- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी
जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतव्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स प्रथम क्रमांकावर आहेत.
फोर्ब्जने ५ ऑगस्टला जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतांच्या यादीत शंभर व्यक्तींपैकी जवळजवळ ५१ व्यक्ती या अमेरिकेतील आहेत, तर ३३ व्यक्ती या आशियातील आणि ८ युरोपमधील आहेत.या शंभर व्यक्तींची एकूण संपत्ती ८४२.९ अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्स यांची संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर इतकी आहे, तर त्यांच्यापाठोपाठ ओरॅकलचे संस्थापक लॅरी इल्लीसन यांचा क्रमांक असून त्यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर इतकी आहे.तिसऱ्या नंबरवर अमॅझोनचे जेफ्फी बेझोस असून त्यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर आहे. सोशल मिडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा चौथ्या क्रमांकार आहेत. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेशआहे.गेल्या काही दिवसापूर्वी फोर्ब्जने सर्वाधिकश्रीमंत दाम्पत्य म्हणून बिल गेट्स व त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे नाव जाहीर केले होते.
- मोदी गेलेल्या देशांतून २० अब्ज डॉलर्स 'एफडीआय'
गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या देशांकडून भारतात २० अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक करण्यात आलीआहे.२०१४ -१५ या कालावधीत भारताकडून बाहेर ६.४२ अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूक करण्यात आली तर भारतात एकूण ७५.७१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, असे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात सांगितले आहे.याच काळात भारतातील कंपन्यांनी भूतान, ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, सेशेल्स, मॉरिशस, फिजी, श्रीलंकाव सिंगापूर या देशांमध्ये ३.४२ अब्ज डॉलर्सचीथेट परकी गुंतवणूक केली आहे.या कालावधीत भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली असून हे प्रमाण आता ३०.९२ अब्ज डॉलर्स झाले आहे.

