Post views: counter

Current Affairs Sept 2015 part - 2


  • शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली.
या 34 वर्षीय क्रिकेटपटूने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये खेळला.
 त्या लढतीत ऑस्ट्रेलिया संघाला 169 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
  • मेनसाला बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण :
बारा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीने इंग्लंडमध्ये मेनसा बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण मिळवून थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टिफन हॉकिंगलाही मागे टाकले.
 दीडशे मिनिटांत तिने 162 गुण मिळवले.
 तिला गणित, भौतिक विज्ञान आणि रसायनशास्त्रात रस होता. मेनसा (एमइएनएसए)ने आयोजित कॅटेल थ्री बी पेपरमध्ये सर्वाधिक गुण मिळाले.
 तसेच या परीक्षेतील प्रश्‍न तिने काही मिनिटांतच सोडविले.
 हॉकिंग आणि आइन्स्टाइन यांचा बुध्यांक 160 इतका आहे, तर लॅडियाचा 162 आहे.
Post views: counter

Current Affairs Sept 2015 Part - 1

  • तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका :

कृषी, सेवा आणि उत्पादन (मॅन्युफॅक्‍चरिंग) क्षेत्रांची कामगिरी खराब झाल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) परिणाम झाला आहे. या तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका राहिला. त्याच्या आधीच्या तिमाहीत हाच विकासदर 7.5 टक्के इतका होता  विकासदराचा वेग मंदावल्यामुळे आणि औद्योगिक उत्पादनातही घट झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरांत कपात करू शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
  • डॉ. श्रीकर परदेशी यांची संचालकपदी पदोन्नती :

महाराष्ट्रातून एप्रिल महिन्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) बढती मिळालेले सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना अवघ्या चार महिन्यांत संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
 "पीएमओ"मध्ये सामान्यतः पाच संचालक असतात. मात्र याला अपवाद करताना डॉ. परदेशी धरून आता ही संख्या सहा वर पोचली आहे.
 2001 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांच्याकडे केंद्राच्या नऊ मंत्रालयांच्या समन्वय व संवादाची जबाबदारी आहे.
 या मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषयही हाताळण्याचे काम त्यांच्याकडे आहे. विशेषतः सामाजिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांचे विविध विषय हाताळण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
 यात ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा समावेश आहे.

Current Affairs Aug 2015 Part- 5


  • जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात बोल्टला सुवर्णपदक :


जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्टने 9.79 सेकंदात 100 मीटरचे अंतर पूर्ण करून जेतेपद कायम राखले. अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनकडून त्याला कडवी टक्कर मिळाली. गॅटलीनने 9.80 सेकंदाज शर्यत पूर्ण केली. अवघ्या 0.1 सेकंदाच्या फरकाने गॅटलीनचे सुवर्णपदक हुकले. कॅनडाचा अ‍ॅड्रे डे ग्रासे (9.92 से.) आणि अमेरिकेचा ट्रायव्हॉन ब्रोमेल (9.92 से.) यांनी समान वेळ नोंदविल्यामुळे संयुक्तरित्या कांस्यपदक देण्यात आले.

  • साठ शहरे "सौर शहरे" योजनेंतर्गत विकसित केली जाणार :

महाराष्ट्रातील नागपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, नांदेड आणि शिर्डी, तसेच गोव्यातील पणजीसह देशातील साठ शहरे अपारंपरिक व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या "सौर शहरे" योजनेंतर्गत विकसित केली जाणार आहेत. प्रत्येक राज्यातील 50 हजार ते 50 लाख या लोकसंख्येदरम्यानच्या किमान एक आणि कमाल पाच शहरांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळालेल्या 50 पैकी
Post views: counter

Current Affairs Aug 2015 Part - 4

  • ख्रिस रॉजर्स क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर :
सलामीवीर ख्रिस रॉजर्स याने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मंगळवार जाहीर केला. इंग्लंडविरुद्ध मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यापाठोपाठ रॉजर्सनेही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने ऑस्ट्रेलिया पिछाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना गुरुवारपासून खेळविला जाणार आहे. डावखुरा ख्रिस रॉजर्स हा 38 वर्षांचा असून, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 62.42 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत.
  • प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे निधन :
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि रवींद्र संगीत गायिका शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांनी देशातच नव्हे तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेत रवींद्र संगीत गायन आणि नृत्य, नाटकांचे प्रभावी सादरीकरण केले होते. रवींद्रनाथांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गीतांजली संगीत समूहाची स्थापना केली होती. प्रणव मुखर्जी आणि शुभ्रा यांचा विवाह 13 जुलै 1957 रोजी झाला.
  • 'मार्शमॅलो' (6.0) अँड्रॉइडचे व्हर्जन लवकरच बाजारात दाखल :

आईसक्रीम (4.0), जेलीबीन (4.1), किटकॅट (4.4), आणि लॉलिपॉप (5.0) नंतर गुगलचे 'मार्शमॅलो' (6.0) या नावाचे अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.ज्या डेव्हलपर्सना अँड्रॉइडसाठी नवीन अप्लिकेशन्स तयार करायची आहेत किंवा अपडेट करायची आहेत ते आता सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकतात, असंही इसॉन म्हणाले. नवीन 'मार्शमॅलो'चे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर व सुधारीत पॉवर सेव्हिंग मोड असणार आहे. प्रत्येक नवीन अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना किंवा ते अपडेट करताना युजर्सना संमतीची आवश्यकता भासणार नाही, असंही गुगलतर्फे सांगण्यात आलं आहे.  

Post views: counter

लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१)


लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) 

 
 
लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळातील महत्वपूर्ण घटना –  
 
  1.  १९१६ मध्ये दोन ठिकाणी होमरूल लीगची स्थापना करण्यात आली. जून १९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात केली तर सप्टेंबर १९१६ मध्ये श्रीमती अॅनी बेझंट यांनी मद्रास प्रांतात होमरूल लीगची स्थापना केली.
  2. १९१६ मध्ये कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेश लखनौ येथे पार पडले. जहालाना कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अॅनी बेझंटनी महत्वाची भूमिका निभावली.
  3. १९१६ मध्ये कॉंग्रेस व मुस्लीम लीगमध्ये “लखनौ करार” झाला. या करारांतर्गत दोघांनीही एकमेकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. हा करार करण्यामध्ये टिळकांची महत्वाची भूमिका होती.
  4. १९१६ मध्ये गांधीजीनी गुजरातमध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली.
  5. १९१७ साली बिहारमध्ये गांधीजीनी चंपारण्य सत्याग्रह घडवून आणला.
  6. १९१८ मध्ये अहेमदाबाद येथे गिरणी कामगारांचा संप आणि खेडा येथे शेतक-यांचा सत्याग्रह यशस्वी झाला.