Post views: counter

इतिहास घटकविषयाचा तार्किक अभ्यास

                                   इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो. कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा अधिक स्वारस्यपूर्ण असं बरंच काही या विषयात आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

                                   प्रशासनात काम करताना अधिकारी हे कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्या-तोटय़ाच्या तराजूपेक्षा जनतेच्या 'कल्याणा'चे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 'इतिहास' हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. 'इतिहासा'च्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा  स्वारस्यपूर्ण अशा अनेक गोष्टी या विषयात आहे, हे लक्षात येईल. 'इतिहास' हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.
                                  मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. हा पूर्ण भाग पूर्वपरीक्षेतही असल्याने एकत्रितपणे अभ्यास वेळेच्या बचतीसाठी आवश्यक आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती आपण पूर्वपरीक्षेच्या विभागात सविस्तरपणे पाहिली आहे. आधुनिक इतिहासाच्या तयारीसाठीची पद्धत या प्रकारामध्ये पाहू या.

भारत व जगाचा भूगोल

                             लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भूगोल हा महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. भूगोलाचा अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या उपघटकांवर प्राधान्याने अभ्यास करणे सूज्ञपणाचे ठरते.

                           नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेसाठी भूगोलाची परिणामकारक तयारी कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील भारत व जगाचा भूगोल या अभ्यासघटकाचे प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय अशा उपघटकांमध्ये वर्गीकरण करता येईल. इतिहासाप्रमाणे भूगोलाची व्याप्ती मोठी आहे. या विषयाचे स्वरूप semi-scientific असल्याने यातील संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे श्रेयस्कर ठरते. कारण परीक्षेत येणाऱ्या विश्लेषणात्मक स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संकल्पनांचा जास्तीत जास्त आधार घेतला जातो.

महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे

                            महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे

______________________________
     शिखर.                       उंची
______________________________
०१) कळसुबाई------------१६४६ मी
०२) साल्हेर----------------१५६७ मी
०३) महाबळेश्वर-----------१४३८ मी
०४) हरिश्चंद्र---------------१४२४ मी
०५) सप्तश्रुंगी-------------१४१६ मी
०६) तोरणा----------------१४०४,मी 
०७) अस्तंभा--------------१३२५ मी
०८) त्र्यंबकेश्वर------------१३०४,मी
०९) तौला-----------------१२३१ मी
१०) वैराट-----------------११७७ मी

स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे

 ● स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे ●

१) सुभाषचंद्र बोस ------------------------ नेताजी
२) रविंद्रनाथ टागोर ---------------------- गुरुदेव
३) पंडित जवाहरलाल नेहरू ------------ चाचा
४) मोहनदास करमचंद गांधी ----------- राष्ट्रपिता
५) मोहनदास करमचंद गांधी ----------- महात्मा
६) महात्मा गांधी ------------------------- बापू
७) खान अब्दुल गफार खान -------------सरहद्द गांधी
८) खान अब्दुल गफार खान ------------ बादशहाखान
९) विनोबा भावे ------------------------- आचार्य
१०) जे. बी. कृपलानी -------------------- आचार्य
११) बाळ गंगाधर टिळक --------------- लोकमान्य
१२) चक्रवर्ती राजगोपालाचारी ---------- राजाजी
१३) वल्लभभाई पटेल ------------------- सरदार

भारताचा विशेषत महाराष्ट्राचा भूगोल


                         ज्या सुजलाम सुफलाम भारतभूमीवर आपण वास्तव्य करतो. त्याबद्दल प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक काळात भारत देश हा भारत. आर्यवर्त आणि हिंदुस्थान (सोने की चिडिया) या विविध नावांनी ओळखला जात असे. प्राचीन काळातील पराक्रमी राजा भरत यावरून ‘भारत’ तर आर्यवंशीय लोकांच्या भूमीवरून ‘आर्यावर्त’ आणि ‘सिंधुनदीमुळे’ हिंदुस्थान अशा नावांचा उल्लेख केला जात असे. युरोपियन लोकांनी या देशाला मूळ शब्द ‘सिंधू’पासून तयार झालेल्या ‘इंडिया’ असा उल्लेख करण्यास सुरुवात केली.

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल:
  1. • विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
  2. • पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
  3. • आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
  4. • शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.
  5. • पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.