Post views: counter

सुकन्या योजना : Sukanya Yojana

सुकन्या योजना

 महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. देशात मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केली. महाराष्ट्राचा हा प्रागतिक विचार जोपासून राज्यात मुलींचे शिक्षण आणि आरोग्यात सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे तसेच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करुन बालविवाह रोखणे, मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात सुकन्या योजना शासनाने 13 फेब्रुवारी 2014 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये 1 जानेवारी 2014 पासून लागू केली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये
  • या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे शासन 21 हजार 200 रुपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवणूक करणार आहे.
  • त्यानंतर या मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये तिला मिळणार आहेत.
  • आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून नाममात्र 100 रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करुन या मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरविला जाईल.
  • ज्यात पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना रक्कम अदा करण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री’ योजना : Majhi Kanya Yojana

माझी कन्या भाग्यश्री’ योजना

मुलींच्या शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भृणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यात सुरु केली आहे.


वैशिष्टे 
  1.  या योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एका मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थ्यांना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी 5 हजार रुपये, मुलगी 5 वर्षे वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 5 वर्षांकरीता 10 हजार रुपये
  2.  मुलीच्या 6वी ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान पोषण आहार व इतर खर्चासाठी 7 वर्षांकरीता एकूण 21 हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.

Current Affairs Jan 2016 Part- 5


  • ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांचे निधन :-

  ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी (वय 82) यांचे निधन झाले. ते पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
अल्पपरिचय -
- दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (जन्म 25जुलै 1934)
- मराठी कवी व साहित्य समीक्षक
- नागपूर विद्यापीठात पीएच.डी.
- विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी)
- नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश
- द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग

मान-सन्मान :
- महाराष्ट्र शासन पुरस्कार, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार
- नागपूर विद्यापीठाचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन (पुणे)
- न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्युनच उत्कृष्ट कथा पुरस्कार
- महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
- स्वरूप व समीक्षा"ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
- पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार

Current Affairs Jan 2016 part - 4

  • संरक्षण २०१५:-

  • इंद्र २०१५:-
स्थळ :- बिकानेर (राजस्थान)
भारत आणी रशिया यांच्यातील इंद्र या सामरिक कसरतीची सातवी आवृती. या कसरती ऐकून १४ दिवस सुरु होत्या
  • मलबार :- २०१५
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अमेरिका, जपान आणी भारत यांच्या नौदलामध्ये या सयुक्त कसरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येयुद्धनौका, विनाशिका आणी विमानवाहू नौंकाचा सहभाग होता
  •  मित्र शक्ती:-
स्थळ :- पुणे
भारत आणी श्रीलंका यांच्या लष्करामध्ये २९ सप्टेंबर ते ११ आक्टोंबर या कालावधीत सयुक्त कसरत पार पडली
  • सिम्बेकस :- २०१५:-
सिंगापुर आणी भारत यांच्या नौदलातील चारदिवशीय कसरती. हिंदी महासागर आणी दक्षिण चीनी समुद्र या दरम्यान २३ ते २६ मे दरम्यान पार पडल्या
  • इंद्रधनुष्य;-
स्थळ:- हनींगटन
भारत आणी युनायटेड किंग्डम यांच्यातील हवाई कसरती ३० जुलै रोजी पार पडल्या
  • गरुडशक्ती :-
११ ते २१ फेब्रुवारी दरम्यान भारत

Current Affairs Jan 2016 Part-3


  • रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील पाचवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर ६.७५ टक्के तर रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) देखील ४ टक्के असे स्थिर ठेवण्यात आले
  • पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्याचा निकालही तीन दिवसांतच लागला. वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व राखलेल्या सामन्यात अखेर पीटर सीडलने विजयी धाव घेऊन ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन गडी राखून ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकत मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंड २००३ नंतर प्रथमच एखाद्या मालिकेत पराभूत झाले.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार "क‘ प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी "ई-लिलाव‘ प्रक्रिया राबविणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2016 ही तारीख निश्चिऱत केली
  • विमा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या सरकारच्या धोरणाला कॅनेडियन सन लाइफ फायनान्शिअलने प्रोत्साहन देऊ केले आहे. कंपनीने तिची पूर्वीपासून भागीदार असलेल्या बिर्ला सन लाइफ इन्शुरन्समधील हिस्सा २६ वरून ४९ टक्क्यांपर्यंत नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १,६६४ कोटी रुपये मोजण्यात