Post views: counter

Current Affairs Oct 2015 Part - 1



  • "मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्‌स यांनी सलग 22 व्या वर्षी पहिले स्थान :

अमेरिकेतील 400 सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये "मायक्रोसॉफ्ट"चे जनक बिल गेट्‌स यांनी सलग 22 व्या वर्षी पहिले स्थान पटकाविले आहे. "बर्कशायर हॅथवे"चे अध्यक्ष वॉरन बफे यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, "ओरॅकल"चे लॅरी एलिसन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. "फोर्ब्स" मासिकाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. बिल गेट्‌स यांची एकूण संपत्ती 76 अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे. बफे यांची संपत्ती 62 अब्ज डॉलर असून, त्यात गेल्या वर्षीपेक्षा पाच अब्ज डॉलरची घट झाली आहे. एलिसन यांची संपत्ती 47.5 अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात 2.5 अब्ज डॉलरची घट झाली आहे. चौथ्या क्रमांकावर "ऍमेझॉन"चे जेफ बझ असून, त्यांची संपत्ती 16.5 अब्ज डॉलर आहे. 40.3 अब्ज डॉलर संपत्तीसह "फेसबुक"चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग सातव्या स्थानावर आहेत. पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये ते प्रथमच आले असून, "गुगल"चे लॅरी पेज 33.3 अब्ज डॉलर संपत्तीसह दहाव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प 4.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 121 व्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये भारतीय वंशाच्या चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये 194 क्रमांकावर जॉन कपूर (संपत्ती 3.3 अब्ज डॉलर), 234 व्या क्रमांकावर रोमेश टी. वाधवानी, 268 व्या क्रमांकावर भरत देसाई, तर 358 व्या क्रमांकावर कवित्रक राम श्रीराम यांचा समावेश आहे. या यादीतील 400 श्रीमंतांची एकूण संपत्ती 2340 अब्ज डॉलर आहे. ही संपत्ती 2014 मध्ये 2290 अब्ज डॉलर होती.


  • ट्विटर आपल्या युजर्ससाठी अक्षरांची मर्यादा वाढविण्याच्या विचारात :

लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर आपल्या युजर्ससाठी 140 अक्षरांची असलेली मर्यादा वाढविण्याच्या विचारात असून त्याबाबत कंपनीतील वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. केवळ 140 शब्दांमध्ये सध्या ट्‌विटरद्वारे संदेश देण्याची सुविधा आहे. 140 शब्दांमध्ये एखाद्या संकेतस्थळाची लिंक, युजर हॅण्डल वगैरे साऱ्यांचा समावेश आहे. यावर काम करताना 140 अक्षरांच्या मर्यादेतून लिंक आणि युजर हॅण्डल वगळण्याच्या विचार करण्यात येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ट्विटरच्या युजरमध्ये वाढ होण्याचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वांत कमी प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. फेसबुकसारख्या इतर सोशल नेटवर्किंग साईटसच्या तुलनेत 140 शब्दांची मर्यादा ही मोठी दरी असल्याचे काही युजर्स तसेच डिझाईनर्सने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर 150 अक्षरांच्या मर्यादेबाबत पुनर्विचार करण्यात येत आहे. आपली 140 शब्दांची मर्यादा हटविण्यासाठी ट्‌विटर नवे काहीतरी निर्माण करण्याची

आर्थिक घडामोडीचा अभ्यास कसा करावा ?


         संकल्पनात्मक अभ्यासाइतकेच अर्थव्यवस्था या घटकात चालू घडामोडींना महत्त्व आहे. किंबहुना संकल्पनांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करत या विषयाच्या अभ्यासाचा मूलभूत पाया पक्का करता येतो. चालू घडामोडींमुळे हा विषय नेहमीच गतिमान व अद्ययावत राहतो. त्यामुळे राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या अर्थविषयक घडामोडी, प्रकाशित होणारे अहवाल अभ्यासणे हे अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे. या बाबतीत कुठल्या मुद्दय़ांवर भर द्यावा, ते पाहूयात. 

