- तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका :
कृषी, सेवा आणि उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रांची कामगिरी खराब झाल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) परिणाम झाला आहे. या तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका राहिला. त्याच्या आधीच्या तिमाहीत हाच विकासदर 7.5 टक्के इतका होता विकासदराचा वेग मंदावल्यामुळे आणि औद्योगिक उत्पादनातही घट झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरांत कपात करू शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
- डॉ. श्रीकर परदेशी यांची संचालकपदी पदोन्नती :
महाराष्ट्रातून एप्रिल महिन्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) बढती मिळालेले सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना अवघ्या चार महिन्यांत संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
"पीएमओ"मध्ये सामान्यतः पाच संचालक असतात. मात्र याला अपवाद करताना डॉ. परदेशी धरून आता ही संख्या सहा वर पोचली आहे.
2001 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांच्याकडे केंद्राच्या नऊ मंत्रालयांच्या समन्वय व संवादाची जबाबदारी आहे.
या मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषयही हाताळण्याचे काम त्यांच्याकडे आहे. विशेषतः सामाजिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांचे विविध विषय हाताळण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
यात ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा समावेश आहे.
"पीएमओ"मध्ये सामान्यतः पाच संचालक असतात. मात्र याला अपवाद करताना डॉ. परदेशी धरून आता ही संख्या सहा वर पोचली आहे.
2001 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांच्याकडे केंद्राच्या नऊ मंत्रालयांच्या समन्वय व संवादाची जबाबदारी आहे.
या मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषयही हाताळण्याचे काम त्यांच्याकडे आहे. विशेषतः सामाजिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांचे विविध विषय हाताळण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
यात ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा समावेश आहे.
- संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित :
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे भारतीय सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर अखंड कार्य करणारे अंशू गुप्ता यांना आज मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणूनही गणला जातो. फिलिपीनचे राष्ट्रपती बेनिग्नो सिमोन कोजुआंग्वो एक्विनो यांनी सुवर्णपदक देऊन चतुर्वेदी आणि गुप्ता यांचा सन्मान केला. संजीव चतुर्वेदी हे 2002 च्या आयएफएस बॅचचे अधिकारी आहेत. अंशू गुप्ता यांनी 1999 मध्ये 27 व्या वर्षी कॉर्पोरेट सेक्टरमधील नोकरीवर पाणी सोडत गुंज ही संस्था स्थापन केली.
- गुगल'चा लोगो प्रवास 1997 ते 2015:-
नेटविश्वातील आघाडीचे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "गुगल‘च्या लोगोचे मेकओव्हर करण्यात आले असून, हा लोगो अधिक उठावदार बनविण्यात आला आहे. आता "सॅनसेरिफ‘ फॉंटमध्ये हा लोगो अवतरला आहे. 1997 पासून आतापर्यंत गुगलने सात वेळा लोगो बदलला आहे. गुगलने सर्वप्रथम 1997 मध्ये आपला लोगो जगासमोर आणला.त्यानंतर 1998 मध्ये लगेच त्यामध्ये बदल केला. त्याचवेळी त्यांनी गुगलच्या लोगोमध्ये अवतरण चिन्हाचा समावेश केला. 1999 मध्ये लगेच गुगलने लोगो बदलून त्यातून अवतरण चिन्ह हटविले. त्यानंतर आतापर्यंत दोन किंवा तीन वर्षांच्या अंतराने लोगो बदलण्यात आले
- राजीव मेहरिषी नवे केंद्रीय गृहसचिव:- केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यावर केंद्र सरकारने त्यांच्या जागी ज्येष्ठ सनदी अधिकारी राजीव मेहरिषी यांची नियुक्ती केली.मेहरिषी हे ३१ ऑगस्ट सेवानिवृत्त होणार होते. त्याची ही निवड दोन वर्षांसाठी गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राजस्थान श्रेणीतील सनदी अधिकारी असलेले मेहरिषी हे आर्थिक व्यवहार सचिव होते, मेहरिषी हे राजस्थान केडरचे असून वसुधंरा राजे यांच्या मुखमंत्रीपदाच्या पहिल्या कारकीर्दीत (२००३-२००८) मध्ये मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते
- मदरशांवर राष्ट्रध्वज फडकाविण्यात येईल :
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील सर्व मदरशांवर राष्ट्रध्वज फडकाविण्यात येईल याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. यशवंत वर्मा यांच्या पीठाने सदर आदेश दिला.अलिगढ येथील रहिवासी अरुण गौर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर पीठाने हा आदेश दिला.मदरशांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकाविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश द्यावे, अशी याचिकेत विनंती करण्यात आली होती.
- अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज' हा उपक्रम राबवण्यात येणार :
महाराष्ट्रातील निवडक पाच गावांमध्ये इस्राईलमधील कंपन्यांच्या सहकार्याने 'अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.शेतकऱ्याला स्वाभिमानाने आणि सन्मानाने स्वतःच्या पायावर उभा करणारा, समृद्धीच्या वाटेवर नेणारा, आधुनिक जगाशी जोडणारा हा अनोखा प्रकल्प आहे.वीज, पाणी, रस्त्यांसह इंटरनेट आदी सुविधा खेड्यांनाही मिळायला हव्यात,सारी कामे पारदर्शकपणे ऑनलाइन व्हायला हवीत. म्हणूनच शेती आणि शेतकरी मजबूत करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उिद्दष्ट आहे, वेगळेपण आहे.'अॅग्रोवन' आणि ‘व्हायटल फंड’ यांचा संयुक्त निधी स्थापन करून शेती विकासाच्या प्रकल्पात गुंतवणूक केली जाईल. हे सरकारी अनुदान असणार नाही.प्रस्तावांची छाननी केली जाईल. प्राथमिक टप्प्यात निवड झालेल्या गावांची पाहणी करून अंतिम निवड केली जाईल.प्रकल्पामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे ‘तनिष्का’ गट असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाईल.गरज भासल्यास लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल.
- कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येणार :
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावे कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येणार असून त्याचे स्वरूप राज्य शासनाने जाहीर केले. त्यानुसार उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दरवर्षी 45 लाख कौशल्य मनुष्यबळ निर्मिती करण्यात येईल, असा सरकारचा दावा आहे. या अभियानाला पूरक असे विद्यापीठ उभारण्याचा मानसही सरकारने जाहीर केला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी विविध उद्योग समूहांचा सहभाग घेण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास शिखर परिषद कार्यरत राहील. राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यकारी समितीही स्थापन करण्यात येणार आहे.
या संदर्भात विविध प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती असेल. अंमलबजावणीसाठी यंदा 161 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या संदर्भात विविध प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती असेल. अंमलबजावणीसाठी यंदा 161 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद आयोजित :
भोपाळमध्ये 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद आयोजित करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. जागतिक पातळीवर हिंदी भाषा लोकप्रिय करणे, हा या परिषदेचा उद्देश असून त्यामध्ये 27 देशांचे प्रतिनिधी आणि भारतातील विद्वान सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मध्यप्रदेश सरकारच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली असून 'हिंदी जगत : विस्तार एवम् संभवनाए' अशी परिषदेची संकल्पना आहे. गुगल आणि आयफोन बनविणाऱ्या कंपन्या परिषदेतील प्रदर्शनास सहभागी होऊन हिंदी भाषा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या परिषदेच्या समारोपप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महानायक अमिताभ बच्चन यांची भाषणे होणार आहेत. परिषदेत हिंदी भाषेबद्दल एकूण 28 परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. अमिताभ बच्चन चित्रपटांमधून हिंदी भाषेचा प्रचार करण्याची प्रेरणा आहेत त्यामुळे ते 'आओ अच्छी हिंदी बोले' या विषयावर भाषण करणार आहेत.
