Post views: counter

यशाचे समान सूत्र key to success


                               एकदा एका यशवंताला विचारले की, आपल्या यशाचे रहस्य काय? तेव्हा त्याने उत्तर दिले, 'जितके यशवंत, तितकी सूत्रे असतात' प्रत्येकात समान धागा म्हणजे सातत्य, जिद्द, चिकाटी आणि 'स्मार्ट वर्क'. तरी या स्पर्धेची काही सूत्रे या तिन्ही परीक्षांना लागू आहेत. आज त्यांचा आपण विचार करूया.

                             स्पर्धापरीक्षा द्यायची म्हणजे सुरुवात कशी करायची हा अनेकांना भेडसावणारा प्रश्न असतो. अनेक जण एका मोठा ठोकळा घेऊन भारंभार वाचयला सुरुवात करतात. असे न करता एकदा परीक्षा द्यायची ठरवली की, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम शब्दशः पाठ करा. याचा फायदा असा होतो की, आपण २४ तास अॅलर्ट असतो आणि एखादी महत्त्वाची घटना घडली की, त्याची नोंद ठेवू शकतो. तसेच पुस्तके खरेदी करतानाही त्याचा फायदा होतो. पीएसआय (PSI), एसटीआय (STI) आणि
एएसएसटी (ASST) या परीक्षांचा फायदा असा आहे की, अभ्यासक्रमाचा बराचसा भाग तिन्ही परीक्षांसाठी समान आहे. यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. यानंतर २०१३पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे (पूर्व आणि मुख्य) अवलोकन करावे. यावरून अभ्यासाची दिशा निश्चित होण्यास मदत होईल. सध्या विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपावर एक नजर टाकूया.

वेळेचे व्यवस्थापन


                              स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थांची मोठी तक्रार असते ती वेळेच्या अभावाची. 'खूप काही करायचे होते, पण वेळच पुरला नाही', अशी ती भावना असते. त्यामुळे वेळेच्या व्यवस्थापनेचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. 
काळ आणि वेळ 
प्रत्येकाकडे वेळेचा एक विशिष्ट कोटा असतो. त्याचा योग्य वापर करता येणे हे एक 'वेळ कौशल्य' (time skill)आहे. आइनस्टाईनने सापेक्षता सिद्धांत मांडला होता. त्यानुसार वेळ ही एक सापेक्ष कल्पना आहे. वेळेचा सदुपयोग कसा होणार ते योग्य व्यूहरचना, अभ्यास कौशल्ये, इच्छाशक्ती व आरोग्य या सर्वांवर अवलंबून आहे. काळ म्हणजे तुमचे अभ्यासाचे वय व तुमच्यापुढील उपलब्ध संधी, तर वेळ म्हणजे तो काळ वापरून घ्यायची संधी. काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही. 

UPSC Guidance Center

पूर्ण वेळ मार्गदर्शक

एकेकाळी स्पर्धा परीक्षा देणारे पण काही कारणांनी (कदाचित योग्य मार्गदर्शनाचा अभाव) यश न मिळालेले अनेकजण आज पूर्णवेळ मार्गदर्शन करतात. ते अर्थात व्यावसायिक असतात व आपले ज्ञान व अनुभव यांचा फायदा उमेदवारांना करून देतात. त्यांच्याकडे त्या क्षेत्राची माहिती व ज्ञान दोन्ही असते. तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा, भविष्याकडे बघण्याच्या क्षमतेचा फायदा करून घ्यायला हवा. मात्र हे मार्गदर्शक सकारात्मक विचारांचे असावेत. ते व्यावसायिक हवेत, व्यापारी वृत्तीचे नको. त्यांनी सुरुवात ते शेवट अशी अखंड साथ द्यायला हवी.

यशासारखे यश नाही






नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालाच्या काही पैलूंची चर्चा काल आपण केली. आज आपण त्या निकालातून कशाप्रकारे यशासाठी प्रेरणा घेता येईल ते पाहू. 
वाचक प्रश्न 
यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी अनेक जण आधीच कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत आहेत. विशेषत: असे दिसते की राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यशस्वी झालेले उमेदवार यंदाच्या यादीतही आहेत. काही उदाहरणेच बघायची तर धीरज सोनजे, मुकुल कुलकर्णी, सायली ढोले, सचिन घागरे या सर्वांची आधीच राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांनीच आता यूपीएससीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रमेश घोलप याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. तो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला व त्याच वर्षी यूपीएससी परीक्षेत त्याची आयएएस पदावर निवड झाली. 
Post views: counter

मार्गदर्शन मोलाचे



मार्गदर्शन मोलाचे

                            स्पर्धा परीक्षा म्हणजे एक नियमांनी खेळला जाणारा, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा व जय-पराजयाचे हेलकावे घेणारा खेळ आहे. कबड्डी खेळताना जसे दम सोडून चालत नाही, तसेच स्पर्धा परीक्षा देताना हिंमत बुलंद ठेवावी लागते. चांगले मार्गदर्शन हा प्रवास सोपा करू शकतो.