Post views: counter

गंगा नदी

गंगा नदी 




गंगा ही उत्तर भारतातील नदी जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. गंगेचा उगम हिमालयात भागीरथीच्या रूपात गंगोत्री हिमनदीत उत्तराखंडमध्ये होतो. नंतर ती देवप्रयाग जवळ अलकनंदा नदीला मिळते. यानंतर गंगा उत्तर भारताच्या विशाल पठारावरून वाहत बंगालच्या उपसागराला बऱ्याच शाखांमध्ये विभाजित होऊन मिळते. यामध्ये एक शाखा हुगळी नदी आहे जी कोलकाता जवळून वाहते, दुसरी शाखा पद्मा नदी बांगलादेशात प्रवेश करते. गंगा नदीची पूर्ण लांबी जवळजवळ २५०७ किलोमीटर आहे.

प्रवरा नदी

प्रवरा नदी




  • अन्य नावे - अमृतवाहिनी
  • उगम- रतनगड ८५२ मी.
  • मुख- रत्नाबाईची गुहा
  • लांबी- २०० कि.मी.
  • देश - महाराष्ट्र
  • उपनद्या- मुळा, आढळा, म्हाळुंगी


प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा , आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

नवेगाव राष्ट्रीय उद्यान 



हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.

जंगलाचा प्रकार-
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.

भौगोलिक-उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.

Post views: counter

भारतीय प्रमाणवेळ



भारताची प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसारया वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता.

भारताचे स्थान

भारताचे स्थान

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस– या प्रकारे तोउत्तर गोलार्धात येतो. भारताच्याप्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८ ० ४ उ. ते ३७ ० ६ उ. अक्षांश ६८ ० ७ पू. ते ९७ ० २५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६ ० ३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.