- एन. रामचंद्रन यांचा पुरस्कार दिल्ली हायकोर्टाने केला रद्द :
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना 2011 चा देण्यात आलेला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिल्ली हायकोर्टाने रद्द केला आहे. योग्य चौकशी आणि प्रक्रिया विचारात न घेताच या पुरस्कारावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते असे कोर्टाने म्हटले आहे. येत्या चार आठवड्यात क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरणाने आदेश काढून हा पुरस्कार रद्द करावा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. 2016 च्या पुरस्कारांसाठी आघाडीच्या क्रीडापटूंचा समावेश निवड समितीत करावा अशी सूचनाही कोर्टाने केली आहे. 2009 मध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्यासाठी हा पुरस्कार सुरू केला. रामचंद्रन यांना क्रीडा अकादमीच्या व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार सरकारतर्फे देण्यात आला होता. कोर्टाने यासंदर्भात असे नमूद केले की, रामचंद्रन यांचे योगदान काय याचा गांभीर्याने विचार न करताच सरकारने त्यांना हा पुरस्कार देऊ केला.
निवड समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आलेल्या या निवडीचे म्हणूनच समर्थन करता येत नाही.
निवड समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आलेल्या या निवडीचे म्हणूनच समर्थन करता येत नाही.
- कसोटी मालिकेचे 'दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज' नामकरण :
भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळविल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेचे नामकरण 'दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज' असे करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांना समर्पित करण्यात आलेल्या 'फ्रीडम करंडका'साठी ही मालिका खेळविण्यात येईल.
स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हे भारत व दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधील समान सूत्र आहे.
अहिंसा व असहकाराच्या आयुधांच्या सहाय्याने महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांनी भारत व दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळवून दिले.
त्यांच्या या प्रकाशमान वाटचालीमधून संपूर्ण जगाने प्रेरणा घेतली. या पार्श्वभूमीवर, या दोन देशांसाठी पथदर्शक व्यक्तिमत्त्वे असलेल्या महात्मा व मदिबा यांना हा करंडक समर्पित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हे भारत व दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधील समान सूत्र आहे.
अहिंसा व असहकाराच्या आयुधांच्या सहाय्याने महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांनी भारत व दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळवून दिले.
त्यांच्या या प्रकाशमान वाटचालीमधून संपूर्ण जगाने प्रेरणा घेतली. या पार्श्वभूमीवर, या दोन देशांसाठी पथदर्शक व्यक्तिमत्त्वे असलेल्या महात्मा व मदिबा यांना हा करंडक समर्पित करण्यात आला आहे.
- कर्जबाजारी देशांमध्ये भारताचा 35वा क्रमांक :
सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अर्थात जीडीपीच्या तुलनेत प्रत्येक देशावर किती टक्के कर्ज आहे, याचा आढावा फोर्ब्ज नियतकालिकाने घेतला असून त्यात अशा कर्जबाजारी देशांमध्ये भारताचा 35वा क्रमांक लागला आहे. कर्जाची टक्केवारी जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये जपानचा प्रथम क्रमांक लागला आहे. जपान हा ग्रीसपेक्षाही कर्जबाजारी असला तरी त्याची निर्यात सक्षम असल्याने त्याच्यावर ग्रीससारखी दिवाळखोरीची वेळ आलेली नाही, असे निरीक्षण फोर्ब्जने नोंदवले आहे. या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक कर्ज असलेले देश या आजमितीला सर्वात श्रीमंत देश समजले जात आहेत, याकडेही फोर्ब्जने लक्ष वेधले आहे. कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिका (यूएसए), चीन व रशिया अनुक्रमे 16, 22 व 43व्या क्रमांकावर आहेत.
- ‘बंधन’ पूर्ण बँकेचा दर्जा मिळालेली भारतातील पहिली सूक्ष्म-वित्त कंपनी बनली आहे.*
‘बंधन’चा इतिहास:
- २००१ साली चंद्रशेखर घोष यांनी बंधनची स्थापना केली.
