Post views: counter

Current Affairs May 2017 Part - 1

🔰 Current Affairs Marathi 🔰:

🔹इस्रो अंतराळात जोडणार अंतराळयाने

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आता नव्या यशशिखराकडे जाण्यास सिद्ध होत आहे. नव्याने वेगात वाढू लागलेल्या अंतराळ मोहीम क्षेत्रात मुसंडी मारण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना इस्रोने आखली आहे. या आठवड्यात दक्षिण आशियातील सात सार्क देशांत विविध सेवा देणारा उपग्रह पाठवणार असल्याबद्दल मिळणारी शाबासकी ताजी असतानाच अंतराळात मानवांच्या वावराला वेग देणारी योजना त्याने जाहीर केली आहे.

या योजनेनुसार इस्रो अंतराळात दोन वेगवेगळ्या अंतराळयानांना जोडणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. या जोडणी तंत्रज्ञानामुळे दोन अंतराळयाने वेगात प्रवास करत असतानाही एकमेकांशी जोडली जाऊ शकतील आणि त्यामुळे त्यांच्यात सामानापासून माणसांपर्यंतची देवाणघेवाण शक्य होणार असल्याचा इस्रोचा दावा आहे. याचा अर्थ इस्रो मानवाला अंतराळात धाडण्याच्या जगातील मोजक्याच देशांच्या यादीत झळकणार आहे.

Current Affairs April 2017 Part - 5

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔹नासा’चा ‘सुपर प्रेशर बलून’

आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून येत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या वैश्विक किरणांचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’तर्फे मंगळवारी भलामोठा ‘सुपर प्रेशर बलून’ वातावरणात सोडण्यात आला. न्यूझीलंडमधून हा बलून सोडण्यात आला असून त्याचा आकार फूटबॉल स्टेडिअमएवढा आहे. पृथ्वीच्या वातावरणात दक्षिण गोलार्धात मध्य अक्षांश पट्ट्यावर हा बलून तरंगत राहणार असून ही मोहीम १०० दिवसांपेक्षा अधिक काळ चालणार आहे. आधीच्या मोहिमांनी दिलेल्या धड्यावरून या मोहिमेत सुधारणा करण्यात आली असून वापरलेले तंत्रज्ञान अधिक प्रगत आहे, अशी माहिती या मोहिमेचे प्रमुख डेबी फेअरब्रदर यांनी दिली.

आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून येणाऱ्या आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणाऱ्या अतिप्रचंड ऊर्जेच्या वैश्विक किरणांचा अभ्यास या मोहिमेद्वारे होणार आहे. या किरणांमधील उच्च ऊर्जेच्या कणांची पृथ्वीच्या वातावरणातील नायट्रोजनच्या रेणूंशी प्रक्रिया होऊन यूव्ही फ्लोरोसन्स प्रकाश निर्माण होतो. सर्वाधिक ऊर्जा असलेल्या वैश्विक कणांचा या मोहिमेद्वारे शोध घेण्यात येत आहे. या कणांची निर्मिती हे मोठे गूढ असून ते आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवरांतून येतात, की अतिवेगवान पल्सारमधून अथवा आणखी कोठून, त्याची उकल करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. हा बलून पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे.

🔹CRPF च्या महासंचालकपदी राजीव भटनागर

छत्तीसगडच्या सुकमामधील नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यानंतर अखेर केंद्र सरकार जागे झाले आहे.
 सीआरपीएफच्या महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची आज नियुक्ती करण्यात आली. भटनागर हे १९८३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तर भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP)च्या महासंचालकपदी के. पचनंदा यांची नियुक्ती करण्यात आली. पचनंदा हे बंगाल कॅडरमधील १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

सीआरपीएफच्या महासंचालक पदावरून के. दुर्गा प्रसाद हे २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त महानिरीक्षक सुदीप लखटकिया यांच्याकडे सीआरपीएफचा अतिरिक्त भार सोपवला. यामुळे सीआरपीएफचे महासंचालक पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त होते.

प्रसाद यांच्या नियुक्तीनंतर ११ मार्चला सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले होते. त्यानंतरही सीआरपीएफच्या महासंचालकपदाच्या नियुक्तीसाठी सरकारी पातळीवर कुठलीही हालचाल झाली नाही. यामुळे नक्षलवाद्यांनी पुन्हा डाव रचत २४ एप्रिलला सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. यात २५ जवान शहीद झाले. यानंतर सीआरपीएफचे महासंचालक पद रिक्त असल्यावरून सोशल मीडियातून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सरकारवर दबाव वाढला होता. अखेर २५ जवानांचे बलिदान आणि वाढत्या दबावानंतर सरकार जागे झाले आणि सीआरपीएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली गेली.

