Post views: counter

Current Affairs March Part - 1


  • जगातील सर्वांत सुंदर शहर :
डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे जगातील सर्वांत सुंदर शहर ठरले आहे.
 तसेच या शहरातील उच्च प्रतीचे राहणीमान सर्व जगात चांगले असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
 मर्सर या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून विविध कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी जगातील 230 शहरांचा अभ्यास केला.
 तसेच यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले.
 व्हिएन्ना शहराची लोकसंख्या 17 लाख असून, शहरात असलेली विविध संग्रहालये, रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद हे नागरिक घेत असतात.
 इतर पाश्‍चात्य देशांतील शहरांची तुलना करता येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच स्वस्त आहे.
 एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र असलेले बगदाद दहशतवादाने होरपळल्याने या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.
  • भारतीय कलाकाराला फ्रान्सचा नाइटहूड सन्मान :
आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या कलाकाराला फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे.
 दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल महंमद यांचा फ्रेंच राजदूताने 'नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर' हा किताब दिला.
 फ्रान्सने केलेल्या सन्मानाबद्दल इस्माईल यांनी आभार मानले असून, कलेची राजधानी समजल्या जाणाऱ्या पॅरिसनेच हा गौरव केल्याची भावना व्यक्त केली आहे.

Current Affairs March Part - 2


  • राष्ट्रीय कौशल्य विकास योजना :
देशात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, तरुणांना आपल्या पायावर उभे राहता यावे व रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठीकेंद्र शासनाने राष्ट्रीय कौशल्य विकास योजना सुरूकेली.तसेच आतापर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे76लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे प्रमाण वाढावे व विविध प्रकारेकौशल्यासंदर्भात प्रशिक्षण घेता यावे यासाठी केंद्राकडून आणखी1 हजार 500‘मल्टिस्कील’प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.
जुलै 2015मध्ये केंद्र शासनाकडूनराष्ट्रीय करिअर सेवासुरू करण्यात आली होती,याअंतर्गत देशभरातून35लाख रोजगारेच्छुक तरुणांनी नोंदणी केली होती.
2016-17या वर्षात100‘मॉडेल’करिअर केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे, याशिवाय राष्ट्रीय करिअर सेवा‘प्लॅटफॉर्म’सोबत राज्य रोजगार केंद्र जोडण्याची बाबदेखील प्रस्तावित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या महत्त्वाकांक्षी‘स्कील इंडिया’योजनेसंदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पात पावलेउचलली आहेत.
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेमार्फत पुढील3वर्षांत देशातील1 कोटीतरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची अर्थमंत्रीअरुण जेटलीयांनी घोषणा केली.
  • फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्‍ट लिगसी ऑनर’ पुरस्कार :
‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांना ‘यंग प्रेसिडेंट्‌स ऑर्गनायझेशन’च्या ‘वर्ल्ड प्रेसिडेंट्‌स ऑर्गनायझेशन’चा (वायपीओ-डब्ल्यूपीओ) ‘फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्‍ट लिगसी ऑनर’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
 दुबई येथे (दि.9) होणाऱ्या शानदार समारंभात पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’च्या आंतरराष्ट्रीय समितीने नुकतीच ही घोषणा केली.

Current Affairs March Part - 3


  • भारतातील सौरऊर्जा वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी यामध्ये बिहारचं नाव कुठेच नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने जाहीर केलेल्या भारतातील २६ राज्याच्या यादीत बिहारचे नाव नाही. बिहार मध्ये सौरऊर्जा वीज उत्पन्न होत नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने सौर ऊर्जा उत्पन्न करणाऱ्या जाहीर केलेल्या २६ राज्यामध्ये राज्यस्थान सर्वात अग्रेसर असून २०१५ मध्ये १२६४ मेगावॅट सौरउर्जा निर्माण केली आहे. तर गुजरात १०२४, मध्यप्रदेश ६७९, तमिळनाडू ४१९ यांचा क्रमांक लागतो. मागील वर्षी भारतात सौरउर्जेवर एकूण ५,१३० मेगावॅट विजेची निर्मीती करण्यात आली आहे. ती गेल्या वर्षाच्या तुलनेत १३८५ मेगावॅट ने वाढली आहे. भारत सरकार वर्ष २०२१-२२ पर्यंत राष्ट्रीय उर्जा मिशन मार्फत १०० गीगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहे. त्यामधील ६० गीगावॅट जमानीवर तर ४० गीगावॅट घराच्या छतावर उत्पन्न करणार आहे.  सरकारचे चालू वर्षी २०१६ मध्ये २००० मेगावॅट तर पुढील वर्षी १२००० मेगावॅट सौरऊर्जा निर्मीती करण्याचे लक्ष आहे. ऊर्जा मंत्रालय ३१ मार्च पर्यंत १८०० मेगावॅट निर्मितीचा निवीदा काढणार आहे.
  • सेवा क्षेत्रात एफडीआय वाढ :
सरकारने व्यापार सुगमता वाढविल्याने आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याने सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) एप्रिल ते डिसेंबर या अवधीत 85.5 टक्क्यांनी वाढून 4.25 अब्ज डॉलर झाली.
 औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी)च्या आकड्यांनुसार एप्रिल-डिसेंबर 2014 या कालावधीत एफडीआय 2.29 अब्ज डॉलरचा मिळाला होता.
 सेवा क्षेत्रात बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, माहिती-तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
 देशाच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचे योगदान 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Current Affairs March Part - 4

