Post views: counter

Current Affairs : May 2015

चालू घडामोडी:- जून २०१५



  • सेवाकर वाढ:- ०१ जून २०१५ 
    =>सेवाकराच्या दरात १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के इतकी वाढ
    =>रेल्वेचा प्रथमवर्ग आणि वातानुकूलित डब्यांचे शुल्क वाढले असून, मालवाहतूकही महागली आहे. ही वाढ ०.५ टक्के आहे. रेल्वेच्या एसी, प्रथम वर्ग आणि मालवाहतुकीवर सध्या ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. तो आता ४.२ टक्के झाला आहे. त्यामुळे ही वाढ ०.५ टक्के आहे.
  • विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी ५० लाखांची लाच देताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार असलेल्या  ए. रेवनाथ रेड्डी या नेत्यास अटक केली. रेड्डी यांनी स्टिफन्सन यांना पाच कोटींची ऑफर दिली होती. ५० लाख हे मतदानापूर्वी आणि उरलेले साडेचार कोटी मतदानानंतर देणार होतेतेलंगणा विधान परिषदेच्या निवडणुकीत टीडीपीच्या उमेदवारास मतदान करावे यासाठी रेड्डी यांनी अँगो-इंडियन आमदार एल्विस स्टिफन्सन यांना लाच देऊ केली होती.
  • कोलकाताहून अगलतला, व्हाया बांगलादेश बस सेवा ०१ जून २०१५ सुरु करण्यात येणार आहे. 
  • २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा  बार्सिलोना संघाने जिंकली. कँप नोऊमध्ये झालेल्या अंतिम लढतीत अॅ थ्लेटिक बिल्बाओचा ३-१ असा पराभव करत बार्सिलोनाने २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकली.
Post views: counter

How to prepare for Indian Polity ?

भारतीय‬ राज्यघटनेचा अभ्यास कसा करावा?
                           भारतातील घटकराज्यांच्या निर्मितीपासून त्यांच्या विकासाबाबत, नागरिकांमधील परस्परसंबंधापासून इतर देशांबरोबरच्या धोरण, क्षेपणास्त्रांपर्यंतच्या निर्मितीबाबत, महिलांपासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि शेतीपाण्यापासून सणांसाठीच्या सुट्यांपर्यंत, अनेक नव्हे, प्रत्येक बाब नियमित होते ती इथल्या प्रस्थापित ‘राज्यव्यवस्थे’कडून. ही भारतीय राज्यव्यवस्था उभी आहे जगातील सर्वात विस्तृत लिखित राज्यघटनेच्या पायावर. साहजिकच भारतात घडणा-या व भारताबाबत घडणा-या प्रत्येक घडामोडीबाबत विद्यार्थ्याने राज्यशास्त्राच्या अंगाने/बाजूने अभ्यास करायलाच हवा. घडलेली महत्त्वाची घटना, निर्णय, धोरणे इ. सगळ्या गोष्टी ‘राज्यघटने’च्या निकषातून तपासणे आणि त्यासाठी राज्यघटनेचा बारकाईने अभ्यास करणे हा या घटकविषयाच्या तयारीचा गाभा.
                         राज्यघटनेचा अभ्यास करणे म्हणजे क्लिष्ट भाषेत लिहिलेली सगळी कलमे पाठ करणे नव्हे. घटनेतील काही भाग अत्यंत महत्त्वाचे, काही भाग महत्त्वाचे, तर काही भाग इतरांच्या मानाने कमी महत्त्वाचे आहेत. भारतामध्ये ‘लोकशाही’ असल्याने लोकांवर अर्थात सामान्य जनतेच्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणरे भाग यूपीएससीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे असतात. यामध्ये मूलभूत अधिकार,
Post views: counter

MPSC अभ्यासाचे मुलभूत सिद्धांत जाणा...


सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या.
  1. अभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा.
  2. मोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू नका, तर निर्धारित कालावधीत नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा.
  3. विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून निरीक्षणात्मक अभ्यास पद्धत स्विकारा.
  4. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ एकाच विषयाचे विशेतज्ञ असण्याचा काळ इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छीना-यांनी बहुश्रुत असण्यासोबतच विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभावाची मनोवृत्ती विकसित करावी.
  5. सध्याच्या परीक्षेच्या स्वरुपात आंतरविद्याशाखीय आणि गतिशील झाले असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्याकडे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, विश्लेषणात्मक आणि कार्यकारणभाव सुसंगत असणे गरजेचे असल्याची बाब लक्षात ठेवा.

समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

  1. ब्राहमो समाज - 20 ऑगस्ट 1828 - राजा राममोहन रॉय
  2. तत्वबोधिनी सभा - 1838 - देवेंद्रनाथ टागोर
  3. प्रार्थना समाज - 31 मार्च 1867 - दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर
  4. परमहंस सभा - 31 जुलै 1849 - भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर
  5. आर्य समाज - 10 एप्रिल 1875 - स्वामी दयानंद सरस्वती
  6. रामकृष्ण मिशन - 1896 - स्वामी विवेकानंद
  7. थिऑसॉफिकल सोसायटी - 1875 - कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि
  8. सत्यशोधक समाज - 1875 - महात्मा फुले
  9. भारत कुषक समाज - 1955 - पंजाबराव देशमुख

विद्युत चुंबक आणि नियम

विद्युत चुंबक आणि नियम
विद्युत चुंबक :
  • चुंबकीय बलरेषा :चुंबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तरध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला चुंबकीय बलरेषा किंवा विकर्ष रेषा म्हणतात.
चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म :
  1.  चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेल्या लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात.
  2.  दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत.
  3.  चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरवात उत्तर ध्रुवापासून होते व त्यांचे शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो.
  4.  ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या दिसतात.