- त्यावेळी बंधन ही एक ना-नफा ना-तोटा तत्वावर चालणारी लघु-वित्त संस्था होती.
- गरीबीचे उच्चाटन करून महिलांना सक्षम बनवणे हा तिचा उद्देश होता.
- लवकरच ती भारतातील सर्वात मोठी सूक्ष्म-वित्त संस्था बनली.
- तसेच जगातील सर्वात मोठी ठेवी न स्वीकारणारी सूक्ष्म-वित्त संस्था बनली.
- २००६ साली बंधनचे रुपांतर गैर-बँकिंग वित्तीय संस्थेत (NBFC) झाले.
लघु-वित्त संस्था
>> गैर-बँकिंग वित्तीय संस्था२०१५ :--
या गैर-बँकिंग वित्तीय संस्थेला भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पूर्ण व्यावसायिक आणि नोंदणीकृत बँकेचा दर्जा दिला. केंद्र सरकारनेसुद्धा मान्यता दिली.
गैर-बँकिंग वित्तीय संस्था
>> पूर्ण व्यावसायिक आणि नोंदणीकृत बँकबंधन – एक पूर्ण व्यावसायिक आणि नोंदणीकृत बँक:--
- बंधन ही पूर्ण व्यावसायिक आणि नोंदणीकृत बँक जरी बनली असली तरी तिने आपले ध्येय सोडलेले नाही.
- बंधनच्या ७१% शाखा ग्रामीण भागात आहेत.
- ३५% शाखा ज्या भागात बँकिंग सुविधा अद्याप पोहोचलेल्या नाहीत, तेथे आहेत.
- समाजातील असंघटीत क्षेत्रातील मजुर, लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला यांच्या वित्तीय गरजा भागवणे, हेच ध्येय या बँकेने समोर ठेवले आहे.
- तिच्या सर्वाधिक शाखा पश्चिम बंगालमध्ये आहेत.
- "ब्रेकिंग न्यूज"च्या शोधात ट्विटरला सर्वाधिक पसंती :
सोशल मिडियाच्या युगात "ब्रेकिंग न्यूज"च्या शोधात असलेल्या नेटिझन्सची ट्विटरला सर्वाधिक पसंती असल्याचे अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे. यासाठी अमेरिकन प्रेस इन्स्टिट्युट आणि ट्विटर यांनी संयुक्तपणे डीबी5 या संशोधन संस्थेच्या सहकार्याने सर्व्हे केला आहे. त्यामध्ये सोशल मिडियावरील 4,700 युजर्सच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यातून ही माहिती समोर आली आहे.
सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या युजर्सपैकी तब्बल 40 टक्के युजर्सनी "ब्रेक्रिंग न्यूज" पाहण्यासाठी मुख्य स्रोत म्हणून ट्विटरचा उपयोग करत असल्याचे सांगितले आहे. ट्विटरद्वारे पत्रकारांचे आणि लेखकांचे वाचन नियमितपणे वाचले जात असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच ट्विटरवरील बहुतेक युजर्स हे इतर माध्यम समूहांचे ग्राहक असल्याचेही संशोधनात म्हटले आहे.
सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या युजर्सपैकी तब्बल 40 टक्के युजर्सनी "ब्रेक्रिंग न्यूज" पाहण्यासाठी मुख्य स्रोत म्हणून ट्विटरचा उपयोग करत असल्याचे सांगितले आहे. ट्विटरद्वारे पत्रकारांचे आणि लेखकांचे वाचन नियमितपणे वाचले जात असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच ट्विटरवरील बहुतेक युजर्स हे इतर माध्यम समूहांचे ग्राहक असल्याचेही संशोधनात म्हटले आहे.
- मॅट न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने केली मान्य :
भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या विदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान पर्यायी कर (मिनीमम अल्टरनेट टॅक्स अर्थात मॅट) न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना एप्रिल 2015 पासून हा कर द्यावा लागणार नाही.
कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने 'मॅट' लागू करण्याबाबतचा आपला अंतिम अहवाल जुलैमध्ये सादर केला होता. त्यांच्या या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत.
शहा समितीनुसार परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीवर मॅट लागू करण्यास कोणताही वैधानिक आधार नाही. या शिफारसी स्वीकारल्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) लवकरच तशी सूचना जारी करणार आहे. सीबीडीटीच्या नोटिसीनंतर विविध कोर्टांत सुरू असलेल्या मॅट केसेस रद्दबातल ठरवण्यात येतील.
कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने 'मॅट' लागू करण्याबाबतचा आपला अंतिम अहवाल जुलैमध्ये सादर केला होता. त्यांच्या या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत.
शहा समितीनुसार परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीवर मॅट लागू करण्यास कोणताही वैधानिक आधार नाही. या शिफारसी स्वीकारल्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) लवकरच तशी सूचना जारी करणार आहे. सीबीडीटीच्या नोटिसीनंतर विविध कोर्टांत सुरू असलेल्या मॅट केसेस रद्दबातल ठरवण्यात येतील.
- योगा:-
योग या क्रीडा प्रकाराला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या प्राधान्य खेळांमध्ये स्थान दिले आहे. मंत्रालयाने आर्थिक साहाय्याकरिता विविध खेळांच्या मान्यतेबाबत आढावा घेतला. तर तलवारबाजी या खेळास सर्वसाधारण क्रीडा प्रकारांमध्ये स्थान दिले
जागतीक अॅयथलेटिक्स स्पर्धा:-
पेइचिंग (चीन) येथे झालेलेया में जागतीक अॅमथलेटिक्स स्पर्धात केनिया संघाला प्रथम स्थान मिळाले 30ऑगस्ट 2015 रोजी या स्पर्धा संपल्याची घोषणा करण्यात आली
जागतीक अॅ थलेटिक्स स्पर्धत पदतालीकेत ने\केनियाने ७ स्वर्णपद , ६ रौप्य व 3 कांस्य अशे १६ पदकासह प्रथम स्थान पटकावले तर जमैका ने ७ स्वर्ण, 2 रौप्य व 3 कांस्य पदक मिळवून दूसरे स्थान प्राप्त केले तर अमेरिकासंघाने 6 स्वर्ण, 6 रौप्य आणी 6 कांस्य पदक मिळवून तीसरे स्थान मिळवले तर यजमान चीन संघाने’ या स्पर्धेत 1 स्वर्ण, 7 रौप्य आणी 1 कांस्य पदक मिळवून ११वे स्थान पटकावले या स्पर्थेत भारताला एकही पदक मिळवता आले नाही जागतिक अॅकथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबास्टियन कोए यांनी 2017 मधील स्पर्धा लंडन (ब्रिटेन) येथे होणार असल्याची घोषणा केली
- चर्चेतील खेळाडू
चेतेश्वर पुजारा:-
- श्रीलेकेविरुद्ध च्या तिसर्या क्रिकेट कसोटीत टीम इंडीयाचा सलामीवीर चेतेश्वर पुजारा १४५ धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला
- अशी कामगिरी करणारा तो ४था भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी अशी कामगिरी सुनील गावस्कर,वीरेद्र सेहवाग व राहुल द्रविड यांनी केली होती
ओ.पी. जैशा
- जागतिक मैदानी स्पर्धत महिलांच्या मॅरेथॉनमध्ये भारताच्या ओ.पी. जैशा १९व्या क्रमांकावर राहिली
- जैशाने २ तास ३४ मिनिटे व ४३ सेकंद वेळ नोंदवीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
- या आधीचा विक्रमही जैशाच्या नावावर होता. तिने मुंबई मॅरेथॉनमध्ये २ तास ३७ मिनिटे आणि २९ सेकंद अशी वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. सुधाने २ तास ३५ मिनिटे व ३५ सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविली.
- या मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या मेअर दिबाबाने सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेतील तिचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. दिबाबाने २ तास २७ मिनिटे आणि ३५ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. त्यापाठोपाठ केनियाच्या हेला किप्रोपने (२ तास २७ मि. व ३६ से.) रौप्य आणि बहारिनच्या युनाइस किर्वाने ब्राँझपदक मिळविले.
टिंटू लुका:
- भारताच्या टिंटू लुकाला जागतिक मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले, परंतु तिने ऑलिम्पिकमधील प्रवेश मात्र निश्चित केला.
- २६ वर्षीय लुकाने ही शर्यत २ मिनिटे ०.९५ सेकंदांत पार करीत पहिल्या प्राथमिक फेरीत सातवे स्थान मिळवले. प्रत्येक प्राथमिक फेरीतील पहिले तीन खेळाडूच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
- आशियाई विजेती व राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी खेळाडू लुकाची १ मिनिट ५९.१७ सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. तिला ही वेळ नोंदविता आली नाही. मात्र, २ मिनिटे १ सेकंद या ऑलिम्पिक पात्रता वेळेपेक्षा कमी वेळ नोंदवत तिने रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले.
मर्वान अट्टापटू:
- श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मर्वान अट्टापटू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- २०१४ मध्ये अट्टापट्टू यांची संघाच्या प्रशिक्षकपदी अधिकृतरित्या नियुक्ती झाली होती.
- मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याआधी 2011 पासून अट्टापटू संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते. श्रीलंकेने 16 वर्षांत प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली, तेव्हा अट्टापट्टू संघाचे हंगामी प्रशिक्षक होते..
- यंदाच्या वर्षात श्रीलंकेला एकही मालिका जिंकता आलेली नाही. यंदाच्या जूनपासून झालेल्या सहा कसोटींपैकी चार सामन्यांत श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. एकाच वर्षात मायदेशातील दोन मालिका गमवाव्या लागण्याची वेळ श्रीलंकेवर यापूर्वी 1993 मध्ये आली होती. भारताविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेमध्येही 1-0 अशा आघाडीनंतर श्रीलंकेला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. होता
- जमैकाच्या शेली अॅ न फ्रेसर प्रायस हिने जागतिक मैदानी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक स्पर्धेतील तिचे हे १०० मीटर शर्यतीतील तिसरे सुवर्णपदक आहे.
- दोन वेळा ऑलिम्पिक विजेतीचा मान पटकावणाऱ्या शेलीने १०.७६ सेकंदाची वेळ नोंदवून जमैकन उसेन बोल्टच्या पावलावर पाऊल टाकत 'सुवर्ण' धाव घेतली.
- नेदरलँडच्या डॅफने शिपरने १०.८१ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य, तर अमेरिकेच्या टोरी बॉवीने १०.८६ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले.
- शेलीने २००९ आणि २०१३ मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. दोन वर्षांपूर्वी मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर शर्यतीत बाजी मारून दुहेरी धमाका केला होता.
- प्रधानमंत्री मुद्रा योजना:
या योजने अंतर्गत खालील सुविधा उपलब्ध आहेत:-
• शिशु लोन:- रू ५०,०००/- पर्यंत
• किशोर लोन:- रू ५०,०००/- पासून रू ५ लाखापर्यंत
• तरुण लोन:- रू ५ लाखापासून ते १० लाखापर्यंत
कर्जाची वैशिष्ट्ये:-
१) तारण नाही
२) कमी व्याजदर
३) मुद्रा कार्डद्वारा खेळते भांडवल कर्ज
४) योग्य असा परतफेडीचा कालावधी
२) कमी व्याजदर
३) मुद्रा कार्डद्वारा खेळते भांडवल कर्ज
४) योग्य असा परतफेडीचा कालावधी
मुद्रा कार्डची वैशिष्ट्ये:-
१) सर्व बंकाच्या शाखांमध्येउपलब्ध
२) युनिटच्या खेळत्या भांडवलाची गरज पुर्ण कर्ते
३) “ RuPay ‘ Debit Card प्रमाणे वितरण
४) विनासयास व लवचिक
२) युनिटच्या खेळत्या भांडवलाची गरज पुर्ण कर्ते
३) “ RuPay ‘ Debit Card प्रमाणे वितरण
४) विनासयास व लवचिक
- थोडक्यात महत्वाचे :
- केंद्र सरकारकडूने निवृत्त सैनिकांसाठीच्या एक श्रेणी एक वेतन (ओआरओपी) ही बहुप्रतिक्षित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला ही योजना केंद्र सरकार १ जुलै २०१४ पासून लागू करत असल्याचे जाहीर केले.
- " टू द ब्रिंक अॅड बँक:- इंडीयाज १९९१ स्टोरी " हे आत्ताच प्रकाशित झालेले पुस्तक जयराम रमेश यांनी लिहीले आहे .
- आकाश चोप्रा यांनी " द इनसायडर " हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहीले आहे?:-
- भारत पाकिस्तानदरम्यान 1965 मधील युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने - ५ रुपयाचे नवे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला .
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ १२५ व १० रुपयाचं नवं नाण्यांचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले :
- योगा या क्रीडा प्रकाराला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या प्राधान्य खेळांमध्ये स्थान दिले .
- भारतीय वंशाच्या अमेरिकन आणि पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी निवड करण्यात आली: (पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे.)
- ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला ------------------यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला :-माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (व्हिलर द्विपचे नाव अब्दुल कलाम द्विप असे असेल)
- देशात ई-चलन सर्वप्रथम ------------- येथील पोलिसांनी सुरू केले होते:- बंगळुरू
- सकल देशातर्गत उत्पादनाचा अर्थात जीडीपी च्या तुलनेत प्रत्येक देशावर किती टक्के कर्ज आहे याचा आढावा फोर्ब्स मासिकाने घेतला असून त्यात अशा कर्जबाजरी देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो :-३५ वा
- बीजिग येथे संपन्न झालेलेया १५ व्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या संघाने सर्वाधीक पदके जिंकली:- केनिया
- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना देण्यात येणारे कागदी चालान आता इतिहासजमा होणार असून त्याऐवजी 'ई-चलन' प्रणाली अस्तित्वात आली. ------------- येथील पोलिसांनी त्यांची सुरुवात केली. राज्यातील या पहिल्या ई-चलन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले:- नागपूर ग्रामीण
- युएफा अर्थात युरोपियन फुटबॉल संघटना युनियनतर्फे देण्यात येणाऱ्या २०१४-१५ वर्षांसाठीचा सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी -----------ची निवड करण्यात आली:-लिओनेल मेस्सी
- भारतीय महिला हॉकी संघ हा २०१६ साली होणा-या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला . ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा भारताचा हा----------महिला हॉकी संघ आहे.:- दुसरा
- कृषी, सेवा आणि उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रांची कामगिरी खराब झाल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील विकासदर ----------टक्के इतका राहिला. :- सात
- दहशतवादी कारवाया आणि देशद्रोह याबाबतचे गुन्हे वगळता इतर गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येऊ नये, अशी महत्त्वपूर्ण शिफारस कायदा आयोगाने केली या आयोगाचे अध्यक्ष---------------हे आहेत :- न्या. ए. पी. शाह
- भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळविल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेचे नामकरण "----------------‘ असे करण्यात आले?:-दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज
- ----------- देशांने एचआयव्हीग्रस्त पर्यटकांबाबत दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले. एचआयव्हीग्रस्त पर्यटकांना देशात प्रवेश देणार परंतु, तीन महिन्यांच्यापुढे वास्तव्य करता येणार नाही.:- सिंगापूर (सिंगापूर सरकारने सन 1980 पासून बंदी घातली होती)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा