Post views: counter

Current Affairs july 2015 Part-5

  • 'मलाला युसुफझाईने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासित मुलींसाठी केली शाळा सुरू : 
नोबेल पुरस्कार मिळवणारी जगातील सर्वांत लहान वयाची व्यक्ती ठरलेल्या मलाला युसुफझाई हिने आपला अठरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.हा वाढदिवस तिने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासितांबरोबर साजरा करत तेथील मुलींसाठी शाळा सुरू केली आहे.द मलाला फंड या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शाळा सीरियाच्या सीमेनजीक असलेल्या लेबनॉनमधील निर्वासितांच्या छावणीत सुरू झाली आहे. या शाळेचा सर्व खर्च मलालानेच सुरू केलेल्या द मलाला फंड उचलणार आहे.तसेच या शाळेमध्ये 14 ते 18 या वयोगटातील दोनशे मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.

  • क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी :
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 20 जुलै रोजी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.
 या नव्या इंजिनमुळे जागतिक व्यावसायिक स्पर्धेत उतरलेल्या इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे.

Curent Affairs july 2015 Part- 4

  • भारत, पाकिस्तानला ‘एससीओ’चे सदस्यत्व

भारत आणि पाकिस्तानने शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (एससीओ) सहभागी होण्यास रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दिली आहे.पश्चिमेकडील देशांच्या आघाडीप्रमाणेच ‘एससीओ’चेही महत्त्व असून, त्यावर रशिया आणि चीनचे अधिपत्य आहे. ‘एससीओ’तील सदस्यत्वामुळे भारताला मध्य आशियातील ऊर्जास्रोतांचा लाभ होणार आहे.आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानाला ‘एससीओ’च्यानिरीक्षकांचा दर्जा प्राप्त होता.दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेसाठी भारताचेपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियामध्ये आहेत.
शांघाय सहकार्य परिषद
स्थापना : २६ एप्रिल १९९६
संस्थापक सदस्य : चीन, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताझिकिस्तान उझबेकिस्तान १५ जून २००१ पासून सदस्य.
उद्देश : मध्य आशियामध्ये संरक्षणासाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे.
  • विंबल्डन स्पर्धा आणि भारत :


भारतीयांसाठी यंदाची विंबल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली आहे.महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस  यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
 रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत ऍलेक्‍झांडर पेया (ऑस्ट्रिया) आणि टिमेआ बाबोस (हंगेरी) यांचा 6-1, 6-1 असा चाळीस मिनिटांत पराभव केला आहे.
 हिंगीसला या स्पर्धेत दुसरे विजेतेपद मिळाले. तर तिने शनिवारी भारताच्याच सानिया मिर्झाच्या साथीत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. पेस आणि हिंगीस जोडीचे हे मोसमातील दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
 त्यांनी या वर्षी ऑस्ट्रेलिया स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे. तसेच पेसचे हे सोळावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
 यामध्ये पुरुष दुहेरीत त्याने ऑस्ट्रेलिया (2012), फ्रेंच

अनुसूचीत जाती व जमाती कायदा : 1989

अनुसूचीत जाती व जमाती कायदा : 1989

अनुसूचित जाती व जमाती (कायदा 1989 ) - (भाग 1) (अत्याचार प्रतिबंधक)
या कायद्यात एकूण कलमे 23 आहेत
  • कायदा - 1989
                      युनोने मानवी हक्क जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळून चार दशके झाल्यावर आपल्याला अनुसूचित जाती- जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 आपल्या देशबांधवांसाठी करावा लागला या कायद्यान्वये त्यांना त्यांच्याविरुद्ध होणारे गुन्हे, अपमान,छळ आणि बदनामी यापासून संरक्षण मिळाले, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेल्या सर्वांना न्याय आणि आत्मसन्मान या संकल्पने बाबतीत आपण अपयशी ठरलो.
  • उद्दिष्टे -
अनुसूचीत जाती आणि जमतीतील व्यक्तींवर होणारे अत्याचार व त्यांच्याविरुद्ध होणारे गुन्हे थांबविणे. अशा गुन्ह्यांसाठी विशिष्ट न्यायालयांची तरतूद करणे. अशा गुन्ह्यांना बळी पडलेलयांना मदत देने व त्यांचे पुनर्वसन करणे.
  • भाग - 1  प्रारंभिक
1) या कायद्याला अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 असे संबोधण्यात येईल .
2) याचा विस्तार जम्मू-काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर असेल.
Post views: counter

CSAT : उता-याचे आकलन आणि त्यावरील प्रश्न

मागील लेखात आपण यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅटच्या पेपरचे बदललेले स्वरूप व त्याचे परिणाम लक्षात घेतले. या आणि पुढील काही लेखांमधून आपण सीसॅटच्या संदर्भातील विविध विषयांच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅटच्या घटकामध्ये उताऱ्यावर आधारित प्रश्नांची संख्या बरीच मोठी आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांतील विविध घडामोडींमुळे उताऱ्यांची व त्यावरील प्रश्नांची संख्या सुरुवातीच्या वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. एकूण ८० प्रश्न असणाऱ्या या परीक्षेत साधारणत: ३ प्रश्न हे उताऱ्याच्या आकलनावर आधारित असतात. बदललेल्या स्वरूपानुसार, उतारे व उताऱ्यावर आधारित प्रश्न इंग्रजी आणि िहदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. केवळ इंग्रजी भाषेतील उताऱ्यांवर आधारित प्रश्नांचा घटक नवीन संरचनेतून बाद केला गेला आहे.

CSAT: तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी

या  लेखामध्ये आपण तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी (Logical Reasoning and Analytical Ability) या घटकाचा विचार करणार आहोत.
या घटकामध्ये संपूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित तसेच काही गणितीय संकल्पना व तर्कशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकाचे वैशिष्टय़ म्हणजे- प्रश्नप्रकारांची विविधता. अशा सर्व प्रश्नप्रकारांमधून प्रशासकीय सेवेत आवश्यक असणारी कोणती कौशल्ये तपासली जातात, हा प्रश्न काही जणांना पडू शकतो. परंतु, आपण हे लक्षात घ्यायला हवे की, या सर्व घटकांचे आणि त्यात अंतर्भूत असलेल्या कौशल्यांचे आपल्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. निर्णयप्रकियेमध्ये अशा प्रकारची तार्किक अनुमाने व परिस्थितीचे विश्लेषण करण्याची हातोटी हे कळीचे मुद्दे आहेत. या घटकांतील सर्व प्रश्न प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमेदवाराचे हे कौशल्य तपासून बघत असतात, तसेच प्रशासकीय कामांमध्ये अतिशय गरजेची असलेली वस्तुनिष्ठता