Post views: counter

Current Affairs Oct 2015 Part- 3

  • झहीर खान निवृत्त :-


भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
झहीर खान हा 2011 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वकरंडक विजेत्या संघाचा सदस्य होता.
झहीर खानने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये नैरोबी येथे केनियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. त्याने या पहिल्या सामन्यातच 48 धावा देत तीन बळी घेतले होते.
झहीरने भारतीय संघासाठी 200 एकदिवसीय सामने खेळले असून, 282 बळी घेतले आहेत. 
झहीरने 2000 मध्येच बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्याने 92 कसोटी सामन्यांत 311 बळी घेतले आहेत.

  • खड्‌गप्रसाद शर्मा ओली नेपाळ देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण :


नेपाळमधील ज्येष्ठ साम्यवादी नेते खड्‌गप्रसाद शर्मा ओली यांनी आज देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली. नेपाळच्या संसदेत 11 तारखेला झालेल्या मतदानात ओली यांनी अनेक छोट्या पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचा
Post views: counter

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ? Global Warming


                          ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तामपानवाढीचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. त्या परिणामांमागे नेमकं आहे तरी काय याचा सांगोपांग आढावा. सोबत , पर्यावरणविषयक कामाबद्दल नोबेल पारितोषिक मिळविणारे अल गोर यांच्या कार्याचा आढावा...
                         गेली काही वर्ष दर उन्हाळ्यात तापमानाचे आकडे वृत्तपत्रे छापतात. दूरचित्रवाणीवर सुमारे ३५ सेकंद एखादा तज्ज्ञ त्याबद्दल काहीतरी मत व्यक्त करतो. त्याला मध्येच तोडून जाहिराती सुरू होतात आणि मग दूरचित्रवाणी निवेदक जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असल्याचं सांगतो. मुंबईत किंवा राजस्थानात धुंवाधार पाऊस पडतो , लगेच त्याचा संबंध जागतिक
Post views: counter

Basic Concepts of Economics


अर्थशास्त्रातील महत्वाच्या काही संकल्पना :


1) व्यापारतोल (Balance of Trade) :-
  • व्यापारतोल (BOT) म्हणजे एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत यांमधील फरक होय.
  • व्यापारतोलात फक्त वस्तूूंच्या आयात-निर्यातीतून निर्माण होणा-या येणी व  देणीचा समावेश असतो.
2) व्यवहार तोल  (Balance of Payment) :-
  • व्यवहारतोल (BOP) म्हणजे एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड असते.
  • व्यवहारतोलात वस्तूंशिवाय सेवांच्या देवाण-घेवाणीतून तसेत कर्जे व गुंतवणुकीच्या व्यवहारांतून निर्माण होणा-या येणी आणि देणी यांचाही समावेश असतो.
3) रुपयाची परिवर्तनियता :-
  • जगातील चलनेमध्ये परस्परांमध्ये विनिमयक्षम असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनामध्ये करता येते.   मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा टाकत असतात.

Post views: counter

RTI माहितीचा अधिकार





माहितीचा अधिकार कायदा 2005


महाराष्ट्र राज्याने माहिती अधिकाराचा आदेश व त्या खालील नियम दिनांक 23 सप्टेबंर 2002 पासून लागू केला होता. दिनांक 15 जून 2005 रोजी केंद्र शासनाने माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने 12 आक्टोंबर 2005 पासून लागू केला. या कायद्यामुळे महाराष्ट्र माहिती अधिकार अध्यादेश व नियम 2002 निरासित केला आहे. परंतू 12 आक्टो, 2005 पुर्वीच्या अर्जावर पूर्वीच्या

भारतातील शिक्षणाचा विकास

पाश्चात्त्य शिक्षणाची ओळख



                         कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ केलेलेयोगदान महत्त्वाचे ठरते .यात विलियम कँरे , फेलिक्स कँरे , विलियम बोर्ड, जाँन मार्श यांनी संस्कृत , बंगाली , हिंदी , मराठी या भारतीय भाषांचा अभ्यास केला .
  1. वॉर्ड- ' बायबल ' चा बंगाली भाषेत अनुवाद .
  2. मार्शमन - भारताचा इतिहास , भुगोल , खगोलशास्रावर पुस्तके लिहिली .
  3. फेलिक्स कँरे - बंगाली भाषेत विश्वकोष
  4. कोलकाता ढाका चितगाव येथे इंग्रजी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या .त्यात ख्रिस्ती धर्माच्या अभ्यासावर भर होता .
  5. १८१८- श्रीरामपूरयेथे बाप्टिस्ट मिशन कॉलेज सुरू केले .