ज्या सुजलाम सुफलाम भारतभूमीवर आपण वास्तव्य करतो. त्याबद्दल प्रत्येक
स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक काळात भारत देश हा
भारत. आर्यवर्त आणि हिंदुस्थान (सोने की चिडिया) या विविध नावांनी ओळखला
जात असे. प्राचीन काळातील पराक्रमी राजा भरत यावरून ‘भारत’ तर आर्यवंशीय
लोकांच्या भूमीवरून ‘आर्यावर्त’ आणि ‘सिंधुनदीमुळे’ हिंदुस्थान अशा नावांचा
उल्लेख केला जात असे. युरोपियन लोकांनी या देशाला मूळ शब्द ‘सिंधू’पासून
तयार झालेल्या ‘इंडिया’ असा उल्लेख करण्यास सुरुवात केली.
भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल:
- • विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
- • पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
- • आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
- • शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.
- • पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.