Post views: counter

समाजसुधारकांची वृत्तपत्रे

समाजसुधारकांची वृत्तपत्रे व संपादक


  1. दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832
  2.  दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840
  3.  प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज
  4.  हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
  5.  काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  6.  स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  7.  केसरी - लोकमान्य टिळक

नंरेद्र मोदी सरकारच्या विकास योजना

नंरेद्र मोदी सरकारच्या विकास योजना
  • जन-धन योजना:-

देशातील प्रत्येक नागरिकाला बँकेत खाते उघडून देण्यासाठी जन-धन ही महत्वकांक्षी योजनासुरू करण्याचा निर्णय मोदी ने १५ आँगस्ट २०१४रोजी आपल्या भाषणात या योजनेची घोषणा केले . ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १.५ कोटी लोकांनी बँकखाते उघडून सरकारच्या निर्णयाला अभुतपूर्वप्रतिसाद दिला. या योजनेतंर्गत आतापर्यंतदे शभरात १४ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत.
  • स्वच्छ भारत अभियान:- 
नरेद्र मोदिनी २ आक्टो २०१४ रोजी( गांधी जयंती) ही योजना नवी दिल्ली येथील राजघाट येथून सुरु केली स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानातंर्गत आगामी पाच वर्षात भारतातील प्रत्येक परिसर स्वच्छ बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेआहे. याशिवाय, शहरी आणि ग्रामीण
Post views: counter

महाराष्ट्राचा समग्र भूगोल




                          सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन दि . १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.
  • स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश , ७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश दरम्यान.
  • क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.
    महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.
  • लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८०० कि.मी.
  • रुंदी - उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.
  • किनारपट्टीची लांबी ७२० कि.मी.

  • सीमा

नैसर्गिक सीमा – 
  • वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत. 
  • उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
  • ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे. 
  • पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे. 

Current Affairs : May 2015

चालू घडामोडी:- जून २०१५



  • सेवाकर वाढ:- ०१ जून २०१५ 
    =>सेवाकराच्या दरात १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के इतकी वाढ
    =>रेल्वेचा प्रथमवर्ग आणि वातानुकूलित डब्यांचे शुल्क वाढले असून, मालवाहतूकही महागली आहे. ही वाढ ०.५ टक्के आहे. रेल्वेच्या एसी, प्रथम वर्ग आणि मालवाहतुकीवर सध्या ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. तो आता ४.२ टक्के झाला आहे. त्यामुळे ही वाढ ०.५ टक्के आहे.
  • विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी ५० लाखांची लाच देताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार असलेल्या  ए. रेवनाथ रेड्डी या नेत्यास अटक केली. रेड्डी यांनी स्टिफन्सन यांना पाच कोटींची ऑफर दिली होती. ५० लाख हे मतदानापूर्वी आणि उरलेले साडेचार कोटी मतदानानंतर देणार होतेतेलंगणा विधान परिषदेच्या निवडणुकीत टीडीपीच्या उमेदवारास मतदान करावे यासाठी रेड्डी यांनी अँगो-इंडियन आमदार एल्विस स्टिफन्सन यांना लाच देऊ केली होती.
  • कोलकाताहून अगलतला, व्हाया बांगलादेश बस सेवा ०१ जून २०१५ सुरु करण्यात येणार आहे. 
  • २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा  बार्सिलोना संघाने जिंकली. कँप नोऊमध्ये झालेल्या अंतिम लढतीत अॅ थ्लेटिक बिल्बाओचा ३-१ असा पराभव करत बार्सिलोनाने २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकली.
Post views: counter

How to prepare for Indian Polity ?

भारतीय‬ राज्यघटनेचा अभ्यास कसा करावा?
                           भारतातील घटकराज्यांच्या निर्मितीपासून त्यांच्या विकासाबाबत, नागरिकांमधील परस्परसंबंधापासून इतर देशांबरोबरच्या धोरण, क्षेपणास्त्रांपर्यंतच्या निर्मितीबाबत, महिलांपासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि शेतीपाण्यापासून सणांसाठीच्या सुट्यांपर्यंत, अनेक नव्हे, प्रत्येक बाब नियमित होते ती इथल्या प्रस्थापित ‘राज्यव्यवस्थे’कडून. ही भारतीय राज्यव्यवस्था उभी आहे जगातील सर्वात विस्तृत लिखित राज्यघटनेच्या पायावर. साहजिकच भारतात घडणा-या व भारताबाबत घडणा-या प्रत्येक घडामोडीबाबत विद्यार्थ्याने राज्यशास्त्राच्या अंगाने/बाजूने अभ्यास करायलाच हवा. घडलेली महत्त्वाची घटना, निर्णय, धोरणे इ. सगळ्या गोष्टी ‘राज्यघटने’च्या निकषातून तपासणे आणि त्यासाठी राज्यघटनेचा बारकाईने अभ्यास करणे हा या घटकविषयाच्या तयारीचा गाभा.
                         राज्यघटनेचा अभ्यास करणे म्हणजे क्लिष्ट भाषेत लिहिलेली सगळी कलमे पाठ करणे नव्हे. घटनेतील काही भाग अत्यंत महत्त्वाचे, काही भाग महत्त्वाचे, तर काही भाग इतरांच्या मानाने कमी महत्त्वाचे आहेत. भारतामध्ये ‘लोकशाही’ असल्याने लोकांवर अर्थात सामान्य जनतेच्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणरे भाग यूपीएससीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे असतात. यामध्ये मूलभूत अधिकार,