Post views: counter

PSI Book List





पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर (महाराष्ट्र इतिहास शी निगडित निवडक प्रकरणे)
  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ ( निवडक प्रकारने)
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी( अभ्यासक्रमानुसार )
  4. नाकाशा वाचन- निराली प्रकाशन
  5. भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
  6. आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
  7. MS-CIT बुक
  8. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
  9. मावाधिकार- NBT प्रकाश
  10. YCMOU मानवी हक्क पुस्तके ( आपल्या टेलिग्राम चॅनेल वर पोस्ट केलेली आहेत)
  11. बुद्धिमत्ता - जी किरण
  12. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  13. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  14. विविध कायदे- जळगाव लॉ प्रकाशन
  15. मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे / जळगाव लॉ
  16. फौजदारी प्रक्रिया संहता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  17. भारतीय दंड संहिता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  18. भारतीय पुरावा कायदा- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  19. इंटरनेट वरून कायद्यांची माहिती घ्यावी
  20. चालू घडामोडी- सकाळ इयर बुक, स्पर्धा परीक्षा / परिक्रमा / eCAD मासिके , लोकराज्य, योजना मासिके, लोकराज्य योजना अंतिम सत्य 

पूर्वपरीक्षेची रणनीती....

                       परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती कशी असावी याविषयीचे कानमंत्र.
बहुतेक वेळा परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर उमेदवारांच्या लक्षात येते की, आपण अभ्यासलेले, माहीत असलेले, सोपे प्रश्न सोडवण्यात चुका केल्या आहेत. साधे-सोपे प्रश्न निसटले कसे याचे उत्तर सापडत नाही आणि हात डोक्यावर मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा चुका होतात प्रामुख्याने तीन कारणांनी. पहिले म्हणजे परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी पडतो आणि वेळेच्या ताणामुळे उत्तर चुकतो. दुसरे कारण म्हणजे  फाजील आत्मविश्वासामुळे पूर्वग्रहाला बळी पडतो आणि चुकतो आणि तिसरे कारण म्हणजे घाईघाईत प्रश्न वाचल्यामुळे चुकीचे उत्तर मार्क करतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्न गांभीर्यपूर्वक वाचावा. प्रश्न सोपा, माहीत असणारा असला, तरीही!

After State Service Pre Exam...

  •  पूर्वपरीक्षेनंतरचा 'शून्य काळ'
                                   राज्य सेवा पूर्वपरीक्षा झाली. पेपर काहींना ठीक गेला असेल, काहींना अवघड, तर काहींना बऱ्यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. असे होणे स्वाभाविक असते. पूर्वपरीक्षेनंतरचा हा 'शून्य काळ' अंदाज बांधण्यात खर्ची पडतो. तज्ज्ञ असे सुचवतात की, पूर्वपरीक्षेसाठी झोकून अभ्यास केला असेल तर पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी दोन दिवसांचा आराम या शून्य काळात जरूर करावा. उत्तरे चूक की बरोबर हे शोधण्यात वेळ घालवू नका, असे कितीदा लिहिले-वाचले आणि ते पटले तरीही आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे; पण एकदा पेपर संपला की, आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की उत्तीर्ण होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना आपण

MPSC Pre : World Geography Europ

जगाचा भूगोल : युरोप खंड

युरोपे

                       राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा महिना जसाजसा जवळ येईल तसतसे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थीच्या मनावर ताण वाढण्यास सुरुवात होते. जे विद्यार्थी सलग तीन ते चार वर्षांपासून या परीक्षांसाठी तयारी करत आहेत,मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना यश मिळाले नाही,अशा विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण अधिक असते. पण हे लक्षात ठेवा की,तणावग्रस्त परिस्थितीत केलेले सोपे कामदेखील यशस्वी होत नाही. योग्य नियोजन,योग्य संदर्भसाहित्याचा वापर आणि वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास या परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप १८० अंशात बदलला आहे,याची दखल विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात घ्यावी.या परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार भूगोल या घटकात जागतिक भूगोलाचा अभ्यास समाविष्ट केलेला आहे. 

Yojana Magazine 2013 In Marathi

Yojana Magazine 2013
योजना मासिक २०१३






1.
January 2013
2.
February 2013
3.
March 2013
4.
April 2013
5.
May 2013
6.
June 2013
7.
July 2013
8.
August 2013
9.
September 2013
10.
October 201
11.
November 2013
12.
            December 2013