Post views: counter

एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी

एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी 

डेल कारनेजीचे एक वाक्य खूपच छान आहे. तो म्हणाला होता,

'जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश
मिळण्याची अजिबात शक्यता नसतानादेखील
यशासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.'

स्पर्धापरीक्षा म्हटली की, यश-अपयश, नराश्य हे आलेच. स्पर्धापरीक्षा हा एक कैफ आहे. यश मिळालं नाही तोपर्यंत किंवा अपयशी होऊन वयोमर्यादा संपत नाही, तोपर्यंत हा कैफ उतरत नाही.

 पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. त्यापकी पेपर पहिला हा सामान्य अध्ययनाचा असेल. सामान्य अध्ययनाचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने दिला नाही. मात्र हा अभ्यासक्रम यू.पी.एस.सी.च्या पेपर-१मधील अभ्यासक्रमासारखाच आहे. हा बदल भविष्याच्या दृष्टीने नक्कीच चांगला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तो खालीलप्रमाणे-

MPSC Prelim Paper घटक ३-महाराष्ट्राचा भूगोल




                      जर एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने बघितल्यास भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.गेल्या दोन वर्षांतील परीक्षेचा अभ्यास केल्यास, असे लक्षात येते की, या घटकावर साधारण 15ते 17प्रश्न विचारले होते. एम.पी.एस.सी.च्या नवीन अभ्यासक्रमात (जो अभ्यासक्रम 'यूपीएससी'सारखाच आहे.) काही बदल करण्यात आले आहेत.

                     उदा. नवीन अभ्यासक्रमात जगाचा भूगोल हा नव्याने समाविष्ट केलेला घटक आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार जर कृषिशास्त्राचाही विचार केला तर या भागावर जवळजवळ ३५ ते ४० प्रश्न विचारले जात असत, आपण पीएसआय / एसटीआय / असिस्टंट पूर्व या परीक्षांचाही विचार केला तर या घटकावर साधारणत: 15ते 17प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग



महाराष्ट्र लोक सेवा आयोग 


MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION




महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.

• महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.
Post views: counter

आफ्रिका खंड Africa



राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्यासक्रमांत भूगोल या घटकाअंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना अॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.


आफ्रिका खंड 


  1. जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
  2. प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे.
  3. अॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.
  4. या खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.
  5. या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.

सह्याद्री पश्चिम घाट


जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

  1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य  , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र , थेन्मला, कोन्नी  , पुनलुर , तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ यांचा समावेश आहे.
  2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी , कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
  3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.