Current Affairs April 2017 Part - 4

🔰 Current Affairs Marathi 🔰:


🔹 राज कपूर, व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर

राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांना तसेच चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांना आज जाहीर झाला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनायच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा केली.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची २०१७ च्या पुरस्कारांसाठी निवड केली.
राज्य शासनाच्या वतीने यंदा ५४ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे वांद्रे रिक्लेमेशन, म्हाडा मैदान क्र. १, वांद्रे पश्चिम येथे आयोजन करण्यात आले आहे. या पारितोषिक वितरण सोहळयात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

▪️रक्तातच अभिनय

चेहऱ्यावरील हावभाव, डोळयातून व्यक्त होणाऱ्या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे कलाकार म्हणजे विक्रम गोखले. सशक्त, गंभीर भूमिका साकारणारे संवेदनशील कलावंत म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला आहे. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला.
Post views: counter

Current Affairs April 2017 Part - 3

🔰 Current Affairs Marathi 🔰:

🔹औपचारिक क्षेत्रात भारतासंदर्भात “लिंग समानता निर्देशांक” जाहीर

वित्त, संरक्षण व कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री अरुण जेटली यांनी 14 एप्रिल 2017 रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 33 व्या FICCI महिला संघटना (FLO) परिषदेत औपचारिक क्षेत्रात भारतासंदर्भात “लिंग समानता निर्देशांक (Gender Parity Index)” जाहीर केला आहे.

FLO आणि भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry –FICCI) यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या निर्देशांकाचा मुख्य उद्देश म्हणजे औपचारिक क्षेत्रात लिंग विविधता आणि महिला सबलीकरण आणि वर्षांत केलेली प्रगती यांचे मूल्यांकन करणे हे आहे. याप्रसंगी, अरुण जेटली यांच्या हस्ते फराह खान (संचालक, निर्माता, अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका), शोभना भारतीया (हिंदुस्थान टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा), अनिता डोंगरे (फॅशन डिझायनर), रेनू सुद कर्नाड (HDFC च्या MD), डॉ. प्रताप सी. रेड्डी (अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल), महावीर सिंग फोगाट (कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक प्रशिक्षक) यांना FLO आयकॉन पुरस्कार दिले गेलेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹वीरप्पा मोईली लिखित “द फ्लेमिंग ट्रेसेस ऑफ द्रौपदी” पुस्तक प्रकाशित

वीरप्पा मोईली यांचे “द फ्लेमिंग ट्रेसेस ऑफ द्रौपदी” पुस्तक प्रकाशित झाले आहे. रूपा पब्लिकेशन इंडिया हे पुस्तकाचे प्रकाशक आहेत. वीरप्पा मोईली हे व्यवसायाने 
Post views: counter

Combine PSI STI ASO Book List

Combine PSI-STI-ASO Book List


PSI STI ASO Book List
इतिहास-
  • शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी. 
  • आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर(ठराविक धडे)
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे 
  • समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  • YCMOU Book : HIS 220 SYBA ( Its IMP)
भूगोल-
  • शालेय पुस्तके- 5 वी ते 12 वी ( विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोलावर आधारित ) 
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी 
  • भारताचा भूगोल- ए.बी. सवदी 
  • ऍटलास- निराली / ऑक्सफर्ड
-------------------------------------------------
-------------------------------------------------
राज्यशास्त्र-
  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी  
  • भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे
  • पंचायतराज-व्ही . बि. पाटील के सागर  / खंदारे
अर्थशास्त्र-
  • शालेय पुस्तके 11 वी व 12 वी 
  • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / किरण देसले
  • प्रतियोगीता दर्पण अर्थशास्त्र स्पेशल इशू
विज्ञान-
  • शालेय पुस्तके - 5 वी ते 12वी
  • सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन(हिंदी/ इंग्लिश)
गणित व बुद्धिमापन-
  •  मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
  • बुद्धिमत्ता चाचणी- जी किरण
  • Verbal-Non verbal- RS Agrawal
चालू घडामोडी-
  • पेपर- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
  • मासिके- सकाळ इयर बुक, लोकराज्य , योजना , स्टडी सर्कल / युनिक/ पृथ्वी / चाणक्य यापैकी कोणतेही 2 घ्या, लोकराज्य आणि योजना अंतिम सत्य. 
  • eMPSCkatta Blog होय आम्हीच! मागील वर्षभरातील चालू घडामोडी एकत्रित अभ्यासण्यासाठी वेळोवेळी भेट द्या.
  • दररोजच्या चालू घडामोडी साठी आमचे टेलिग्राम चॅनेल Current Affairs Marathi जॉईन करायला विसरू नका.
  •  प्रतियोगीता दर्पण मधील शेवटी दिलेले प्रश्न सोडवाच.
थोडक्यात उजळणीसाठी गाईड 
  • गाईड- बी पब्लिकेशन / एकनाथ पाटील 

Source: www.eMPSCkatta. blogspot.in

Source: www.eMPSCkatta.blogspot.in