Post views: counter

Current Affairs November 2016 Part - 2

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय नोकरी

 राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे .

राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे , यासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे विशेष धोरण आहे . त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा केली . त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता . त्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे .
या खेळाडूंमध्ये संदीप यादव ( क्रीडा मार्गदर्शक , क्रीडा विभाग ) , कविता राऊत ( आदिवासी विकास विभाग ) , ओंकार ओतारी ( तहसीलदार , महसूल विभाग ) , अजिंक्य दुधारे ( क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग ) , पूजा घाटकर ( विक्रीकर निरीक्षक , विक्रीकर विभाग ) , नितीन मदने ( तहसीलदार , महसूल विभाग ) , किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग ) आणि नितू इंगोले ( क्रीडा विभाग ) यांचा समावेश आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सोयाबीनवर आयात शुल्क वाढवण्याची केंद्राकडे मागणी

राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने त्याचे दर घसरण्याची शक्यता आहे . अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क

Current Affairs November 2016 Part - 1




★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पुरोगामी राज्यात मुलगी नकोशीच

 ' मुलगा वंशाचा दिवा ' हे रूढ झालेले वाक्य आज समाजात खुलेआम कुणी म्हणत नसले तरी प्रत्यक्षात मात्र जुन्याच पद्धतीने पुरोगामी महाराष्ट्राचे मार्गक्रमण सुरू आहे . मुलींचा जन्मदर वाढीसाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना व जनजागृती केली . मात्र , हजारामागे केवळ 907 असाच दर असल्याने आजही मुलगी नकोशीच असल्याचे अधोरेखित झाले आहे .

केंद्र शासनाकडून ' बेटी बचाओ , बेटी पढाओ ' ही मोहीम काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे . राज्य शासनाकडूनही या मोहिमेच्या यशस्वितेसाठी विविध जाहिराती देऊन मुलींचा जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे . मात्र , अद्याप समाजातील चित्र बदलण्यात आवश्यक ते यश न आल्याने वर्षागणिक मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे आरटीआय अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले .

1991 च्या जनगणनेनुसार एक हजार मुलांच्या मागे 946 , 2001 मध्ये 913, तर 2011 च्या जनगणनेनुसार हेच प्रमाण 894 पर्यंत खाली आले आहे . तीन दशकांत मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत असल्याने पुरोगामी महाराष्ट्र कुठे चाललाय, असा प्रश्न पडला नाही तर नवलच . मागील वर्षीचा जन्मदर हजारामागे 907 एवढाच आहे . त्यामुळे ' बेटी बचाओ , बेटी पढाओ ' या मोहिमेत राज्यात लाखो संस्था, संघटना , नागरिक सहभागी होतात. परंतु , यात सहभागी होणाऱ्यांच्या डोक्यात किती प्रकाश पडतो? हाही संशोधनाचा विषय झाला आहे .

' बहीण हवी ' केवळ संकल्पनाच

राज्य शासनाकडून विविध जाहिराती तसेच राखी पौर्णिमा , भाऊबीजेला सोशल मीडियावरून राखी बांधायला बहीण हवी , तर मुलगी का नको ? असे संदेश येऊन पडतात . परंतु , हे संदेश कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचे मागील वर्षातील राज्यातील जन्मदरातून दिसून येते . मागील वर्षी राज्यात 9 लाख 19 हजार 799 मुलींच्या जन्माची नोंद झाली . त्याचवेळी 10 लाख 14 हजार 263 मुलांच्या जन्माची नोंद करण्यात आली .

पालकांकडून कायदेभंग

मुलाचाच हट्ट धरत प्रसवपूर्व निदान करणारे आजही समाजात उथळ माथ्याने फिरत आहेत. 2013 - 14 ते जुलै 2016 पर्यंत प्रसवपूर्व निदान करणाऱ्या 567 जणांविरुद्ध न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आली आहे . यातील 84 प्रकरणांत 94 जणांना शिक्षाही ठोठावण्यात आली . 68 जणांना सश्रम कारावास , तर 16 प्रकरणांत दंड ठोठावण्यात आला आहे .

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹औद्योगिक उत्पादनाने घेतला ‘ वेग’

- विद्युत उपकरण , वाहननिर्मिती; तसेच ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे . परिणामी भारताच्या

Current Affairs October 2016 Part - 5



  • शहरातील स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडून आढावा 


स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील शहरी भागात दोन वर्षांत 22 लाख 97 हजार 389 वैयक्तिक घरगुती प्रसाधन गृहे बांधण्यात आली आहेत.  पाच वर्ष मुदतीचे हे अभियान 2019 पर्यंत चालणार असून त्याअंतर्गत एकूण 66 लाख 42 हजार 221 प्रसाधन गृहे बांधण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहेत. दोन वर्षांत 35 टक्के लक्ष पूर्ण झाले आहे.
गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये शहरी भागांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधत निर्धारित लक्ष पूर्ण केले आहे. या दोन्ही राज्यांमधील शहरी क्षेत्रात उघड्यावरील शौचमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत महाराष्ट्रात एकूण 6 लाख 29 हजार 819 प्रसाधन गृहे बांधण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी 2 लाख 7 हजार 888 प्रसाधन गृहे बांधण्यात आली आहेत.

लॉरियर्स वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कार 2016 :

क्रिडा क्षेत्रातील ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो.
 
वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू - नेवॉक जोकोविच (सर्बिया) खेळ-टेनिस, तिसर्‍यांदा हा पुरस्कार पटकावला यापूर्वी 2015, 2012 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
 
वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कार टेनिस
Post views: counter

MPSC exams 2017-18 Timetable

आयोगाने जाहीर केले 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक. पहा कोणती एक्साम कधी आहे .

आयोग प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला आगामी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करत असते....
Tags: MPSC exam Timetable 2017

Post views: counter

STI Pre strategy : STI पूर्व परीक्षा नियोजन



नमस्कार मित्रहो,
STI ची ऍड येऊन काही दिवस झाले आहेत , STI एक्साम साठी कोणत्या बुक्स मधून अभ्यास करावा याची पुस्तक यादीही यापूर्वी आम्ही पुरवली आहे. मात्र ज्याप्रमाणे आम्ही राज्यसेवा 2017 समोर ठेऊन अभ्यासाचे नियोजन ( वेळापत्रक ) करून दिले आहे , त्याचप्रमाणे STI चेही नियोजन करून घ्यावे असे अनेक मित्रांनी विनंती वजा msg फेसबुक पेज / टेलिग्राम / व्हाट्स ऍप वरती पाठवले आहेत, त्यांच्या विनंतीला मान देऊन आगामी STI पूर्व  परिक्षेकरिता अभ्यासाचे नियोजन देत आहोत.

दुसरी एक गोष्ट माज्या निदर्शनास येत आहे, ती म्हणजे " STI जाहिरात आल्या पासून काही क्लासेस ,