भारतीय कृषिव्यवस्था, ग्रामविकास व सहकार



                पेपर ४ मधील कृषीविषयक घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून करणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचे आर्थिक पैलू या पेपरच्या तयारीसाठी अभ्यासणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासक्रमाची विभागणी कशा प्रकारे करावी हे आपण मागच्या लेखामध्ये पाहिले. आज आपण अभ्यास कसा करावा याची चर्चा करुयात.
कृषी क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेण्यासाठी पाहणी अहवालातून GDP, GNP रोजगार आयात-निर्यात यातील कृषी क्षेत्राचा वाटा (टक्केवारी) पाहायला हवा. याबाबत उद्योग व सेवा क्षेत्राशी कृषी क्षेत्राची तुलना लक्षात घ्यावी. कृषी व इतर क्षेत्रांचा आंतरसंबंध पाहताना कृषी आधारित व संलग्न उद्योगांचे स्वरूप, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व या बाबींचा आढावा घ्यावा.
                वेगवेगळ्या पंचवार्षकि योजनांमध्ये कृषिविकासासाठी ठरविण्यात आलेली धोरणे व योजनांचा थोडक्यात आढावा घ्यावा आणि त्यांचे यशापयश लक्षात घ्यावे. १०व्या, ११व्या व १२व्या पंचवार्षकि योजनांमधील कृषीविषयक
Post views: counter

Download Indian Constitution in pdf format in Marathi , Hindi and English


भारताचे सांविधान .. अभ्यासाची इच्छा असलेल्यांसाठी....

आमच्या टेलिग्राम अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


Download Constitution Of India In Hindi:
  1. अनुक्रमणिक [Index] 
  2. भारत का संविधान - उद्देशिका [Preamble] 
  3. भाग 1 : संघ और उसके राज्यक्षेत्र [Union and itsTerritory]
  4. भाग 2 : नागरिकता [Citizenship] 
  5. भाग 3 : मूल अधिकार [Fundamental Rights] 
  6. भाग 4 : राज्य के नीति निर्देशक तत्व [DirectivePrinciples of State Policy]
  7. भाग 4क : मूल कर्तव्य [Fundamental Duties] 
  8. भाग 5 : संघ [The Union] 
  9. भाग 6 : राज्य [The States] 
  10. भाग 7 : पहली अनुसूची के भाग ख के राज्य[States in the B part of the First schedule]
  11. भाग 8 : संघ राज्यक्षेत्र [The Union Territories] 
  12. भाग 9 : पंचायत [The Panchayats] 
  13. भाग 9क : नगरपालिकाएं [The Municipalities] 

मुख्य सचिव


  1.  प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्याच्या सरळ अधिनियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभाग कार्यरत असतो. मुख्य सचिव  हा राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख असतो.
  2.  मुख्य सचिव राज्य सचीवालयाचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्यातीलसर्व प्रशासकीय कार्यालयावर मुख्य सचिवांचे पूर्ण नियंत्रण असते.केंद्र -राज्य तसेच राज्य - राज्य संबंधात तो प्रमुख दुवा असतो.
  3.  १९६५-६६ च्या "आंध्र प्रदेश प्रशासकीय सुधारणा समिती"च्या अहवालानुसार मुख्य सचिव राज्यातील सनदी सेवांचा प्रमुख असतो.
  4.  केंद्राच्या कॅबिनेट सचिवाच्या तुलनेत राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका अधिक रुंद असते. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख यासोबतच  राज्य लोकसेवा आयोगाचा प्रमुख, राज्य शासनाचा प्रमुख जनसंपर्क अधिकारी या भूमिका त्यांना वठवाव्या लागतात.
  5.  मुख्य सचिव या पदावर अधिकाऱ्याचा कालावधी निश्चित नाही. कदाचित मुख्य सचिव त्याच पदावर असताना निवृत्त होऊ शकतो किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या विभागात बढती होऊन जाऊ शकतो.
  6.  "राजस्थान प्रशासकीय सुधारणा समिती,१९६३" ने मुख्य सचिवाची तणावपूर्ण बहुआयामी भूमिका स्पष्ट केली. तो मुख्यमंत्र्यांचा प्रमुख सल्लागार असतो. त्याच्याकडील विभाग वगळता इतर विभागाच्या कार्यातही तो समन्वय घडवून आणतो. इतर सचिवांच्या कार्यकक्षेत न येणारे विषय मुख्य सचिव हाताळतो.