प्रमुख भूरूपे - नदी
युवावस्था अवस्थेत पर्वतीय प्रदेशात नदीचा उगम होतो. पाण्यांचे आकारमान कमी असले तरी देखील तीव्र उतारामुळे उर्ध्व खनन प्रभावी असते. या अवस्थेस पुढील भूरूपांची निर्मिती होते.
१) ‘व्ही’ आकाराची दरी
तीव्र उर्ध्व खननामुळे तळभागाची खोली वाढून ‘व्ही’ आकाराच्या दरीची निर्मिती होते.
२) निदरी व घळई
अत्यंत तीव्र उताराच्या बाजू असलेल्या अरूंद दरीस निदरी असे म्हणतात. जेव्हा या निदरीच्या बाजूंचा उतार अत्यंत तीव्र व खोली अतयंत जास्त असते तेव्हा त्यास घळई असे संबोधले जाते.उदा. कोलोरॅडो नदीवरील ग्रँड घळई.