जगाच्या लोकसंख्येपकी एकूण १६ टक्के लोक भारतात राहतात व भारताच्या
लोकसंख्येचा भाग हा युवा गटात मोडतो. या दृष्टीने भारताची लोकसंख्या ही
समस्या नसून तिच्याकडे 'डेमोग्राफिक डिव्हिडंड' म्हणून पाहण्याचा कल वाढत
आहे. या लोकसंख्येचा लाभ देशाच्या विकासाकरता व्हावा याकरता या लोकसंख्येचे
कुशल मनुष्यबळामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. या दृष्टीने मनुष्यबळ विकास
ही देशाच्या प्रगतीसाठी मूलभूत गरज ठरते. या लेखामध्ये 'मानवी संसाधन
विकास' घटकाच्या अभ्यासाची चर्चा करूयात.
या घटकातील मूळ संकल्पना आहे मनुष्यबळाचा विकास. मनुष्यबळाची कल्पना आधी समजून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने 'उत्पादक व कुशल मनुष्यबळ' ही संकल्पना लक्षात घ्यावी. 'कार्यकारी' लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. यासाठी आधी लोकसंख्येची वैशिष्टय़े समजून घ्यायला हवीत. जनगणना २०११ अहवालाचा अभ्यास