Post views: counter

स्पर्धापरीक्षांचे प्रांगण!


                               मुळात या परीक्षांचा हेतू प्रशासकीय कार्यासाठी चांगल्या लोकांची निवड करणे हा आहे. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नव्हे, ती जनतेत विखुरली असते. स्पर्धापरीक्षांद्वारे सामान्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते. अगदी प्राचीन मौर्य साम्राज्यात अशा प्रकारे परीक्षा घेऊन अधिकारी निवडत. चीनमध्ये तर शतकानुशतके अशी परीक्षा देऊन सामान्यांनी असामान्य कामगिरी केली. चीनमधील अशा प्रशासकांना 'मॅडरीन' असे म्हणतात. आपल्याकडे आपण 'नोकरशाही' (Bureaucracy) असे म्हणतो.

ओळख ‘एमपीएससी’ची


              महाराष्ट्रातील अक्षरश: लाखो विद्यार्थी आयोगाच्या परीक्षांना बसतात. त्यातील काहींना यश मिळते, तर काहींना फक्त अनुभव. असा हा अनेकांची स्वप्ने मुठीत घेऊन फिरणारा आयोग आहे तरी कसा ते बघायचा प्रयत्न आपण करू.
  • घटनात्मक अस्तित्व
नागरी सेवेतील नोकरभरतीसाठी समान संधी मिळण्याबाबतचा मुलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद १६ (१)अन्वये प्रत्येक नागरिकाला बहाल केला आहे. भारताचे नागरिक हे बहुभाषिक व विविध धर्मांचे आहेत. त्यामध्ये काही अल्पसंख्यांक तर काही मागासवर्गीय यांचादेखील समावेश आहे. अशा परिस्थितीत नागरी सेवेतील नोकर भरतीकरिता समानतेची संधी प्रत्येक नागरिकाला मिळावी आणि ही नोकरभरती राजकीय दबाव, वैयक्तिक हितसंबंध यापासून अलिप्त रहावी, तसेच नागरी सेवेत सुयोग्य उमेदवारांची गुणवत्तेवर निःपक्षपातीपणे निवड व्हावी, या उद्देशाने अनुच्छेद ३१५अन्वये राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती भारतीय घटनेने केली आहे.
  • आयोगाचे कार्य
कलम ३२०नुसार एमपीएससीकडे पुढील कार्य सोपवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकार व इतर संलग्न संस्थांसाठी नेमणुका करण्यासाठी परीक्षा घेणे, राज्य सरकारने
Post views: counter

CSAT – मूलभूत संख्याज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी

                  या लेखात आपण मूलभूत संख्याज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकामध्ये नावाप्रमाणेच मूलभूत संख्याज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी हे दोन उपघटक आहेत. तयारीला सुरुवात करण्याआधी या दोन उपघटकांतील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. मूलभूत संख्याज्ञान म्हणजे आपली संख्याची व त्यावरील केल्या जाणाऱ्या क्रियांशी असलेली ओळख. जसे की, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार इत्यादी. याचप्रमाणे वरीलपकी एकापेक्षा अधिक क्रिया करायला लागणारी पदावली दिली असल्यास कोणत्या क्रमाने क्रिया केल्या जातात हे उमेदवाराला माहीत आहे का, अशा प्रकारच्या

GS- 4 syllabus

पेपर-४मध्ये अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. अभ्यासाच्या सुविधेसाठी या पेपरच्या अभ्यासक्रमाची विभागणी कशा प्रकारे करता येईल याची चर्चा या व पुढील लेखांमध्ये करूयात. 
  • भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने- गरिबी, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन- प्रक्रिया प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनांचा आढावा व मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आíथक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण- संविधानातील ७३वी व ७४वी सुधारणा.
  • समष्टी अर्थशास्त्र: राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती- पशांचे कार्य-आधार पसा- जननक्षम पसा- पशाचा संख्या सिद्धांत- पसा गुणक, चलनवाढीचे पशाविषयक व पशाव्यतिरिक्त सिद्धांत- चलनवाढ नियंत्रण- चलनविषयक, आíथक आणि थेट उपाययोजना.

अर्थव्यवस्थेचा अभ्यास कसा करावा ?


                   अभ्यासाच्या दृष्टीने पेपर- ४ ची पारंपरिक अर्थव्यवस्था, गतिमान अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा चार भागांत विभागणी करता येईल. अर्थव्यवस्था हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना मोठमोठे आकडे व तांत्रिक संज्ञांचा वापर यामुळे अवघड वाटतो. या विषयाचे समज-गरसमज व न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने या विषयाची तयारी करण्यासाठी अभ्यासाची नेमकी पद्धत पाहू या.