- तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका :
कृषी, सेवा आणि उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रांची कामगिरी खराब झाल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) परिणाम झाला आहे. या तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका राहिला. त्याच्या आधीच्या तिमाहीत हाच विकासदर 7.5 टक्के इतका होता विकासदराचा वेग मंदावल्यामुळे आणि औद्योगिक उत्पादनातही घट झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरांत कपात करू शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
- डॉ. श्रीकर परदेशी यांची संचालकपदी पदोन्नती :
महाराष्ट्रातून एप्रिल महिन्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) बढती मिळालेले सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना अवघ्या चार महिन्यांत संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
"पीएमओ"मध्ये सामान्यतः पाच संचालक असतात. मात्र याला अपवाद करताना डॉ. परदेशी धरून आता ही संख्या सहा वर पोचली आहे.
2001 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांच्याकडे केंद्राच्या नऊ मंत्रालयांच्या समन्वय व संवादाची जबाबदारी आहे.
या मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषयही हाताळण्याचे काम त्यांच्याकडे आहे. विशेषतः सामाजिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांचे विविध विषय हाताळण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
यात ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा समावेश आहे.