Post views: counter

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना



महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर :
  1. कोल्हापूर - पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर 
  2. नंदुरबार - सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर 
  3. अमरावती - गविलगड टेकड्या व माळघाट डोंगर 
  4. नागपुर - गरमसुर, अंबागड, व मनसर टेकड्या 
  5. गडचिरोली - भामरागड, सुरजगड, चिरोली, चिमुर टेकड्या 
  6. भंडारा - दरेकसा, नावेगाव टेकड्या 
  7. गोंदिया - दरेकसा, नावेगाव टेकड्या
  8. चंद्रपूर - चांदूरगड, पेरजागड 
महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :
  • महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराने व्यापला आहे.
  • लांबी-रुंदी : पूर्व-पश्चिम - 750km. उत्तर-दक्षिण - 700km 
  • ऊंची : 450 मीटर - या पठाराची ऊंची पश्चिमेस (600मी) जास्त व पूर्वेस (300मी) कमी आहे.
  • महाराष्ट्र पठार डोंगररांगा व नद्या खोर्‍यानी व्यापले आहे. 
महाराष्ट्र पठार हे विस्तृत पठार असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
  1.  हरिश्चंद्र डोंगररांगेत - अहमदनगर पठार. 
  2.  बालाघाट डोंगर - मांजरा पठार.  
  3.  महादेव डोंगररांगेत : पाचगणी पठार, सासवड पठार, औध पठार, खानापुर पठार, जत पठार.  
  4. सातमाळा डोंगररांगेत - मालेगाव पठार, बुलढाणा पठार.  
  5. सातपुडा डोंगररांगेत - तोरणमाळ पठार, गविलगड.        

कोकण किनारपट्टी

कोकण किनारपट्टी
  1. स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
  2. विस्तार : उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
  3. लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  
  4. क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी. 
कोकणातील प्राकृतिक रचना :
                           कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे. कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
उतार पूर्व-पश्चिम दिशेस 'मंद' स्वरूपाचा आहे. या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली 'भुरुपे' आढळतात. 
उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.

कोकणचे उपविभाग :
  • उत्तर कोकण - ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड. हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे. ओद्योगिकदृष्ट्या प्रगत. लोकसंख्येची घनता अधिक. नागरी लोकसंख्या जास्त.

सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व - पश्चिम दिशेत (वायव्य - आग्नेय)
A. सातमाळा - अजिंठा डोंगररांगा :  
  1. पूर्व - पश्चिम दिशेत विस्तार
  2. जिल्हा - नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.  
  3. उंची - 200 ते 300 मीटर 
  4. ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.
  5. पश्चिमेकडील भागास - 'सातमाळा'
  6.  पूर्वेकडील भागास - 'अजिंठा' म्हणतात.
  7.  या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्‍यात अजिंठा लेण्या आहेत.    
  8.  या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.
  • धुळे - गाळणा डोंगर 
  • नांदेड - निर्मल डोंगर 
  • औरंगाबाद - वेरूळ डोंगर 
  • हिंगोली - हिंगोली डोंगर 
  • नांदेड - मुदखेड डोंगर 
  • यवतमाळ - पुसद टेकड्या 

मध्ययुगीन इतिहास

                                  मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
                                     केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.

‎अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्हा‬

                               महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा .आजच्या परिस्थितीतअहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे.शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकातआहे.जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखानेआहेत. प्रवरानगर येथेआशिया खंडातील पहिला सहकारी साखरकारखाना स्थापन झाला होता. 'राळेगणसिद्धी' या खेड्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ' हिवरे बाजार' हेआदर्श खेडे म्हणून नावारूपासआले.
Ahmadnagar

  • ‎जिल्ह्याचे_क्षेत्रफळ‬१७,४१२चौ.किमी. 
  • लोकसंख्या इ.स.२०११च्या जनगननुसार४५,४३,०८०इतकी आहे.
                             राज्याच्या मध्यभागी असलेल्याअहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा वऔरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ;पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तरनैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणेजिल्हा हे जिल्हे वसलेलेआहेत.