Post views: counter

राष्ट्रीय पुरस्कार 2016

  • बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट तर बिग बी सर्वोत्कृष्ट अभिनेता
सर्वोच्च मानाचे समजले जाणा-या ६३व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून आबालवृद्धांना भुरळ घालणा-या 'बाहुबली' चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि बॉलवूडची 'क्वीन' कंगना राणeवतला दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
राष्ट्रीय पुरस्कार यादी :
वडील व मुलीदरम्यानचे नाते सांगणा-या 'पिकू' चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र अर्थीक पाहणी अहवाल २०१५-१६

आर्थिक पाहणी अहवाल २०१५- १६
कृषी व सलग्न क्षेत्राच्या उत्पादनात २.७ % घट होऊंनही राज्याचा आर्थिक विकास दर ८% राहिल्याचे राज्य सरकारने २०१५- १६च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे .
आर्थिक पाहणी चे निष्कर्ष :-
  •  ३,३३,१६० कोटींचे कर्ज,
  •  दरडोई २९,६४० रुपये कर्ज
  •  दरडोई उत्प्पन्न :- १३४०८७ रु
  •  विकास दर ८%, दरडोई उत्पन्नात ७ टक्के वाढ
  • महसुली तुट ३हजार ७५७ कोटी रु.
  • राज्यातील निर्यातील घट

ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार (८८ वा ) २०१६

  •  ‘८८ व्या यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘द रिव्हनंट’, ‘स्पॉटलाईट’ आणि ‘मॅड मॅक्स फ्युरी रोड’ या चित्रपटांनी बाजी मारली. ‘
  • स्पॉटलाईट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला. तर याच चित्रपटासाठी जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा सन्मान मिळाला.
  • सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओ’ला ‘द रिव्हनंट’ मधील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अभिनेत्री ब्री लार्सनला ‘रुम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

अर्थसंकल्प 2016 17

अर्थसंकल्प 2016-17 ठळक घडामोडी   


महाग  - कार, सोने, तंबाखू, सिगरेट, गुटखा, हिरे, ब्रँडेड कपडे
बजेट थोडक्यात -
१.कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भरघोस तरतूद.
२.रस्ते, रेल्वे सारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्य.
३.कररचना जैसे थे.
४.श्रीमंतांवर वाढीव कर

कररचना
*उत्पन्न - अडीचलाखापर्यंत - कोणताही उत्पन्न कर नाही 
*अडीच लाख ते 5 लाख - 10 % + तीन हजारांची अतिरिक्त सूट
*5 लाख ते 10 % - 20% 
*दहा लाखांपेक्षा अधिक - 30 %

RTE Act 2009

Right To Education Act 2009
RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
  1. कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
  2. कलम क्रमांक २ = व्याख्या.
  3. कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
  4. कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
  5. कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
  6. कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
  7. कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
  8. कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
  9. कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.