इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा
तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो. कालानुक्रमाची जंत्री पाठ
करण्यापेक्षा अधिक स्वारस्यपूर्ण असं बरंच काही या विषयात आहे, हे लक्षात
घ्यायला हवं.
प्रशासनात काम करताना अधिकारी हे कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्या-तोटय़ाच्या तराजूपेक्षा जनतेच्या 'कल्याणा'चे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 'इतिहास' हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. 'इतिहासा'च्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा स्वारस्यपूर्ण अशा अनेक गोष्टी या विषयात आहे, हे लक्षात येईल. 'इतिहास' हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.
मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. हा पूर्ण भाग पूर्वपरीक्षेतही असल्याने एकत्रितपणे अभ्यास वेळेच्या बचतीसाठी आवश्यक आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती आपण पूर्वपरीक्षेच्या विभागात सविस्तरपणे पाहिली आहे. आधुनिक इतिहासाच्या तयारीसाठीची पद्धत या प्रकारामध्ये पाहू या.