Post views: counter

MPSC अभ्यासाचे मुलभूत सिद्धांत जाणा...


सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या.
  1. अभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा.
  2. मोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू नका, तर निर्धारित कालावधीत नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा.
  3. विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून निरीक्षणात्मक अभ्यास पद्धत स्विकारा.
  4. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ एकाच विषयाचे विशेतज्ञ असण्याचा काळ इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छीना-यांनी बहुश्रुत असण्यासोबतच विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभावाची मनोवृत्ती विकसित करावी.
  5. सध्याच्या परीक्षेच्या स्वरुपात आंतरविद्याशाखीय आणि गतिशील झाले असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्याकडे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभाव सुसंगत असणे गरजेचे असल्याची बाब लक्षात ठेवा.

समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

  1. ब्राहमो समाज - 20 ऑगस्ट 1828 - राजा राममोहन रॉय
  2. तत्वबोधिनी सभा - 1838 - देवेंद्रनाथ टागोर
  3. प्रार्थना समाज - 31 मार्च 1867 - दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर
  4. परमहंस सभा - 31 जुलै 1849 - भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर
  5. आर्य समाज - 10 एप्रिल 1875 - स्वामी दयानंद सरस्वती
  6. रामकृष्ण मिशन - 1896 - स्वामी विवेकानंद
  7. थिऑसॉफिकल सोसायटी - 1875 - कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि
  8. सत्यशोधक समाज - 1875 - महात्मा फुले
  9. भारत कुषक समाज - 1955 - पंजाबराव देशमुख

विद्युत चुंबक आणि नियम

विद्युत चुंबक आणि नियम
विद्युत चुंबक :
  • चुंबकीय बलरेषा :चुंबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तरध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला चुंबकीय बलरेषा किंवा विकर्ष रेषा म्हणतात.
चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म :
  1.  चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेल्या लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात.
  2.  दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत.
  3.  चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरवात उत्तर ध्रुवापासून होते व त्यांचे शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो.
  4.  ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या दिसतात.

Book List For ASO Exam


Asst Exam Book


सहाय्यक कक्ष अधिकारी 
मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  4. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  5. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  6. आपली संसद - सुभाष कश्यप 
  7. आपले संविधान - ज्ञानदीप 
  8. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  9. संगणक व माहिती तंत्रज्ञान - सेल्फ हेल्प प्रकाशन
  10. महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
  11. पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर
  12. भारतीय राज्यघटना आणि प्रशासन - डी . डी . बासू
      
Source: www.eMPSCkatta. blogspot.in

Book List For STI Exam


STI Book List


विक्रीकर
निरीक्षक मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
Source: www.eMPSCkatta. blogspot.in

पेपर -2
  1. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे 
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार/ग्रोवर बेल्हेकर
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  4. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  5. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी/ दांडेकर
  6. व्हर्बल नॉन व्हर्बल - RS अग्रवाल 
  7. राज्यशास्त्र - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे
  8. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  9. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
  10. अर्थशास्त्र - रंजन कोळंबे + देसले ( दोन्ही भाग )
  11. इंडिया इअर बुक
  12.  चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,  युनिक बुलेटीन ,चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
    Source: www.eMPSCkatta. blogspot.in