  • निमलष्करी दलात आता महिला लढाऊ :
निमलष्करी दलाच्या पोलिस दलामध्ये महिलांचे आरक्षण जाहीर केल्यानंतर आता पाचही केंद्रीय सशस्त्र दलांत (सीएपीएफ) मध्ये लढाऊ अधिकारी म्हणून महिलांचा समावेश होणार.
 केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात नुकतेच नवीन नियम जाहीर केले असून, आयटीबीपीमध्ये महिलांना थेट लढाऊ अधिकारी म्हणून अर्ज करू शकतात.
 आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर गस्त घालण्यासाठी तैनात असतात, अशा कठीण जबाबदारीमुळे महिलांना या दलात परवानगी दिली जात नाही.
 मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलामध्ये महिला उमेदवार थेट अधिकारी म्हणून यूपीएससीमार्फत प्रवेश करत आहेत.
 तसेच याशिवाय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सशस्त्र सीमा दलातही (एसएसबी) महिलांची भरती अनुक्रमे 2013 आणि 2014 पासून सुरू झाली.
 आयटीबीपीमध्ये भरती होण्यासाठी परवानगी दिल्याने महिलांसंदर्भातील लावण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहेत. सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे आता पाचही ठिकाणी लढाऊ अधिकारी किंवा जवान म्हणून महिलांचा समावेश होणार आहे.
 एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच महिलांना 33 टक्के कॉन्स्टेबल दर्जाच्या जागा सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्ये आणि बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीमध्ये 15 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 तसेच त्यानुसार 'सीएपीएफ'च्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ पदावर महिला नेमण्यात आली असून, सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 भारत आणि चीनच्या 3 हजार 488 किलोमीटरच्या सीमेवर आयटीबीपीचे जवान तैनात असून, सरकारने अलीकडेच या दलात 500 महिलांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 सध्या आयटीबीपीमध्ये 80 हजार जवान कार्यरत असून, महिलांची संख्या दीड हजार म्हणजे एकूण संख्येच्या पावणेदोन टक्केच आहे.
  • महिला शरीरसौष्ठव सरितादेवी ‘मिस इंडिया’ :
मणिपूरच्या सरितादेवीने आपल्या अनुभवाच्या जोरावर अपेक्षित बाजी मारताना, पहिल्यांदाच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘मिस इंडिया’ किताब पटकावला.
 तसेच त्याच वेळी तिला कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्राच्या सिबालिका सहाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 प्रथमच रायगड जिल्ह्यात (रोहे) झालेल्या या दिमाखदार स्पर्धेद्वारे, भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्राची ताकद दिसून आली.

Current Affairs March Part - 5


  • कॉफीटेबल बुक ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमेन)’ :
पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन (दि.19) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे.
 तसेच लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
 पुण्यातील नारीशक्तीला ‘लोकमत’ने नेहमीच भरभक्कम पाठिंबा दिला आहे.
 महिलांच्या जीवनोन्मुखतेने त्यांच्या कर्तबगारीला नेहमीच वेगळा आयाम दिलेला आहे, याचेच प्रत्यंतर हे कॉफीटेबल बुक वाचताना येईल.
 दोन वर्षांपासून ‘लोकमत’ने ‘वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ सुरू केले आहेत.
 असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या तेजस्विनींचा जागर संपूर्ण राज्यभर व्हावा व त्यांच्या कार्यातून महिलांना उमेद मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे.
 ‘लोकमत’च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनींचा राज्य पातळीवरील ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
 तसेच यामध्ये सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कला, शौर्य, क्रीडा आणि उद्योग या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
  • एअरबसची 275 कोटींची गुंतवणूक :
विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच 4 कोटी डॉलर्स (सुमारे 275 कोटी रूपये) गुंतवणार आहे.
 तसेच या गुंतवणुकीतून दिल्ली राजधानी क्षेत्रात (एनसीआर) एक अद्ययावत पायलट प्रशिक्षण, तसेच विमान दुरुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा एअरबसचा इरादा आहे.