) वल्लभभाई पटेल ------------------- सरदार