- 'मलाला युसुफझाईने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासित मुलींसाठी केली शाळा सुरू :
नोबेल पुरस्कार मिळवणारी जगातील सर्वांत लहान वयाची व्यक्ती ठरलेल्या मलाला
युसुफझाई हिने आपला अठरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.हा वाढदिवस तिने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासितांबरोबर साजरा करत तेथील मुलींसाठी शाळा सुरू केली आहे.द मलाला फंड या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शाळा सीरियाच्या सीमेनजीक असलेल्या लेबनॉनमधील निर्वासितांच्या छावणीत सुरू झाली आहे. या शाळेचा सर्व खर्च मलालानेच सुरू केलेल्या द मलाला फंड उचलणार आहे.तसेच
या शाळेमध्ये 14 ते 18 या वयोगटातील दोनशे मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.- क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी :
भारतीय
अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 20 जुलै रोजी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात
उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली
आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.
या नव्या इंजिनमुळे जागतिक व्यावसायिक स्पर्धेत उतरलेल्या इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे.
या नव्या इंजिनमुळे जागतिक व्यावसायिक स्पर्धेत उतरलेल्या इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे.