Post views: counter

चलन विषयक काही महत्वाचे

चलन

  1. १ रुपयाच्या नोटा नाणे त्या पेक्षा कमी मुल्याची नाणे छापण्याचे व उत्तरदायित्व भारतीय अर्थ खात्याचे आहे.
  2. १ रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव केंद्रीय अर्थ खाते यांची सही असते.
  3. २ रुपये व त्यापेक्षा किंमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार RBI चा आहे.
  4. १ रुपयाच्या नाण्यासाठी शुध्द निकेल हा धातु वापरला जातो.
भारत सरकारच्या चार टाकसाळ आहेत.
  1. मुंबई (१८३०)
  2. कोलकाता (१९३०)
  3. हैद्राबाद (१९५०)
  4. नोएडा (१९८९)

केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या आणि आयोग:


  1. भूषण गगराणी समिती- महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
  2. डॉ. नरेंद्र जाधव समिती-  विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी
  3. राम प्रधान समिती-  २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
  4. माधवराव चितळे समिती-  मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
  5. न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेबआंबेडकर
    यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी
  6. बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती- जमातीच्या कल्याणाकरिता

Current Affairs March 2015 Part- 3

चालू घडामोडी:-मार्च २०१५
 
Current Affairs
  • राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये २०११  मध्ये सुरू केलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच "एक प्रभाग-एक नगरसेवक‘ ही पद्धत सुरू करणारे विधेयक विधानसभेत कधी  मंजूर करण्यात आले?
    == १९ मार्च २०१५
  • फॉर्म्युला वनमधील माजी विश्वविजेता असलेल्या कोणत्या खेळाडूचा  मुलगा याच्या मोटारीला अपघात झाल्यामुळे  जखमी झाला आहे?
    == मायकल शूमाकर- मुलगा मिक शुमाकर
  • दक्षिण मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर परिसराचे अर्थात चौपाटीचे कोणते नवीन नामकरण करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षप्रणित राज्य सरकारने केली आहे?
    == स्वराज्य भूमी
  • बहुचर्चित स्थानिक संस्था कर (एलबीटी) कधीपासून रद्द होणार आहे?
    == ०१ ऑगस्ट २०१५

स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सुचना..
  1. स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करु नका तर तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवा. प्रत्येक गोष्टीत अभ्यास शोधा तरच तुमच्यामध्ये भावी अधिकारी होण्याचे गुण तयार होतील.
  2. अनेक जण फक्त पाठांतरावर जास्त जोर देतात. आणि आपली बौद्धिक पातळी वाढवतात परंतू परिस्थितीला समजून घेण्याची क्षमता वाढवत नाहीत.घोकंपट्टीकरण्याऐवजीसमजून उमजून लक्षात ठेवण्यावर भर द्या.

वर्ग संख्या ट्रिक्स

  • 41 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग : 
41 चा वर्ग = 16  81
42 चा वर्ग = 17  64
43 चा वर्ग = 18  49
44 चा वर्ग = 19  36
45 चा वर्ग = 20  25
46 चा वर्ग = 21  16
47 चा वर्ग = 22  09
48 चा वर्ग = 23  04
49 चा वर्ग = 24  01
50 चा वर्ग = 25  00

वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या
16,17,18,19,20,21,22,23,24,25  अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे, ती पहा. त्याचबरोबर
81,64,49,36,25,16,09,04,01,00 अशी उतरत्या क्रमाची 9,8,7,6,5,4,3,2,1,0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.