Post views: counter

CSAT : उता-याचे आकलन आणि त्यावरील प्रश्न

मागील लेखात आपण यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅटच्या पेपरचे बदललेले स्वरूप व त्याचे परिणाम लक्षात घेतले. या आणि पुढील काही लेखांमधून आपण सीसॅटच्या संदर्भातील विविध विषयांच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅटच्या घटकामध्ये उताऱ्यावर आधारित प्रश्नांची संख्या बरीच मोठी आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांतील विविध घडामोडींमुळे उताऱ्यांची व त्यावरील प्रश्नांची संख्या सुरुवातीच्या वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. एकूण ८० प्रश्न असणाऱ्या या परीक्षेत साधारणत: ३ प्रश्न हे उताऱ्याच्या आकलनावर आधारित असतात. बदललेल्या स्वरूपानुसार, उतारे व उताऱ्यावर आधारित प्रश्न इंग्रजी आणि िहदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. केवळ इंग्रजी भाषेतील उताऱ्यांवर आधारित प्रश्नांचा घटक नवीन संरचनेतून बाद केला गेला आहे.

CSAT: तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी

या  लेखामध्ये आपण तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी (Logical Reasoning and Analytical Ability) या घटकाचा विचार करणार आहोत.
या घटकामध्ये संपूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित तसेच काही गणितीय संकल्पना व तर्कशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकाचे वैशिष्टय़ म्हणजे- प्रश्नप्रकारांची विविधता. अशा सर्व प्रश्नप्रकारांमधून प्रशासकीय सेवेत आवश्यक असणारी कोणती कौशल्ये तपासली जातात, हा प्रश्न काही जणांना पडू शकतो. परंतु, आपण हे लक्षात घ्यायला हवे की, या सर्व घटकांचे आणि त्यात अंतर्भूत असलेल्या कौशल्यांचे आपल्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. निर्णयप्रकियेमध्ये अशा प्रकारची तार्किक अनुमाने व परिस्थितीचे विश्लेषण करण्याची हातोटी हे कळीचे मुद्दे आहेत. या घटकांतील सर्व प्रश्न प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमेदवाराचे हे कौशल्य तपासून बघत असतात, तसेच प्रशासकीय कामांमध्ये अतिशय गरजेची असलेली वस्तुनिष्ठता

मानवी संसाधन विकास : आरोग्य व शिक्षण

                       जगाच्या लोकसंख्येपकी एकूण १६ टक्के लोक भारतात राहतात व भारताच्या लोकसंख्येचा भाग हा युवा गटात मोडतो. या दृष्टीने भारताची लोकसंख्या ही समस्या नसून तिच्याकडे 'डेमोग्राफिक डिव्हिडंड'  म्हणून पाहण्याचा कल वाढत आहे. या लोकसंख्येचा लाभ देशाच्या विकासाकरता व्हावा याकरता या लोकसंख्येचे कुशल मनुष्यबळामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. या दृष्टीने मनुष्यबळ विकास ही देशाच्या प्रगतीसाठी मूलभूत गरज ठरते. या लेखामध्ये 'मानवी संसाधन विकास' घटकाच्या अभ्यासाची चर्चा करूयात.

                        या घटकातील मूळ संकल्पना आहे मनुष्यबळाचा विकास. मनुष्यबळाची कल्पना आधी समजून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने 'उत्पादक व कुशल मनुष्यबळ' ही संकल्पना लक्षात घ्यावी. 'कार्यकारी' लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. यासाठी आधी लोकसंख्येची वैशिष्टय़े समजून घ्यायला हवीत. जनगणना २०११ अहवालाचा अभ्यास

मानवी संसाधन विकास: व्यावसायिक शिक्षण व ग्रामीण विकास

मानवी संसाधन विकास या विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करताना व्यावसायिक शिक्षण आणि ग्रामीण विकास या घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्याविषयी..
                     पारंपरिक व पायाभूत शिक्षण हे मूल्य, नितीतत्त्वाची जोपासना व मानवी हक्कांची अंमलबजावणी याकरता महत्त्वाचे माध्यम आहे. या प्राथमिक व पायाभूत शिक्षणाची पुढची पायरी म्हणून पारंपरिक महाविद्यालयीन/ तांत्रिक/ वैद्यकीय/ व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग खुला होतो. या बाबी लक्षात घेऊन व्यावसायिक शिक्षण या अभ्यासघटकाचा विचार करायला हवा. त्याचबरोबर ग्रामीण विकासाची मनुष्यबळ विकासातील भूमिका लक्षात घेत अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल याची चर्चा या
लेखामध्ये करूयात.
Post views: counter

How To Train Your Mind For Mental Stress During Exam?

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

                                    पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.
                                   सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल. परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल