Post views: counter

आफ्रिका खंड Africa



राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्यासक्रमांत भूगोल या घटकाअंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना अॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.


आफ्रिका खंड 


  1. जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
  2. प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे.
  3. अॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.
  4. या खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.
  5. या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.

सह्याद्री पश्चिम घाट


जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

  1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य  , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र , थेन्मला, कोन्नी  , पुनलुर , तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ यांचा समावेश आहे.
  2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी , कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
  3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.

एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा - पेपर ३ ( मानव संसाधन विकास )




मानव संसाधन विकास या घटकाअंतर्गत आयोगाने लोकसंख्या हे स्वतंत्र प्रकरण नमूद केलेले आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रकरण असून सर्वप्रथम २०१२च्या मुख्य परीक्षेत लोकसंख्या घटकावर कोणते प्रश्न विचारले आहेत, ते समजून घ्यावेत आणि अभ्यासाला सुरुवात करावी.

२०१२ च्या मुख्य परीक्षेत खालील प्रश्न विचारले गेले होते-

१) लोकसंख्या धोरण २००० नुसार कोणत्या वर्षांपर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल?
अ) २०३५ 

ब) २०४५
क) २०५५ 

ड) २०५०

२) लोकसंख्या अंदाज अहवाल २००१ नुसार खालीलपकी कोणत्या राज्यातील िलगगुणोत्तर २००१ च्या तुलनेत २०२६ मध्ये चांगले राहील?
अ) गुजरात 

ब) बिहार
क) राजस्थान 

ड) पंजाब

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund )



आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund ) … 


  • स्थापना - २७ डिसेंबर, १९४५
  • उद्देश्य - आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे.
  • मुख्यालय - वॉशिंग्टन, डी.सी. , अमेरिका
  • अधिकृत भाषा - इंग्लिश , फ्रेंच आणि स्पॅनिश
  • व्यवस्थापकीय संचालक - क्रिस्टीन लेगार्ड( 2015 )

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंग्लिश International Monetary Fund लघुरूप IMF, आयएमएफ) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय

प्राकृतिक भूगोल

प्राकृतिक भूगोल 

पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीच्या अंतर्गत रचना जाणून घेण्याचा शास्त्रज्ञांनी आतापर्यंत जो प्रयत्न केला, त्यात प्रत्यक्ष माहितीपेक्षा अप्रत्यक्ष माहितीवर भर देण्यात आला. प्रत्यक्षात अंतरंगात जाऊन त्याची पाहणी करणे वा एखादे यंत्र पाठवून निरीक्षण करणे हे शक्य नाही, म्हणून भूगर्भशास्त्रज्ञांनी पुढील गोष्टींचा वा निरीक्षणांचा आधार घेऊन पृथ्वीचे अंतरंग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

  • पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान
  • पृथ्वीच्या अंतरंगातील दाब
  • पृथ्वीच्या अंतरंगातील घनता
  • ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ
  • उल्कांच्या रचनेचा अभ्यास इ.

भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंतचे अंतर ६३७१ कि.मी. आहे. भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंत पृथ्वीच्या अंतरंगाच्या स्वरूपात बदल होत जातो. या बदलत्या गुणधर्मानुसार