Post views: counter

एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा - पेपर ३ ( मानव संसाधन विकास )




मानव संसाधन विकास या घटकाअंतर्गत आयोगाने लोकसंख्या हे स्वतंत्र प्रकरण नमूद केलेले आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रकरण असून सर्वप्रथम २०१२च्या मुख्य परीक्षेत लोकसंख्या घटकावर कोणते प्रश्न विचारले आहेत, ते समजून घ्यावेत आणि अभ्यासाला सुरुवात करावी.

२०१२ च्या मुख्य परीक्षेत खालील प्रश्न विचारले गेले होते-

१) लोकसंख्या धोरण २००० नुसार कोणत्या वर्षांपर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल?
अ) २०३५ 

ब) २०४५
क) २०५५ 

ड) २०५०

२) लोकसंख्या अंदाज अहवाल २००१ नुसार खालीलपकी कोणत्या राज्यातील िलगगुणोत्तर २००१ च्या तुलनेत २०२६ मध्ये चांगले राहील?
अ) गुजरात 

ब) बिहार
क) राजस्थान 

ड) पंजाब

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund )



आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund ) … 


  • स्थापना - २७ डिसेंबर, १९४५
  • उद्देश्य - आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे.
  • मुख्यालय - वॉशिंग्टन, डी.सी. , अमेरिका
  • अधिकृत भाषा - इंग्लिश , फ्रेंच आणि स्पॅनिश
  • व्यवस्थापकीय संचालक - क्रिस्टीन लेगार्ड( 2015 )

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंग्लिश International Monetary Fund लघुरूप IMF, आयएमएफ) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय

प्राकृतिक भूगोल

प्राकृतिक भूगोल 

पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीच्या अंतर्गत रचना जाणून घेण्याचा शास्त्रज्ञांनी आतापर्यंत जो प्रयत्न केला, त्यात प्रत्यक्ष माहितीपेक्षा अप्रत्यक्ष माहितीवर भर देण्यात आला. प्रत्यक्षात अंतरंगात जाऊन त्याची पाहणी करणे वा एखादे यंत्र पाठवून निरीक्षण करणे हे शक्य नाही, म्हणून भूगर्भशास्त्रज्ञांनी पुढील गोष्टींचा वा निरीक्षणांचा आधार घेऊन पृथ्वीचे अंतरंग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

  • पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान
  • पृथ्वीच्या अंतरंगातील दाब
  • पृथ्वीच्या अंतरंगातील घनता
  • ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ
  • उल्कांच्या रचनेचा अभ्यास इ.

भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंतचे अंतर ६३७१ कि.मी. आहे. भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंत पृथ्वीच्या अंतरंगाच्या स्वरूपात बदल होत जातो. या बदलत्या गुणधर्मानुसार 

Current Affairs Oct 2015 Part- 4



  • वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत :



                     भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. भारतात जाऊन अधिकृतरीत्या घोषणा करणार असल्याचे खुद्द सेहवागनेच दुबई येथे झालेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या लाँचिंग दरम्यान स्पष्ट केले. वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवृत्तीनंतर सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या सेहवागने अखेरचा कसोटी सामना मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादेत खेळला होता.

                    वीरू, नवाब ऑफ नजफगढ, सुल्तान ऑफ मुल्तान आणि जेन मास्टरऑफ मोर्डेन क्रिकेट या टोपणनावाने प्रसिध्द असलेला भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंदर सेहवागने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह इंडियन प्रिमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्तीची औपचारीक घोषणा केली. आपल्या ३७ व्या वाढदिवसाच्या दिवशी सेहवागने टि्वटरच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.
Post views: counter

माहिती तंत्रज्ञान




                                 माहिती तंत्रज्ञान म्हणजे माहितीची निर्मिती, एकत्रीकरण, माहितीवर केलेली प्रक्रिया, साठा, माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेली देवाणघेवाण या प्रक्रिया. माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. माहिती तंत्रज्ञानामध्ये कच्च्या माहितीचे रूपांतर उपयोगी माहितीमध्ये केलेले असते. प्रक्रिया केलेल्या माहितीचे पुनर्चक्रीकरण केले जाते.
या माहितीचा संचय करून तिचा उपयोग दुसऱ्या प्रक्रियेसाठी केला जातो तसेच प्रक्रिया केलेली माहिती दुसऱ्या माहितीसाठी एकत्रित करून तिचा परिणाम वाढवता येतो. संचय केलेली माहिती नव्या स्वरूपात मिळू शकते. माहितीचे हे नवे स्वरूप समजण्यास सोपे असते.

आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका -

  1. व्हच्र्युअल रिअॅलिटी (आभासी सत्य) :  प्रत्यक्ष असावे तसे संगणकाच्या मदतीने तयार केलेले आणि वस्तुत: कृत्रिम असलेले सभोवतालचे वातावरण म्हणजेच आभासी सत्य. संगणकीय खेळांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. वैद्यक क्षेत्रातील संशोधनासाठी तसेच शिक्षण क्षेत्रातही याचा प्रभावी उपयोग केला जातो. जाहिरात क्षेत्रात ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी याचा प्रभावीपणे उपयोग केला जातो.
  2. टेलिमेडिसिन : संपर्क तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैव-वैद्यक अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून टेलिमेडिसिन विकसित झाले आहे. साधारणत: या तंत्रानुसार रुग्णाचा वैद्यकीय अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवला जातो.