सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या.
- अभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा.
- मोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू नका, तर निर्धारित कालावधीत नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा.
- विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून निरीक्षणात्मक अभ्यास पद्धत स्विकारा.
- नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ एकाच विषयाचे विशेतज्ञ असण्याचा काळ इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छीना-यांनी बहुश्रुत असण्यासोबतच विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभावाची मनोवृत्ती विकसित करावी.
- सध्याच्या परीक्षेच्या स्वरुपात आंतरविद्याशाखीय आणि गतिशील झाले असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्याकडे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभाव सुसंगत असणे गरजेचे असल्याची बाब लक्षात ठेवा.