- झहीर खान निवृत्त :-
भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
झहीर खान हा 2011 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या विश्वकरंडक विजेत्या संघाचा सदस्य होता.
झहीर खानने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये नैरोबी येथे केनियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. त्याने या पहिल्या सामन्यातच 48 धावा देत तीन बळी घेतले होते.
झहीरने भारतीय संघासाठी 200 एकदिवसीय सामने खेळले असून, 282 बळी घेतले आहेत.
झहीरने 2000 मध्येच बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्याने 92 कसोटी सामन्यांत 311 बळी घेतले आहेत.
- खड्गप्रसाद शर्मा ओली नेपाळ देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण :
नेपाळमधील ज्येष्ठ साम्यवादी नेते खड्गप्रसाद शर्मा ओली यांनी आज देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केली. नेपाळच्या संसदेत 11 तारखेला झालेल्या मतदानात ओली यांनी अनेक छोट्या पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचा
