Post views: counter

How To Train Your Mind For Mental Stress During Exam?

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा?

                                    पूर्व परीक्षा ही बहूत्तरिय स्वरुपाची असते, म्हणजे एका प्रश्नाचे ४ उत्तर दिलेले असतात त्यापैकी सर्वात बरोबर उत्तर कोणत आहे ते अचूक निवडायचे असते. ह्यासाठी स्पीड आणि अचूकता ही महत्वाची असते. पेपर सोडवतांना प्रेझेन्स ऑफ माइंड असावे लागते म्हणजे उत्तर निवडताना कोणत उत्तर बरोबर नाही हे कळायला पाहिजे कारण त्यासाठी आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो. हे ज्याला जमलं तोच जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो पूर्वपरीक्षेत.
                                   सर्वात आधी मोडेल टेस्ट पेपर्स सोडवायची खूप प्रक्टिस करावी. त्यासाठी, १० ते ३० हजार प्रश्न असलेली पुस्तके घ्यावीत आणि त्यामधील प्रश्न पत्रिका २ तासात सोडवायची प्रक्टिस करावी. प्रक्टीसनेच परफेक्ट व्हाल आणि चुकीचे उत्तर देणे कमी होईल व निगेटिव्ह मार्किंग्च्या प्रश्नातून तुमची सुटका होईल. परीक्षेच्या वेळी एखादा प्रश्न कठीण वाटत असेल

UPSC Or MPSC?


                                   आपण काल नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालाच्या काही पैलूंची चर्चा केली. त्या निकालातून कशा प्रकारे यशासाठी प्रेरणा घेता येईल ते आज आपण पाहू.यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी अनेक जण आधीच कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत आहेत. विशेषत: असे दिसते की राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यशस्वी झालेले उमेदवार यंदाच्या यादीतही आहेत. काही उदाहरणेच बघायची तर धीरज सोनजे, मुकुल कुलकर्णी, सायली ढोले, सचिन घागरे या सर्वांची आधीच राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांनीच आता यूपीएससीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रमेश घोलप याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. तो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला व त्याच वर्षी यूपीएससी परीक्षेत त्याची आयएएस पदावर निवड झाली.या सर्व चर्चेचा सारांश असा की यूपीएससी करायचे की एमपीएससी हा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो, पण त्या प्रश्नाने गोंधळून जायची गरज नाही. दोन्ही परीक्षा आता एकमेकांना समांतरच आहेत. एकाच वेळी दोन्ही देता येतात व दोन्हीमध्ये एकाचवेळी यश मिळवता येते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकते, असेही आपण यंदाच्या निकालाकडे बघून म्हणू शकतो. उदा. सायली ढोले हिने पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा देऊन उपजिल्हाधिकारी

Current Affairs July 2015 Part - 3

अझीम प्रेमजी:

  • आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी विप्रो सॉफ्टवेअर कंपनीतील सुमारे अर्धी संपत्ती समाजसेवी संस्थेच्या नावावर केली आहे.
  • विप्रो ही देशातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.
  • अझीम प्रेमजी यांनी कंपनीतील आणखी 18 टक्के शेअर्स समाजसेवी संस्थेच्या नावावर केले आहे. अशाप्रकारे त्यांनी आता 39 टक्के शेअर्स समाजसेवी संस्थेच्या नावे केले आहेत.
  • या शेअर्सचे सध्याचे एकूण बाजार मूल्य 53 हजार 284 कोटी रुपये आहे. प्रेमजी यांच्या निर्णयामुळे अझीम प्रेमजी ट्रस्टला आता संपत्ती दान केल्याने या माध्यमातून यावर्षी 530 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
इरा सिंघल:
  • केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने ब्रँड अॅम्बेसिडर पदी इरा सिंघलयाची निवड केली
  • इरा सिंघल २०१४ च्या यूपीएससी परीक्षेमध्ये प्रथम क्र्माकांने उत्तीर्ण झाली
  • इरा सिंघल ने सर्वप्रथम २०१० मध्ये परीक्षा दिली होती त्यामध्ये ८१५ व्या रँकने पास झाली होती. तीची त्यावेळी IRS पदी निवड झाली होती.परंतु उंची ४.५ फुट असल्याने तिला मेडीकल अनफीट घोषित केले

Current Affairs july 2015 part - 1


eMPSCkatta
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2015:

  • स्पर्धचे ठिकाण: कॅनडा
  • विजेता: अमेरिका
  • उपविजेता: जपान
  • सर्वोत्तम खेळाडू (गोल्डन बाँल): कार्ली लॉइड
सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे.
विश्वचषक इतिहासात अंतिम फेरीत हॅट्ट्रिक नोंदविणारी कार्ली लॉइड ही पहिली महिला खेळाडू ठरली.कार्ली ने पहिल्या १६ मिनीटातच ३ गोल केले. 
अमेरिकेने १९९१ आणि १९९९ नंतर प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. याचबरोबरच सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे. त्यापाठोपाठ दोन जेतेपदे पटकावणाऱ्या जर्मनी संघाचा क्रमांक येतो.
गतविजेते: 
  1. १९९१:- अमेरिका
  2. १९९५:- नार्वे
  3. १९९९:- अमेरिका
  4. २००३:-जर्मनी

Current Affairs July 2015 Part - 2

eMPSCktta


इस्रो व ऍट्रिक्‍सने अवकाशात यशस्वीपणे सोडले पाच व्यापारी उपग्रह :


  • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि तिचा व्यापारी विभाग असलेल्या ऍट्रिक्‍सने आज एकूण 1,440 किलो वजनाचे पाच व्यापारी उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडले.
  •  पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या साह्याने प्रथमच इतक्‍या मोठ्या वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
  • भारताची आतापर्यंतची ही सर्वांत अवजड व्यापारी मोहीम होती.
  •  तसेच या वर्षातील ही पहिलीच व्यापारी मोहीम असून या मोहिमेचा कार्यकाळ 7 वर्षे असेल.
  •  "पीएसएलव्ही"चे सुधारित व्हर्जन असलेल्या "पीएसएलव्ही-एक्‍सएल" या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ब्रिटनच्या या पाचही उपग्रहांना त्यांच्या कक्षेत सोडले.
  •  "पीएसएलव्ही-एक्‍सएल" हे चार टप्पे असलेले रॉकेट असून, सुरवातीच्या टप्प्यांमध्ये वेग मिळविण्याकरत अतिरिक्त सहा मोटर्स बसविण्यात आल्या आहेत.
  •  पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात घन इंधनाचा वापर केला असून, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात द्रवरूप इंधनाचा वापर केला आहे.
  •  प्रक्षेपणापासून ते पाचवा उपग्रह अवकाशात सोडण्याचा कालावधी 19 मिनिटे 16 सेकंद इतका असणार आहे.