- "मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्स यांनी सलग 22 व्या वर्षी पहिले स्थान :
अमेरिकेतील 400 सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये "मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्स यांनी सलग 22 व्या वर्षी पहिले स्थान पटकाविले आहे. "बर्कशायर हॅथवे"चे अध्यक्ष वॉरन बफे यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, "ओरॅकल"चे लॅरी एलिसन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. "फोर्ब्स" मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 76 अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे. बफे यांची संपत्ती 62 अब्ज डॉलर असून, त्यात गेल्या वर्षीपेक्षा पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे. एलिसन यांची संपत्ती 47.5 अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात 2.5 अब्ज डॉलरची घट झाली आहे. चौथ्या क्रमांकावर "ऍमेझॉन"चे जेफ बझ असून, त्यांची संपत्ती 16.5 अब्ज डॉलर आहे. 40.3 अब्ज डॉलर संपत्तीसह "फेसबुक"चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग सातव्या स्थानावर आहेत. पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये ते प्रथमच आले असून, "गुगल"चे लॅरी पेज 33.3 अब्ज डॉलर संपत्तीसह दहाव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प 4.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 121 व्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये भारतीय वंशाच्या चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये 194 क्रमांकावर जॉन कपूर (संपत्ती 3.3 अब्ज डॉलर), 234 व्या क्रमांकावर रोमेश टी. वाधवानी, 268 व्या क्रमांकावर भरत देसाई, तर 358 व्या क्रमांकावर कवित्रक राम श्रीराम यांचा समावेश आहे. या यादीतील 400 श्रीमंतांची एकूण संपत्ती 2340 अब्ज डॉलर आहे. ही संपत्ती 2014 मध्ये 2290 अब्ज डॉलर होती.
- ट्विटर आपल्या युजर्ससाठी अक्षरांची मर्यादा वाढविण्याच्या विचारात :
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर आपल्या युजर्ससाठी 140 अक्षरांची असलेली मर्यादा वाढविण्याच्या विचारात असून त्याबाबत कंपनीतील वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. केवळ 140 शब्दांमध्ये सध्या ट्विटरद्वारे संदेश देण्याची सुविधा आहे. 140 शब्दांमध्ये एखाद्या संकेतस्थळाची लिंक, युजर हॅण्डल वगैरे साऱ्यांचा समावेश आहे. यावर काम करताना 140 अक्षरांच्या मर्यादेतून लिंक आणि युजर हॅण्डल वगळण्याच्या विचार करण्यात येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ट्विटरच्या युजरमध्ये वाढ होण्याचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वांत कमी प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. फेसबुकसारख्या इतर सोशल नेटवर्किंग साईटसच्या तुलनेत 140 शब्दांची मर्यादा ही मोठी दरी असल्याचे काही युजर्स तसेच डिझाईनर्सने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर 150 अक्षरांच्या मर्यादेबाबत पुनर्विचार करण्यात येत आहे. आपली 140 शब्दांची मर्यादा हटविण्यासाठी ट्विटर नवे काहीतरी निर्माण करण्याची