Post views: counter

Current Affairs Aug 2015 Part - 3

  • केंद्र सरकारचा "अमृत योजना‘ राबविण्याचा निर्णय
टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्‍वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने "अमृत योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील 43 शहरांचा समावेश होणार असला तरी, मुंबई, ठाण्यासारख्या शहरापेक्षा सोलापूर, लातूरसह अन्य शहरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 20 ऑगस्टपासून केंद्र सरकारचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येत असून, तीनदिवसीय कार्यशाळेनंतर शहरांची नावे निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारची "जलयुक्‍त शिवार योजना" यशस्वी झाली असली तरी, ही योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. 2 हजार कोटींची "अमृत योजना" राबविण्यासाठी राज्यातील 43 शहरांची निवड करण्यात आली असली तरी, पाणीटंचाईच्या शहरांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
अमृत योजनेसाठी निश्‍चित केलेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, नगर, चंद्रपूर, परभणी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा आणि उदगीर.
  • फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज" नवे ऍप सादर करणार
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज"बाबत माहिती देण्यासाठी नवे ऍप सादर करणार आहे. सध्यातरी या ऍपची चाचणी सुरु असून लवकरच ती सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
 या ऍपद्वारे फेसबुकसोबत करार असलेल्या प्रकाशकांच्या विविध महत्वाच्या बातम्या, लेख आदींबाबत युजरला सूचित करण्यात येणार आहे. तसेच सोबत

Current Affairs Aug 2015 Part -2

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी
जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतव्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स प्रथम क्रमांकावर आहेत.
फोर्ब्जने ५ ऑगस्टला जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतांच्या यादीत शंभर व्यक्तींपैकी जवळजवळ ५१ व्यक्ती या अमेरिकेतील आहेत, तर  ३३ व्यक्ती या आशियातील  आणि ८ युरोपमधील आहेत.या शंभर व्यक्तींची एकूण संपत्ती ८४२.९ अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्‌स यांची संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर इतकी आहे, तर त्यांच्यापाठोपाठ ओरॅकलचे संस्थापक लॅरी इल्लीसन यांचा क्रमांक असून त्यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर इतकी आहे.तिसऱ्या नंबरवर अमॅझोनचे जेफ्फी बेझोस असून त्यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर आहे. सोशल मिडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा चौथ्या क्रमांकार आहेत. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेशआहे.गेल्या काही दिवसापूर्वी फोर्ब्जने सर्वाधिकश्रीमंत दाम्पत्य म्हणून बिल गेट्‌स व त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे नाव जाहीर केले होते.

  • मोदी गेलेल्या देशांतून २० अब्ज डॉलर्स 'एफडीआय'
गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या देशांकडून भारतात २० अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक करण्यात आलीआहे.२०१४ -१५ या कालावधीत भारताकडून बाहेर ६.४२ अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूक करण्यात आली तर भारतात एकूण ७५.७१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, असे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात सांगितले आहे.याच काळात भारतातील कंपन्यांनी भूतान, ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, सेशेल्स, मॉरिशस, फिजी, श्रीलंकाव सिंगापूर या देशांमध्ये ३.४२ अब्ज डॉलर्सचीथेट परकी गुंतवणूक केली आहे.या कालावधीत भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली असून हे प्रमाण आता ३०.९२ अब्ज डॉलर्स झाले आहे.

Current Affairs Aug 2015 part - 1

  • मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा : 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर आता मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 तब्बल 30 हजार कोटी रुपयांत उभारला जाणारा हा महामार्ग 2019 पर्यंत बांधला जाणार असून, या महामार्गावर ऑप्टिक फायबरचे जाळे असेल.
 घोटी, औरंगाबाद, अमरावती या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला "कम्युनिकेशन सुपर एक्‍स्प्रेस हायवे" संबोधले जाणार आहे.
 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
प्रकल्प माहिती :
मुंबई ते नागपूर सहापदरी द्रुतगती मार्ग
 अंतर दहा तासांत पार होणार
 मागास भागातून जाणाऱ्या या रस्त्यावर आयटी पार्क, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले

  • आता फेसबुक करणार प्रसार :
जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक आता इंटरनेटचा प्रसार करणार असून, यासाठी प्रथमच सौरऊर्जेवर उड्डाण करणाऱ्या ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे.
 यामुळे इंटरनेट कनेक्‍शनपासून दूर असणाऱ्या विकसनशील देशातील दुर्गम भागात लेसरच्या माध्यमातून वायरलेस इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.
 फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज या ड्रोनच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली.
 "इंटरनेट डॉट ओरजी"च्या सहकार्याने फेसबुकने हा प्रकल्प राबविला आहे.
 "ऍक्विला" असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या पंखांचा विस्तार
Post views: counter

जिल्हा परिषद

जिल्हा परिषद


                   जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
  • रचना -प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

पंचायत समिती

पंचायत समिती 


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.
  • निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
  • सभासदांची पात्रता :
  1. तो भारताचा नागरिक असावा
  2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
  3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.
  • आरक्षण :
महिलांना : 50 %
अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)
इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)