Post views: counter

Current Affairs july 2015 part - 1


eMPSCkatta
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2015:

  • स्पर्धचे ठिकाण: कॅनडा
  • विजेता: अमेरिका
  • उपविजेता: जपान
  • सर्वोत्तम खेळाडू (गोल्डन बाँल): कार्ली लॉइड
सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे.
विश्वचषक इतिहासात अंतिम फेरीत हॅट्ट्रिक नोंदविणारी कार्ली लॉइड ही पहिली महिला खेळाडू ठरली.कार्ली ने पहिल्या १६ मिनीटातच ३ गोल केले. 
अमेरिकेने १९९१ आणि १९९९ नंतर प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. याचबरोबरच सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे. त्यापाठोपाठ दोन जेतेपदे पटकावणाऱ्या जर्मनी संघाचा क्रमांक येतो.
गतविजेते: 
  1. १९९१:- अमेरिका
  2. १९९५:- नार्वे
  3. १९९९:- अमेरिका
  4. २००३:-जर्मनी

Current Affairs July 2015 Part - 2

eMPSCktta


इस्रो व ऍट्रिक्‍सने अवकाशात यशस्वीपणे सोडले पाच व्यापारी उपग्रह :


  • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि तिचा व्यापारी विभाग असलेल्या ऍट्रिक्‍सने आज एकूण 1,440 किलो वजनाचे पाच व्यापारी उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले.
  •  पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रथमच इतक्‍या मोठ्या वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
  • भारताची आतापर्यंतची ही सर्वांत अवजड व्यापारी मोहीम होती.
  •  तसेच या वर्षातील ही पहिलीच व्यापारी मोहीम असून या मोहिमेचा कार्यकाळ 7 वर्षे असेल.
  •  "पीएसएलव्ही"चे सुधारित व्हर्जन असलेल्या "पीएसएलव्ही-एक्‍सएल" या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ब्रिटनच्या या पाचही उपग्रहांना त्यांच्या कक्षेत सोडले.
  •  "पीएसएलव्ही-एक्‍सएल" हे चार टप्पे असलेले रॉकेट असून, सुरवातीच्या टप्प्यांमध्ये वेग मिळविण्याकरत अतिरिक्त सहा मोटर्स बसविण्यात आल्या आहेत.
  •  पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात घन इंधनाचा वापर केला असून, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात द्रवरूप इंधनाचा वापर केला आहे.
  •  प्रक्षेपणापासून ते पाचवा उपग्रह अवकाशात सोडण्याचा कालावधी 19 मिनिटे 16 सेकंद इतका असणार आहे.
Post views: counter

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज


                          राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक ! चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू
महाराज , ( जून २६ , इ.स. १८७४ - मे ६ , इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
                           राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

महत्वाच्या नियुक्त्या

महत्वाच्या नियुक्त्या
  • विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजीप्रमुख के. व्ही. चौधरी हे नवे सीव्हीसी तर विजय शर्मा हे मुख्य माहिती आयुक्त असतील.
  • एक आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रमोदी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या समितीने या नावांनामंजुरी दिली होती.
  • चौधरी यांची सीव्हीसीपदी झालेलीनियुक्ती ही परंपरेला छेद देणारी आहे.आजवर आयएएस अधिकाऱ्यांचीच या पदी नियुक्ती होत आली आहे.

भारतातील आणीबाणी

                         देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा करत भारतात 40 वर्षांपूर्वी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आज आणीबाणीच्या अंधारयुगाला 40 वर्षे पूर्ण होत आहेत... त्यानिमित्ताने आणीबाणीचा हा थोडक्यात आढावा :
 
  • आणीबाणीची घोषणा
                          आजपासून बरोबर 40 वर्षांपूर्वी 25 जूनच्या मध्यरात्रीनंतर आणि 26 जूनच्या पहाटे पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. 26 जूनच्या सकाळी आठ वाजता देशाला उद्देशून आकाशवाणीवरून भाषण करताना त्या म्हणाल्या की, देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्थैर्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणले गेले आहे. लोकांची माथी भडकावली जात आहेत आणि कायदा, सुव्यवस्था व शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सरकारला काही कठोर पावले उचलणे भाग पडले आहे. ते कठोर पाऊल म्हणजेच आणीबाणी.
26 जून 1975 रोजी सकाळी 8 वाजता इंदिरा गांधींनी आकाशवाणीवरुन देशवासीयांना उद्देशून म्हटलं :
"भाईयों और बहनों, राष्ट्रपती जी ने आपातकाल की घोषणा की है.. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं"- इंदिरा गांधी