लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भूगोल हा महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. भूगोलाचा
अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात
घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या उपघटकांवर प्राधान्याने अभ्यास
करणे सूज्ञपणाचे ठरते.
नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेसाठी भूगोलाची परिणामकारक तयारी कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील भारत व जगाचा भूगोल या अभ्यासघटकाचे प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय अशा उपघटकांमध्ये वर्गीकरण करता येईल. इतिहासाप्रमाणे भूगोलाची व्याप्ती मोठी आहे. या विषयाचे स्वरूप semi-scientific असल्याने यातील संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे श्रेयस्कर ठरते. कारण परीक्षेत येणाऱ्या विश्लेषणात्मक स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संकल्पनांचा जास्तीत जास्त आधार घेतला जातो.